कांद्याने आतापर्यंत अनेकांना रडवलं आहे. पण याच कांद्याशिवाय पदार्थ अपूर्ण आहे. जेवणाची रंगत वाढवण्यासाठी कांद्याची फोडणी हवीच. कांद्यामध्ये अनेक पोषकमुल्ये आहेत, जे आपल्या आरोग्यासाठी लाभदायक ठरतात. कांदा खाण्याच्या अनेक आरोग्य फायद्यांपैकी, एक म्हणजे कांदा कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते. शरीराच्या उत्तम कार्यासाठी चांगले कोलेस्टेरॉल आवश्यक आहे. परंतु, समस्येचे खरे मूळ हे खराब कोलेस्टेरॉल आहे. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका होऊ शकतो(Can eating onions help control cholesterol levels? Research Says).
रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात शास्त्रज्ञांनी असा दावा केला, ''कांद्याच्या सेवनाने कोलेस्टेरॉल कमी होऊ शकते. यासह कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी निरोगी आहाराचे सेवन व दररोज व्यायाम करणे गरजेचं आहे.''
कोलेस्टेरॉल म्हणजे काय?
कोलेस्टेरॉल म्हणजे मेणासारखा, चिकट पदार्थ असतो, जो रक्तांच्या नसांमध्ये जमा होतो, आणि त्याची लेव्हल जर वाढत राहिली तर रक्तप्रवाह थांबतो. ज्यामुळे हृदयाचे रोग, नसांचे रोग, हृदय विकाराचा झटका आणि हार्ट स्ट्रोक यांसारखे गंभीर आजार उद्भवू शकतात.
जेवताना पाणी प्यावं की जेवण झाल्यावरच पिणं उत्तम? तज्ज्ञ सांगतात, पाणी किती-कधी प्यावं
लाल कांदा खाण्याची संशोधकांनी केली शिफारस
रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री जर्नल, फूड अँड फंक्शनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, ''लाल कांदा खाण्याची शिफारस करण्यात आली आहे. चीनी संशोधकांनी लाल कांदे उंदरांना खायला दिले आणि कांद्याचे आरोग्य फायदे तपासण्यास सुरुवात केली.
उंदरांमध्ये केलं संशोधन
कांदा कोलेस्टेरॉल कसे कमी करू शकतात हे शोधण्यासाठी संशोधकांनी उंदरांवर अभ्यास केला. त्यांनी ८ आठवडे उंदरांच्या गटाला कांद्याची पूड दिली. संशोधकांना असे आढळले की, या कालावधीनंतर त्यांचे वाईट कोलेस्टेरॉल ११. २ ते २०. ३ टक्क्यांनी कमी झाले आणि चांगले कोलेस्टेरॉल वाढले.
बटाटा 'असा' नेहमी खात असाल तर वाढतो कॅन्सरचा धोका, डॉक्टर सांगतात..
कांदा कोलेस्टेरॉल कमी कसे करते
NCBI वर प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार कांद्यामध्ये क्वेरसेटिन नावाचे महत्त्वाचे संयुग असते. हे कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते. कांदे जळजळ रोखते यासह रक्तवाहिन्या मजबूत करतात, जे उच्च कोलेस्टेरॉल असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते.
ब्लड प्रेशर कमी झालं, कायम लो बीपीचा त्रास होतो? झटपट करण्याचा १ सोपा उपाय
कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी कांदा कसा खावा
संशोधनात कांद्याची पावडर वापरण्यात आली होती, जी कांद्याला उकळवून आणि वाळवून तयार केली आहे. कांदा खाण्याचे इतरही मार्ग आहेत, जसे की भाजी, कोशिंबीर, सँडविच किंवा बर्गरसोबत आपण कच्चा कांदा खाऊ शकता. याशिवाय आपण कांद्याच्या पावडरचा वापर आहारात करू शकता.
कांद्याचे पोषक तत्व व फायदे
कांद्यामध्ये जीवनसत्त्वे ए, सी आणि ई, पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, फायबर, कार्बोहायड्रेट, क्वेर्सेटिन, प्रथिने यांसारखे अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात. कांद्याचे सेवन मधुमेह नियंत्रित करणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, त्वचा आणि केसांच्या समस्या सोडवणे इत्यादीसाठी केला जाऊ शकतो.