हाडे (Bones Health) हे शरीराचा सर्वात महत्वाचा भाग. हाडांशिवाय शरीराची कल्पनाही करता येत नाही. आपले संपूर्ण शरीर हाडांच्या संरचनेवर अवलंबून असते. पण वयानुसार हाडं ठिसूळ होतात. ज्यामुळे हाडं कमकुवत तर होतातच, शिवाय गुडघे, कंबर, पाठ दुखण्याची समस्या वाढते. हाडे कॅल्शियम (Calcium), फॉस्फेट आणि इतर खनिजे साठवतात. जेव्हा शरीराला त्यांची गरज असते तेव्हा ते रिलीज करतात.
मुख्य म्हणजे मासिक पाळी, डिलिव्हरी, ब्रेस्टफीडिंगमुळे महिलांच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता भासते. हाडांसह दातांना देखील कॅल्शियमची गरज असते. जर आपल्याला आहारातून कॅल्शियम (Calcium rich Foods) हवे असेल तर, आजपासून डाएटमध्ये ५ पदार्थांचा समावेश करा(Calcium-Rich Foods That Improve Your Bones).
यासंदर्भात पोषणतज्ज्ञ कविता म्हणतात, 'महिलांना मासिक पाळी, गर्भधारणा, स्तनपान आणि रजोनिवृत्ती अशा अनेक नैसर्गिक प्रक्रियेतून जावे लागते. अशा स्थितीत कॅल्शियमयुक्त पदार्थ खायला हवे. मेनोपॉजनंतर महिलांच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता भासते. कमी वयात हाडं ठिसूळ होतात. पुरुषांच्या तुलनेत महिलांना कॅल्शियमयुक्त पदार्थ खाण्याची अधिक आवश्यकता आहे. कारण त्यांना वयाबरोबर हाडांच्या समस्यांचा त्रास जास्त होतो.'
१०० पाऊले चालली तरी दम लागतो? श्वास फुलतो, पाय दुखतात? खा ५ पदार्थ- वाढेल झटपट एनर्जी
दूध
दुधात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे दूध रोज प्यावे. एक ग्लास दुधात ३०० ग्रॅम कॅल्शियम असते. आपण दुधाऐवजी दुग्धजन्य पदार्थही खाऊ शकता. दुग्धजन्य पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. शिवाय त्यातून शरीराला इतरही फायदे मिळतात.
अंजीर
अंजीर कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहे. त्यात फॉस्फरस देखील असते. जे हाडांच्या विकासासाठी मदत करते. एक कप अंजीर खाल्ल्याने शरीराला अंदाजे २४० मिलीग्राम कॅल्शियम मिळते. याशिवाय यात व्हिटॅमिन के आणि पोटॅशियम देखील असते. दररोज रिकाम्या पोटी अंजीर खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि पचनाशी संबंधित समस्याही दूर होते.
टोमॅटो
टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन के असते, जे कॅल्शियमचे उत्तम स्रोत मानले जाते. त्यामुळे आहारात टोमॅटोचा नक्कीच समावेश करा. टोमॅटो केवळ हाडे मजबूत करत नाही तर, शरीरातील कॅल्शियमची कमतरता देखील भरून काढते.
खैके पान बनारसवाला! विड्याचं पान खाण्याचे ४ फायदे, पचन सुधारते आणि कॅल्शियमही वाढेल लवकर
पालक
पालकमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. १०० ग्रॅम पालकामध्ये ९९ मिलीग्राम कॅल्शियम असते. शरीर निरोगी ठेवण्यासाठी आठवड्यातून किमान ३ वेळा पालक खा. हिरव्या भाज्यांचे सेवन केल्याने आपली हाडे मजबूत होतात.
सोयाबीन
सोयाबीनमध्ये दुधाइतकेच कॅल्शियम असते. त्यामुळे दुधाला पर्याय म्हणून आपण नियमित सोयाबीन खाऊ शकता. ज्यांना दररोज दूध प्यायला जमत नाही किंवा ज्यांना दूध आवडत नाही, त्या महिलांनी न चुकता सोयाबीन खावे. यामुळे हाडे कमकुवत होणार नाही.