Join us   

शरीरातील २०६ हाडांना भरभरून कॅल्शियम देतील हे ५ पदार्थ; मसल्स-हाडं कायम राहतील चांगली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2023 3:31 PM

Calcium rich foods : हिरव्या पालेभाज्या ज्यामध्ये भरपूर कॅल्शियम असते. ते तुमचे दात आणि हाडे तयार करण्यास मदत करतात.

माणसाचं शरीर  २०६ हाडांपासून बनतं. हाडं कॅल्शियम, व्हिटामीन डी आणि पाण्यापासून बनलेली असतात. यामुळे मजबूती आणि ताकद वाढवण्यासाठी हाडांमध्ये पुरेसं कॅल्शियम असणं गरजेचं असतं. व्हिटामीन डीमुळे शरीरातील कॅल्शियमचे व्यवस्थित शोषण होते आणि हाडं मजबूत होतात.  (Calcium rich foods) सध्या व्हिटामीन डी ची कमतरता एक मोठी समस्या बनली आहे.

कॅल्शियम कमी झाल्यानं ऑस्टिओपोरोसिस होतो. व्हिटामीन डी इम्यून सिस्टीम आणि मेंदूसाठी गरजेचा असतो. १९ वर्ष आणि त्यापेक्षा मोठ्या अससेल्यांना हार्वर्ड कडून रोज ६०० आईयू व्हिटामीन डी  घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (Food Sources Of Calcium For Your Bones) याची कमतरता भरून काढण्यसासाठी उन्हात बसणं, सप्लिमेंट्स, फोर्टिफाईड फूड आणि व्हिटामीन डी युक्त पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. (Which food has highest calcium)

पालक

हिरव्या पालेभाज्या ज्यामध्ये भरपूर कॅल्शियम असते ते तुमचे दात आणि हाडे तयार करण्यास मदत करतात. एक कप उकडलेला पालक शरीराच्या दैनंदिन गरजेच्या २५ टक्के कॅल्शियम पुरवू शकतो. फायबर समृद्ध असलेल्या या पानांमध्ये व्हिटॅमिन ए आणि लोह देखील भरपूर असते. ज्यामुळे तुमच्या शरीराला आणि हाडांना चांगले पोषण मिळू शकते.

नट्स

नटांमध्ये कॅल्शियम असते, परंतु त्यात मॅग्नेशियम आणि फॉस्फरस देखील असतात, जे हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात. मॅग्नेशियम हाडांमध्ये कॅल्शियम शोषण्यास मदत करते. वयानुसार हाडे मजबूत ठेवायची असतील तर काजू चांगले पोषण देऊ शकतात.

किडनीमधले घातक पदार्थ बाहेर काढतात ५ पदार्थ; रोज खा, महिनाभरात दिसेल शरीरात बदल

डेअरी उत्पादनं

दूध, दही आणि पनीर यांसारख्या पदार्थांमध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते. जे हाडांच्या मजबुती आणि संरचनेसाठी सर्वात महत्वाचे जीवनसत्व आहे. एक कप दूध आणि एक कप दही हे कॅल्शियमचे उत्कृष्ट स्त्रोत आहेत जे आपण दररोज घेऊ शकता.

संत्र्याचा रस

ताज्या संत्र्याचा रस शरीराला कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी प्रदान करतो, जे हाडे मजबूत करण्यास मदत करतात? संत्र्याच्या रसाचे नियमित सेवन केल्याने ऑस्टिओपोरोसिसचा धोकाही काही प्रमाणात कमी होऊ शकतो, असेही सांगितले जाते.

व्हिटामीन डी

आहारातून व्हिटॅमिन डी योग्य प्रमाणात मिळणे कठीण आहे. म्हणूनच हाडांच्या मजबुतीसाठी आपल्याला हे जीवनसत्व डी सूर्यप्रकाशातून मिळू शकते. सूर्यप्रकाशात पहाटे चालणे हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. आपण रोजच्या सूर्यप्रकाशातून  व्हिटॅमिन डी मिळवू शकता. व्हिटॅमिन डी असलेली औषधे देखील बाजारात उपलब्ध आहेत, परंतु त्यांचे सेवन डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावे.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य