Join us   

भरपूर कॅल्शियम आणि प्रोटीन देणारे ५ पदार्थ, दूध आवडत नाही-शाकाहारी आहात तर हे पदा‌र्थ खा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2023 8:13 PM

Calcium-Protein Rich Foods for Better Bone Health : कमी वयात हाडं ठिसूळ होऊ नये म्हणून नियमित खा प्रोटीन-कॅल्शियमयुक्त ५ पदार्थ..

शरीर योग्यरित्या कार्य करावे यासाठी आरोग्याला पौष्टीक घटकांची गरज असते. याशिवाय शरीर योग्यरित्या कार्य करत नाही. शरीराला उर्जा प्रदान करण्यासाठी आहारात प्रोटीन (Protein) आणि कॅल्शियमचा (Calcium) समावेश असावा. प्रोटीन आणि कॅल्शियममुळे शरीराचे बरेच अवयव सुरळीत चालतात.

शिवाय दोन्ही घटक स्नायूंचा विकास, रोगप्रतिकारशक्ती, हाडांची ताकद आणि हार्मोन्स संतुलित करण्यास मदत करतात. प्रोटीन आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे शरीरात अनेक बदल घडतात. यामुळे शरीर कमकुवत होणे, हाडं ठिसूळ होणे, अशक्तपणा वाटणे, वजन कमी होणे, रक्ताची कमतरता इत्यादी लक्षणे दिसून येतात(Calcium-Protein Rich Foods for Better Bone Health).

प्रोटीन आणि कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी दुधाचे प्रॉडक्ट खाल्ले जातात. पण त्याव्यतिरिक्त देखील अनेक पदार्थांमध्ये प्रोटीन आणि कॅल्शियम आढळते. यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा याची माहिती पोषणतज्ज्ञ प्रियांशी भटनागर यांनी दिली आहे.

डाळ आणि चणे

विविध डाळींमध्ये प्रोटीन, फायबर, कॅल्शियम आणि विविध आवश्यक पोषक तत्वे आढळतात. शिवाय चणे हे प्रोटीन रिच फूड आहे. त्यामुळे आहारात डाळी आणि चण्याचा नक्कीच समावेश करा.

ब्लॅक बीन्स

ब्लॅक बीन्स हे प्रोटीन, कॅल्शियम, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत आहे. त्याचप्रमाणे राजमामध्ये देखील प्रोटीन आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे याचे सेवन आपण सॅलड किंवा भाजीच्या स्वरुपात करू शकता.

क्विनोआ

क्विनोआमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. शिवाय त्यात अमीनो ऍसिड देखील आढळते. शिवाय कॅल्शियमचाही हा एक उत्तम स्रोत आहे. मुख्य म्हणजे क्विनोआ हे एक ग्लूटेन-फ्री पदार्थ आहे. ज्यामुळे वजन वाढत नाही.

बदाम

बदाम आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. यात प्रोटीन आणि कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. शिवाय यात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात; ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते. आपण बदाम रात्री पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खाऊ शकता.

चिया सीड्स

चिया सीड्स वजन कमी करण्यास खूप मदत करते. त्यात ओमेगा-३ फॅटी ऍसिड, प्रोटीन, कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. यामुळे शरीराला तर उर्जा मिळतेच, शिवाय शरीरातील अतिरिक्त वजनही कमी होते. आपण चिया सीड्स गरम पाण्यात भिजवून, स्मुदी किंवा दह्यामध्ये मिक्स करून खाऊ शकता.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य