यंदा प्रचंड प्रमाणात उष्मा वाढला आहे. अंगाची लाही लाही होते. हायड्रेटेड राहण्यासाठी पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. परंतु हा सल्ला पाळताना आपण पिण्यायोग्य पाणी पितोय, दुषित पाणी तर पीत नाही ना याची काळजी घ्या. नाहीतर आजारांना आमंत्रण. जुलाब, वारंवार लघवीला जाण्याचा त्रास, युरिन इनफेक्शन असं सारं चक्र सुरु होणं धोक्याचं आहे.
आजकाल लोकं फिल्टर किंवा आरओचं शुद्ध पाणी पितात. पाणी स्वच्छ करताना फिल्टर आरओ पाण्यातील अनेक महत्त्वाची खनिजे काढून टाकतात. यासंदर्भात, न्यूट्रिशनिस्ट रिद्धिमा बत्रा सांगतात, ''मिनरल्स नसलेले पाणी प्यायल्याने त्याचा शरीराला काहीच फायदा होत नाही, उलट त्यामुळे वारंवार लघवीचा त्रास जाणवतो''(Can drinking more RO water prevent urinary tract infections?).
शरीरासाठी आवश्यक आहे मिनरल्स
आपल्या शरीरातील प्रत्येक स्नायू आणि मज्जातंतूसाठी मिनरल्स आवश्यक असतात. हे मिनरल्स आपल्याला पाण्यातून मिळतात. याला इलेक्ट्रोलाइट्स म्हणतात, ज्यांची नावे पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम, क्लोराईड असेही आहेत.
इलेक्ट्रोलाईट्स कमी होण्याचे कारण
उन्हाळ्यात शरीरातून प्रचंड घाम निघतो. घामामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात. जेव्हा जास्त घाम येतो तेव्हा त्यांची पातळी वेगाने कमी होते. उष्णतेची लाट, उष्ण वारे, व्यायाम, ताणतणाव आणि आजारपणामुळे जास्त घाम येतो.
काळा हरभरा खाल्ल्याने डायबिटिज खरेच नियंत्रणात येतो का? तज्ज्ञ सांगतात काय खरं काय खोटं..
फिल्टर केलेल्या किंवा आरओच्या पाण्यात टाका या गोष्टी
पाणी शुद्ध करण्यासाठी जर आपण आरओ किंवा फिल्टरचा वापर करत असाल तर, या काही गोष्टी पाण्यात घालायला हवा. या गोष्टींमुळे पाण्यातील मिनरल्स किंवा न्युट्रिशन्स वाढतील. यामुळे तुमच्या शरीराला पोषण देणारे चांगले पाणी मिळू शकते. व आरोग्य सुधारू शकते.
समुद्री मीठ
लिंबाचा तुकडा
आल्याचा तुकडा
कलिंगडचा तुकडा
कसे घालायचे?
फिल्टर केलेले पाणी एका मोठ्या भांड्यात घ्या. त्यात वरीलपैकी कोणतीही एक गोष्ट योग्य प्रमाणात मिक्स करा. ही गोष्ट २ ते ३ तासांसाठी पाण्यात राहू द्या, त्यानंतर ते पाणी प्या.
लाल - हिरवा गारेगार बर्फाचा गोळा भर उन्हात खाताय? वाचा हा धोक्याचा इशारा आणि...
नारळ पाणी प्या
उन्हाळ्यात नारळ पाणी पिण्याचा सल्ला आपल्याला मिळतो. शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता भरून काढण्यासाठी, नारळाच्या पाण्याचे सेवन करा. नारळाच्या पाण्यात नैसर्गिकरित्या आवश्यक खनिजे आढळतात. ज्याचा फायदा आपल्या शरीराला होतो.