शरीरात बॅड कोलेस्टेरॉल (Cholesterol) वाढलं की, काही ठळक लक्षणे लवकर दिसून येतात. एलडीएलला चांगलं आणि एचडीएलला खराब कोलेस्टेरॉल म्हटलं जातं. एचडीएल म्हणजेच खराब कोलेस्टेरॉल वाढल्यावर पायावर काही विशेष लक्षणे दिसतात. यासह चेहऱ्यावर काही लक्षणं दिसतात. ज्याद्वारे आपल्याला कोलेस्टेरॉल वाढल्याचे संकेत मिळू शकतात. खराब कोलेस्टेरॉल वाढण्यामागे अनेक कारणे असू शकतात (Health Care). जर चेहऱ्यावर काही लक्षणे दिसत असतील तर, वेळीच लक्ष द्या. पण चेहऱ्यावर नक्की कशा प्रकारची लक्षणे दिसतात, या बद्दलची माहिती लखनौचे जनरल फिजिशियन डॉ ब्रिजेंद्र सिंग यांनी माहिती दिली आहे.
यासंदर्भात तज्ज्ञ सांगतात, 'खरं तर, निरोगी पेशी तयार करण्यासाठी शरीराला कोलेस्टेरॉलची आवश्यकता असते, परंतु कोलेस्टेरॉलच्या उच्च पातळीमुळे हृदयविकाराचा झटका आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका वाढतो. अशा स्थितीत वेळीच ओळखणे गरजेचे आहे. जेणेकरून त्यावर नियंत्रण मिळवता येईल'(Can High Cholesterol Affect Your Skin?).
चेहऱ्यावर सूज
डॉ. ब्रिजेंद्र सिंह सांगतात की, कोलेस्टेरॉल जास्त प्रमाणात वाढल्यावर, रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होते, त्यामुळे त्वचेवर आणि शरीराच्या इतर भागावर सूज दिसून येते. अशा परिस्थितीत, चेहऱ्यावर कोणत्याही कारणाशिवाय सूज दिसली, तर त्वरित डॉक्टरांना दाखवा. कारण हे उच्च कोलेस्ट्रॉलमुळे देखील होऊ शकते.
जिने चढताना-चालताना दम लागतो? जीवनशैलीत करा ४ सोपे बदल; पन्नाशीनंतरही राहाल फिट
चेहऱ्यावर पिवळसरपणा
खराब कोलेस्टेरॉलमुळे चेहऱ्यावर पिवळसरपणाही दिसू शकतो. कोलेस्ट्रॉल जमा झाल्यामुळे चेहऱ्याच्या रक्ताभिसरणावर परिणाम होतो. जर आपल्या चेहऱ्याचा रंग पांढरा किंवा फिकट होत असेल तर, डॉक्टरांशी संपर्क साधा.
त्वचेवर गाठ
त्वचेवर निर्माण होणारी गाठ ही कोलेस्टेरॉल जमा होण्याचे लक्षण असू शकते, ज्याला स्किन टॅग देखील म्हणतात. अशा प्रकारचे गाठ डोळ्याभोवती दिसतात. परंतु, लोक सामान्यतः त्वचेची समस्या समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे दुर्लक्ष करू नका.
आपण खाताय ते पोही हेल्दी आहेत? वेट लॉससह इतर फायदे हवे असतील तर, पोहे 'या' तेलात करा..
मुरुमांची समस्या
शरीरात खराब कोलेस्टेरॉलची समस्या वाढल्यास, मुरुमांची समस्या देखील वाढते. खराब कोलेस्टेरॉल वाढल्यावर त्वचेची छिद्रे बंद होतात. त्यामुळे मुरुमांचे डाग यासह इतर समस्या निर्माण होतात. जर योग्य निगा राखूनही मुरुमांपासून सुटका मिळत नसेल तर, शरीरात कोलेस्टेरॉल जमा होण्याचे लक्षण असू शकते.