Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > कॅल्शियम हवंय, दूध प्यायला नको? रोज १ चमचा या बिया खा, शरीर पोलादी होईल-हाडं होतील मजबूत

कॅल्शियम हवंय, दूध प्यायला नको? रोज १ चमचा या बिया खा, शरीर पोलादी होईल-हाडं होतील मजबूत

Calcium Rich Foods Non Dairy Calcium Foods : मासिक पाळीशी संबंधित समस्या उद्भवल्यास तिळाचे सेवन फायदेशीर ठरते.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 09:37 AM2023-05-01T09:37:00+5:302024-04-23T17:51:56+5:30

Calcium Rich Foods Non Dairy Calcium Foods : मासिक पाळीशी संबंधित समस्या उद्भवल्यास तिळाचे सेवन फायदेशीर ठरते.

Calcium Rich Foods Non Dairy Calcium Foods : Sesame Food Seed Gives 8 Times More Calcium Than A Glass Of Milk | कॅल्शियम हवंय, दूध प्यायला नको? रोज १ चमचा या बिया खा, शरीर पोलादी होईल-हाडं होतील मजबूत

कॅल्शियम हवंय, दूध प्यायला नको? रोज १ चमचा या बिया खा, शरीर पोलादी होईल-हाडं होतील मजबूत

लहानपणापासूनच  हाडांच्या चांगल्या वाढीसाठी कॅल्शियमची (Calcium Rich Foods) आवश्यकता असते. दूध (Milk) हा कॅल्शियमचा सगळ्यात चांगला स्त्रोत आहे. लहानपणी दूध पिण्याची सवय अनेक दिवस तशीच राहते आणि दूध हा कॅल्शियमचा सगळ्यात चांगला स्त्रोत आहे. (Calcium Rich Foods) दूधात ८ टक्के जास्त कॅल्शियम असते. कॅल्शियम, प्रोटीन, फायबर्स यांसारखी पोषक तत्व असतात. प्रसिद्ध डायटिशियन श्वेता शाह यांनी कॅल्शियमसाठी कोणत्या बियांचा आहारात समावेश करावा याबाबत सांगितले आहे. (Sesame Food Seed Gives 8 Times More Calcium Than A Glass Of Milk)

हाडं मजबूत राहण्यास मदत होते

प्रसिध्द डायटिशयन डॉ. श्वेता शाह व्हिडिओमध्ये सांगतात की, ''सेसम सिड्स म्हणजे तिळात दूधाच्या तुलनेत १ ते २ पट नाही तर ८ पट जास्त कॅल्शियम असते. ज्यामुळे हाडं चांगली राहण्यास मदत होते. भविष्यात सप्लिमेंट घेण्यासाठी तुम्ही तिळाचे सेवन करू शकता. तिळातील पोषक तत्वांबद्दल बोलायचे झाल्यास यात फायबर्स आणि प्रोटीन्स मोठ्या प्रमाणात असतात. तिळाच्या सेवनाने कॅल्शियम, फायबर्स आणि प्रोटीन्स अशी तत्व मिळतात.''

इंस्टाग्रावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये त्या सांगतात की मासिक पाळीशी संबंधित समस्या उद्भवल्यास तिळाचे सेवन फायदेशीर ठरते. तिळात फायटोइसोजिन्स असतात. ही तत्व अनियमित मासिक पाळीच्या समस्या टाळण्यास मदत करतात.  मेनोपॉज आलेल्या महिलांच्या हाडांच्या मजबूतीसाठी तिळाचे सेवन करणं आवश्यक आहे.

शरीरात कोलेस्टेरॉल  जास्त असल्यास तिळाचे सेवन फायदेशीर ठरते. यात तिळात पीऊएफए आणि एमयुएफए ही दोन पोषक तत्व असतात. बऱ्याच लोकांना हे माहीत नसते की तिळाच्या बियांमध्ये मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात  राहते. तिळाचे असे साही मिनरल्स असतात ज्यामुळे रेड ब्लड सेल्स तयार होण्यास मदत होते. डॉ, शाह सांगतात की तुम्ही थोड्या थोड्या प्रमाणात तिळाचे सेवन करू शकता. ज्यामुळे कॅल्शियमची कमतरता दूर होण्यास मदत होते. 

Web Title: Calcium Rich Foods Non Dairy Calcium Foods : Sesame Food Seed Gives 8 Times More Calcium Than A Glass Of Milk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.