Join us   

कॅल्शियम कमी म्हणून दाताला कीड लागली? नियमित खा ५ गोष्टी, डेण्टल ट्रिटमेण्टचा खर्च वाचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2023 3:38 PM

Calcium-Rich Foods Good for Your Teeth फक्त हाडांसाठीच नाही तर दातांसाठीही कॅल्शियम फार गरजेचे, त्यासाठीच खा ५ पदार्थ नेहमी

खाण्यापिण्याचा थेट परिणाम आपल्या दात आणि हिरड्यांवर होतो. गोड आणि स्टार्चयुक्त पदार्थ खाल्ल्याने दात आणि हिरड्यांच्या समस्या वाढतात. जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने तोंडात बॅक्टेरिया जमा होतात. ज्यामुळे दातांना कीड लागते. खरंतर गोड पदार्थ खाल्ल्यानंतर शरीरात अॅसिड तयार होते. २० मिनिटानंतर तोंडातील पीएच पातळी कमी होते. ज्यामुळे दातांचा सर्वात कठीण भाग म्हणजेच इनॅमल तुटतो आणि पोकळी निर्माण होते. यासाठी दातांना कॅल्शियम मिळणे गरजेचं आहे.

कॅल्शियम दातांच्या बाहेरील इनॅमलचे संरक्षण करते आणि मजबूत करते. डॉ. सिमरन डेंटल अँड इम्प्लांट सेंटरच्या संस्थापक आणि दंत शल्यचिकित्सक डॉ. सिमरन सेठी यांनी, दात आणि हिरड्या मजबूत करण्यासाठी काय खावे याची माहिती दिली आहे(Calcium-Rich Foods Good for Your Teeth).

पनीर

पनीरमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. व शरीरातील ब्लड शुगर कमी करण्यास मदत करते. त्यात केसिन नावाचे प्रोटीन असते. जे बाहेरील थर म्हणजेच इनॅमलला मजबूत करते. यासह त्यात फॉस्फेटही भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे पीएच पातळी स्थिर ठेवण्यास मदत होते.

नेहमी खा ५ भाज्या, किडनीचे आजार राहतील कायम लांब - तब्येतही होईल ठणठणीत

पाणी

उत्तम आरोग्यासाठी पाणी पिणे गरजेचं आहे. पाणी पिण्याचा दातांना देखील फायदा होतो. जर दातांच्या पोकळीमध्ये जेवणाचे कण साचले असतील, तर पाणी प्यायल्याने ते निघून जातील. यासह जेवल्यानंतर तोंडातून येणारी दुर्गंधीही कमी होईल.

दूध

दुधामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. नियमित दूध प्यायल्याने याचा थेट फायदा दातांना होतो. दूध तोंडातील ऍसिडचे प्रमाण कमी करते. ज्यामुळे दातांमध्ये कॅविटी निर्माण होत नाही.

सुटलेले पोट कमी करायचे? ४ पैकी १ डाळ रोज खा, पोट होईल सपाट लवकर

दही

दही फक्त दातांसाठी नाही तर, हिरड्यांसाठी देखील फायदेशीर ठरते. दही प्रोबायोटिक्सने समृद्ध असतात. प्रोबायोटिक्स हे निरोगी बॅक्टेरिया आहेत, जे हानिकारक जीवाणूंपासून सरंक्षण करते.

सॅलॅड

सॅलॅड आपण कच्च्या भाज्यांचा वापर करून तयार करतो. कुरकुरीत कच्च्या भाज्यांना भरपूर वेळा चघळण्याची आवश्यकता असते. या भाज्या खाल्ल्याने दात स्वच्छ होतात. गाजर आणि कुरकुरीत भाज्या उत्कृष्ट नैसर्गिक दात क्लिनर म्हणून ओळखले जातात. ज्यामुळे दातांवर अडकलेले अन्नाचे कण निघून जातात.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य