Join us

पोट साफच होत नाही, जोर लावावा लागतो? कॉफीत २ गोष्टी मिसळून प्या, सकाळी पोट होईल साफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2024 16:46 IST

Can caffeine help you poop? Here's what the nutritionist says : पोट साफ होत नाही म्हणून तासंतास टॉयलेटमध्ये बसता?

आजच्या काळात बरेच कमी लोक असतील, ज्यांना बद्धकोष्ठतेची समस्या नसेल (Constipation). सध्या जंक फूडच्या आहारी लोक जात आहेत. शिवाय बिघडलेल्या जीवनशैलीमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास लोकांना छळत आहेत (Health Tips). जर आठवड्यातून तीन वेळा आपल्याला शौचास जाण्यास त्रास होत असेल, मल जाण्यास त्रास होत असेल तर, आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास असू शकतो (Stomach Health).

बद्धकोष्ठतेच्या समस्येकडे वेळीच लक्ष नाही दिले तर, गॅस, ॲसिडीटी, डोकेदुखी आणि मूळव्याध देखील होऊ शकतो. जर आपल्याला बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम हवं असेल तर, नॅचरोपॅथी डॉक्टर प्रियांका अभिनव यांनी कोमट पाण्यात काय मिसळून प्यायल्याने त्रास कमी होईल याची माहिती दिली आहे(Can caffeine help you poop? Here's what the nutritionist says).

बद्धकोष्ठतेवर कॉफी गुणकारी

बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी आपण कॉफी पिऊ शकता. पण कॉफी दुधाची नसून, ब्लॅक कॉफी फायदेशीर ठरू शकते. कॉफीमध्ये कॅफिन चांगल्या प्रमाणात असते. यामुळे चयापचय क्रिया नियंत्रित राहण्यास मदत होते. आपण त्यात तूप किंवा काळी मिरी पावडर देखील मिक्स करू शकता. यामुळे शौचास जाण्यास अडचण येणार नाही.

इवल्याश्या बियांतून मिळते भरपूर पोषण; कॅल्शियमचा आहे खजिना, वाढेल ताकद - दिसाल फिट

नियमित कॉफी पिण्याचे फायदे

डायजेस्टिव्ह डिसीज वीक २०१९ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या  अभ्यासाचे प्रमुख लेखक, युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास मेडिकल ब्रँचचे झुआन झेंग म्हणतात, 'उंदरांना जेव्हा ३ दिवस सतत कॉफी दिली, तेव्हा तेव्हा त्यांच्या लहान आतड्यात असलेल्या स्नायूंमध्ये कॉन्ट्रेक्शन वाढते. कॅफीनयुक्त कॉफीमुळे पोट निरोगी राहते.

पावसाळ्यात फरशी पुसूनही घरात किडे - डास येतात? पाण्यात मिसळा ३ गोष्टी; चकाचक होईल फरशी

बद्धकोष्ठतेवर कॉफी कशी कार्य करते?

बद्धकोष्ठता आणि अपचनाच्या समस्येवर कॉफी उपयुक्त ठरू शकते. कॉफी आतड्यांमधील बॅक्टेरिया सुधारून आतडे स्वच्छ करण्यास मदत करते. ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. जर आपण देखील बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रस्त असाल तर, कॉफी प्या. कोमट पाण्यात कॉफी, तूप आणि काळी मिरी घालून प्या. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य