Join us   

युरिक ऍसिड वाढले असेल तर डाळी खाणे पूर्ण बंद करावे का? डॉक्टर सांगतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2023 1:35 PM

Can eating too many pulses result in increased uric acid : युरिक ॲसिड वाढल्यामुळे सांधेदुखी, किडनीचे आजार आणि हृदयविकाराचा झटका यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात..

शरीराची योग्य काळजी नाही घेतल्यास गंभीर आजारांचा धोका वाढतो. हृदयरोग, डायबिटिज, पोटाचे विकार यासह युरिक अ‍ॅसिडची देखील समस्या वाढते. युरिक अ‍ॅसिडमुळे (Uric Acid) शरीरात अनेक समस्या निर्माण होतात. शिवाय सतत वेदना होणं, क्रॅम्पिंग, सांध्यांमध्ये सूज येणे, चालण्यात अडचण किंवा किडनी स्टोन यांसारखी लक्षणे निदर्शनास येतात. युरिक अ‍ॅसिड हे एक टाकाऊ पदार्थ आहे. जेव्हा शरीरात प्युरीनचे विघटन होते, तेव्हा ते तयार होते. मुख्य म्हणजे मूत्रपिंड मूत्राद्वारे युरिक अ‍ॅसिड काढून टाकते, परंतु काहीवेळेला त्याची पातळी वाढल्यामुळे ते सांधे, मूत्रपिंड किंवा यकृतामध्ये जमा होते. पण याचे प्रमाण वाढले की, ते काढून टाकणे किडनीला कठीण होऊन जाते. ज्यामुळे किडनीच्या निगडीत आजार वाढतात.

युरिक अ‍ॅसिडवर कण्ट्रोल ठेवण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष द्यायला हवे. या काळात कोणते पदार्थ टाळणे गरजेचं आहे, याची माहिती नवी दिल्लीस्थित सर गंगाराम हॉस्पिटलचे वरिष्ठ यूरोलॉजिस्ट, डॉ अमरेंद्र पाठक यांनी माहिती दिली आहे(Can eating too many pulses result in increased uric acid).

तज्ज्ञांच्या मते, 'जेव्हा अ‍ॅसिडचे प्रमाण वाढते. तेव्हा ते आपल्या शरीराच्या लहान सांध्यांमध्ये जमा होते आणि गाउटची समस्या निर्माण करते. गाउट हा एक प्रकारचा संधिवात आहे, ज्यामध्ये हात, पाय आणि इतर भागांच्या सांध्यांमध्ये तीव्र वेदना होतात. ज्यामुळे चालताना त्रास होतो. शिवाय किडनी स्टोनची देखील समस्या निर्माण होऊ शकते. अशावेळी आहाराकडे विशेष लक्ष द्यायला हवे. मुख्य म्हणजे आहारातून डाळींचे प्रमाण कमी करायला हवे.'

ऐन तिशीत दुखणे मागे लागले? आहारात हवे ६ पदार्थ, जबाबदारीचा भार उचलायचा तर..

५ डाळी खाल्ल्याने वाढते युरिक अ‍ॅसिड

डाळींमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. शिवाय डाळींचा आहारात समावेश केल्याने शरीर सुदृढ राहते. उडीद, मूग, वाटाणा, सोयाबीन, चवळी आणि हरभरा या कडधान्यांमध्ये भरपूर प्रथिने आढळते. पण ज्यांना युरिक अ‍ॅसिडची समस्या छळते. त्यांनी आहारातून डाळींचा समावेश कमी प्रमाणात करावा.

हिवाळ्यात १० मिनिटांत करा आंघोळ, जास्त वेळ लागला तर रक्तप्रवाहात अडथळे, डॉक्टर सांगतात..

युरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी उपाय

युरिक अ‍ॅसिडवर नियंत्रण मिळवण्यासाठी व्यायाम आणि आहाराकडे लक्ष द्यायला हवे. शिवाय ज्यांना याचा त्रास जास्त होतो. त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्वरित उपचार करून घ्यावे.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य