Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > देवघरातील कापूर असतो बहुगुणी, कापराचे आरोग्यदायी ५ उपाय- घर करा प्रसन्न

देवघरातील कापूर असतो बहुगुणी, कापराचे आरोग्यदायी ५ उपाय- घर करा प्रसन्न

आयुर्वेदातही कापरला अनन्यसाधारण महत्त्व आहे, पाहूयात कापूर वापरण्याते भन्नाट फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2022 05:07 PM2022-05-25T17:07:53+5:302022-05-25T17:18:20+5:30

आयुर्वेदातही कापरला अनन्यसाधारण महत्त्व आहे, पाहूयात कापूर वापरण्याते भन्नाट फायदे

Camphor in the house of God is multifaceted, 4 healthy remedies of camphor- make the house happy | देवघरातील कापूर असतो बहुगुणी, कापराचे आरोग्यदायी ५ उपाय- घर करा प्रसन्न

देवघरातील कापूर असतो बहुगुणी, कापराचे आरोग्यदायी ५ उपाय- घर करा प्रसन्न

Highlightsकापूर पाण्यात मिसळून तो जखमेवर लावल्यास जखम लवकर भरुन येते. या तेलाने दुखणाऱ्या भागावर मसाज केल्यास त्याचा अतिशय चांगला फायदा होतो. 

कापूर हा पूजेच्या ताटात असतो हे आपल्याला माहित आहे. मुख्य आरती झाल्यानंतर कापूरआरतीसाठी हा कापूर वापरला जातो. कापूराचा वासही काहीसा उग्र असून स्थायू अवस्थेतून वायूमध्ये परावर्तित होणारा कापूर हा दुर्मिळ घटक आहे. कापूर ज्याप्रमाणे आरतीसाठी महत्त्वाचा असतो त्याचप्रमाणे तो आरोग्यासाठीही अतिशय उपयुक्त असतो. आरोग्याच्या काही तक्रारींवर आवर्जून कापूर वापरण्याचा सल्ला वयस्कर व्यक्तींक़डू दिला जातो. आयुर्वेदातही कापसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, पाहूयात कापूर वापरण्याते भन्नाट फायदे.

(Image : Google)
(Image : Google)

१. डास पळून जाण्यास फायदेशीर 

डासांची समस्या ही सध्या एक मोठी समस्या झाली आहे. आपल्या घरात खूप डास झाले असल्यास घरात कापूर जाळावा. त्यामुळे बरा वेळ डास आत येण्यापासून रोखले जाऊ शकतात. डास चावल्याने लहान मुलंपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना वेगवेगळे संसर्गजन्स आजार होऊ शकतात. मात्र त्यापासून वाचायचे असेल तर घरात कापूर जाळणे हा उत्तम उपाय आहे.

२. त्वचेच्या समस्यांवर उपयुक्त

त्वचेवर मुरूम, पुटकुळ्या, लाल डाग असे काही झाले असेल तर त्याठिकाणी कापूर लावायचा. तेलात कापूर बारीक करुन त्वचेवर लावल्यास त्वचेचे इन्फेक्शन कमी होते. कापूर हा अँटीबॅक्टेरीयल असल्याने याठिाणचे इन्फेक्शन जाण्यास मदत होते. 

३. कफ-खोकला होतो दूर 

हवाबदल झाला की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यानाच सर्दी आणि कफ होतो. अनेकदा आपल्याला खोकलाही होतो. हा सर्दी-कफ बरा होण्यासाठी कापूर उत्तम काम करतो. बदाम तेलामध्ये कापूर मिसळून छातीवर, डोक्यावर या तेलाने मालिश केल्यास श्वसनाला होणारा त्रास दूर होतो आणि कफही कमी होण्यास मदत होते. 

४. सांधेदुखीसाठी फायदेशीर 

सांधेदुखी ही फार जुनी आणि त्रासदायक समस्या असते. एकदा सांधे दुखायला लागले की त्या व्यक्तीला काहीही सुचत नाही. कापराचे तेल सांधेदुखीवर अतिशय फायदेशीर ठरते. या तेलाने दुखणाऱ्या भागावर मसाज केल्यास त्याचा अतिशय चांगला फायदा होतो. 

(Image : Google)
(Image : Google)

५. जखमेवर उत्तम औषध 

आपल्याला काही कापले किंवा जखम झाली तर आपण त्याठिकाणी एखादी पावडर किंवा क्रिम लावतो. यामुळे जखम बरी होण्यास आणि लवकर भरु येण्यास उपयोग होतो. पण कापूर हा अशाप्रकारच्या जखमेवर, कापलेल्या भागावर लावल्यास ते बरे होण्यास मदत होते. कापरात असणारे अँटीबायोटीक गुणधर्म अशावेळी उपयुक्त ठरतात. कापूर पाण्यात मिसळून तो जखमेवर लावल्यास जखम लवकर भरुन येते. 

Web Title: Camphor in the house of God is multifaceted, 4 healthy remedies of camphor- make the house happy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.