वजन कमी यासह अनेक कारणांसाठी लोकं सकाळी कोमट पाण्यात मध मिसळून पितात. पण आयुर्वेदानुसार कोमट पाण्यात मध घालून पिणे घातक ठरू शकते. सकाळी आपली पचनशक्ती खूप कमजोर असते. अशावेळी जड अन्न लवक्कर पचत नाही. अशा स्थितीत सकाळी असे पेय प्यावे जे मेटाबॉलिज्म यासह विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतील.
यासंदर्भात, आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. वरलक्ष्मी सांगतात, ''सकाळी बहुतांश लोकं रिकाम्या पोटी कोमट पाणी पितात. काही लोकं कोमट पाण्यात लिंबू, जिरं, मेथी, धणे, मध मिसळून पितात. परंतु, हवामान, ऋतू, या गोष्टी लक्षात ठेऊन या पेयांचे सेवन करावे''(Can I take honey and lemon on empty stomach for weight loss?).
मॉर्निंगसाठी बेस्ट ड्रिंक्स
पचनशक्ती वाढवण्यासाठी यासह विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी सकाळी जिऱ्याचे पाणी प्या.
मधुमेह, वजन कमी करणे आणि हार्मोन्सच्या समस्या कमी करण्यासाठी मेथीचे पाणी प्या.
आजारपणामुळे तोंडाला चव नाही? खा -प्या ३ गोष्टी - तोंडाची चव येईल परत
उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी कोमट पाण्यात धणे उकळून प्या.
हे पेय २० दिवसांपेक्षा जास्त काळ सतत पिऊ नका. थोडे अंतर ठेवा आणि नंतर पुन्हा सुरू करा.
कोमट पाणी आणि लिंबू
वजन कमी करण्यासाठी लोकं कोमट पाण्यात लिंबू मिसळून पितात. काही लोकांना कोमट पाण्यात लिंबू मिक्स करून प्यायल्याने आम्लपित्त, पित्ताचे असंतुलन यासह अनेक त्रास शरीरात निर्माण होतात. ज्यांना ऍसिडिटी झाली असेल तर, त्यांनी ४० दिवसानंतर कोमट पाण्यात लिंबू मिसळून प्यावे.
मध आणि कोमट पाणी
नैसर्गिक मध कोमट पाणी किंवा गरम पदार्थात मिसळून खाऊ नये. यामुळे मधाचे गुणधर्म नष्ट होतात आणि ते विषारी बनते. आयुर्वेदानुसार कोमट पाण्यात मध मिसळून पिणे टाळावे.
पावसाळ्यात दूध पिऊ नये- दही खाऊ नये असं म्हणतात ते खरं की खोटं?
तूप आणि कोमट पाणी
कोमट पाण्यात तुप मिक्स करून प्यायल्याने वात आणि पित्त शांत होते. परंतु, ज्यांना अपचनाचा त्रास आहे, त्यांनी कोमट पाण्यात तूप मिक्स करून पिणे टाळावे.
महत्वाच्या टिप्स
सकाळी रिकाम्या पोटी कोणतेही कच्चे खाद्य पदार्थ खाणे टाळा. कच्चे खाद्य पदार्थ लवकर पचत नाही. यामुळे ब्लोटिंगची समस्या छळू शकते.