Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > कॅल्शियम पाहिजे पण दूध प्यायला नको? ५ पदार्थ खा, हाडांना ताकद-दुप्पट कॅल्शियम मिळेल

कॅल्शियम पाहिजे पण दूध प्यायला नको? ५ पदार्थ खा, हाडांना ताकद-दुप्पट कॅल्शियम मिळेल

Calcium Rich Foods Vegetarian : हाडांमध्ये कॅल्शियम आणि व्हिटामीन डी ची कमरता भासल्यास ऑस्टिओपोरोसिस  यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 11:15 AM2024-02-02T11:15:32+5:302024-02-02T13:47:19+5:30

Calcium Rich Foods Vegetarian : हाडांमध्ये कॅल्शियम आणि व्हिटामीन डी ची कमरता भासल्यास ऑस्टिओपोरोसिस  यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.

Calcium Rich Foods Vegetarian : Food Sources Of Calcium For Your Bones Top Calcium Rich Foods Fruits Vegetables | कॅल्शियम पाहिजे पण दूध प्यायला नको? ५ पदार्थ खा, हाडांना ताकद-दुप्पट कॅल्शियम मिळेल

कॅल्शियम पाहिजे पण दूध प्यायला नको? ५ पदार्थ खा, हाडांना ताकद-दुप्पट कॅल्शियम मिळेल

हाडं (Healthy Bones) निरोगी राहण्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता असते.  शरीरच्या चांगल्या आरोग्यासाठी पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते.  शरीराला व्हिटामीन डी शोषून घेण्यासही फायदा होतो. (Calcium Rich Foods Vegetarian) शरीरातील पोषक तत्वांची कमतरता भरून निघते. हाडांमध्ये कॅल्शियम आणि व्हिटामीन डी ची कमरता भासल्यास ऑस्टिओपोरोसिस  यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. (Top Calcium Rich Foods Fruits Vegetables) ज्यामुळे हाडं कमकुवत होतात आणि नाजूक होतात. ज्यामुळे हाडं लवकर डॅमेज होण्याची भिती असते. (Calcium Rich Foods) दुधाव्यतिरिक्त तुम्ही आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करू शकता ते पाहूया.

हाडांना मजबूत बनवण्यासाठी काय करायचं? (How to Get Strong Bones)

आहारतज्ज्ञ न्युट्रिशनिस्ट प्रियांशी भटनागर यांनी सांगितले की, हाडांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि कॅल्शियमची कमतरता पूर्ण करण्यासााठी कॅल्शियम रिच फूड्सचा आहारात समावेश करा. दूध-दही अशा डेअरी उत्पादनांमध्ये कॅल्शियम जास्त प्रमाणात असते.  दूध-दही यांसारख्या डेअरी उत्पादनांमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असते पण तुम्हाला ते आवडत नसेल तर तुम्ही खाली सांगितलेल्या काही पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. 

1) ग्रीन स्मूदी

 द हार्ट हेल्थ डायटिशियनच्या रिपोर्टनुसार दुधाऐवजी तुम्ही पालेभाज्यांचा आहारात समावेश करू शकता. पालेभाज्यांमध्ये एंटीऑक्सिडेंट्स, व्हिटामीन्स आणि मिनरल्स असतात. (Ref) ज्यामुळे हाडांना लागणार कॅल्शियम मिळते. याच्या सेवनाने व्हिटामीन डी चे अवशोषण होण्यासही मदत होते. 

2) टोमॅटो सूप

टोमॅटोमध्ये लायकोपीन जास्त प्रमाणात असते. हे एक महत्वाचे एंटी ऑक्सिडेंट आहे. ज्यामुळे हाडांचे होणारे नुकसान टाळता येते. नियमित टोमॅटोच्या ज्यूसचे सेवन केल्यां हाडं निरोगी राहण्यास मदत होते. तुम्ही टोमॅटो सॅलेड्सच्या स्वरूपातही खाऊ शकता. 

3) बेरीज

बेरीजमध्ये एंटीऑक्सिडेंट्सचे प्रमाण जास्त असते. प्रोबिओटीक आणि कॅल्शियममध्ये योगर्ट जास्त प्रमाणात असते ज्यामुळे ताकद दुप्पट होते आणि हाडांना ताकद मिळते.

4) संत्र्याचा रस

संत्र्याच्या रसात नॅच्युरली व्हिटामीन-सी असते.  यात मिनरल्स असतात. व्हिटामीन डी चे प्रमाण जास्त असते. ज्यामळे हाडांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. 

5) बीया

फ्लेक्स सिड्स, तिळ, चिया सिड्स, भोपळ्याच्या बिया यात कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. या बियांमध्ये अन्सॅच्युरेडट फॅट्स असतात. याच्या सेवनाने शरीराला  कॅल्शियम मिळण्यास मदत होते. 

Web Title: Calcium Rich Foods Vegetarian : Food Sources Of Calcium For Your Bones Top Calcium Rich Foods Fruits Vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.