पाणी आपल्या जीवनाचा एक महत्त्वपूर्ण आधार आहे. शरीराला योग्य प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. जर तुम्ही योग्य प्रमाणात पाणी प्यायलात नाही तर तब्येतीवर चुकीचा परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे शरीरात वेगवेगळ्या समस्या उद्भवू शकतात. एक्सपर्ट्स सांगतात की जेवताना पाणी पिण्यापेक्षा जेवणाच्या अर्धा तास आधी किंवा २० मिनिटांनी पाणी प्यायला हवं. (Can Drinking Water Before Meals Help In Weight Loss Expert Explains) वजन कमी करण्यासाठी तुम्ही कसं पाणी पिता, किती पिता हे फार महत्वाचं असतं.
जेवणाआधी २ तास २ ग्लास पाणी प्यायल्यानं वजन नियंत्रणात राहतं आणि जास्त खाण्यापासून सुटका मिळते. लठ्ठपणा आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. आहारतज्ज्ञ शिवाली गुप्ता यांनी जेवणाआधी पाणी पिणं आणि लठ्ठपणा कंट्रोल करण्याबाबत अधिक माहिती दिली आहे.
जेवणाच्या आधी पाणी पिण्याचे फायदे
जेवणाआधी पाणी प्यायल्यानं पोट भरल्यासारखं वाटतं. ज्यामुळे तुम्ही कमी प्रमाणात जेवता. यामुळे कॅलरीजचे सेवन नियंत्रणात राहते आणि वजन कमी करण्याची प्रक्रिया वेगानं होते. पाणी पचनक्रिया सक्रिय करते आणि जेवण पचणं सोपं होतं. शरीरातील फॅट आणि शुगर अवशोषण नियंत्रणात राहते ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. जेवणाच्या आधी पाणी प्यायल्यानं सोडा, ज्यूस अन्य कॅलरीज युक्त ड्रिंक्सचे सेवन कमी करता येते. यामुळे वजन वाढण्यापासून रोखता येतं.
पाणी प्यायल्यानं शरीरातील मेटाबॉलिझ्म वेगानं वाढतो. एक्सपर्ट्स सांगतात की जेवणाच्या आधी ५०० मिलीलीटर पाणी प्यायल्यानं मेटाबॉलिझ्म २४ ते ३० टक्के वाढतो ज्यामुळे कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. शरीरातील टॉक्सिन्स बाहेर निघण्यास मदत होते.
जेवणाआधी पाणी पिण्याची योग्य पद्धत
जेवणाच्या २० ते ३० मिनिटं आधी १ ग्लास पाणी प्यायल्यानं पोट जेवणासाठी तयार राहते. हलकं कोमट पाणी प्यायल्यास अधिक फायदे मिळतात कारण यामुळे पचनक्रिया एक्टिव्ह राहते. गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्यानं त्रास वाढू शकतो. जेवताना सतत पाणी प्यायल्यानं अन्न व्यवस्थित जात नाही.