Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > नखांवर नखं घासल्याने केसांची वाढ खरंच होते? काय खरं आणि काय खोटं, तज्ज्ञ सांगतात..

नखांवर नखं घासल्याने केसांची वाढ खरंच होते? काय खरं आणि काय खोटं, तज्ज्ञ सांगतात..

Can rubbing your nails together really improve your hairs health? केस वाढण्यासाठी अनेकजण शेकडो उपाय करतात, पण खरंच त्यानं केस वाढतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2023 02:22 PM2023-04-25T14:22:21+5:302023-04-25T14:42:00+5:30

Can rubbing your nails together really improve your hairs health? केस वाढण्यासाठी अनेकजण शेकडो उपाय करतात, पण खरंच त्यानं केस वाढतात?

Can rubbing your nails together really improve your health? | नखांवर नखं घासल्याने केसांची वाढ खरंच होते? काय खरं आणि काय खोटं, तज्ज्ञ सांगतात..

नखांवर नखं घासल्याने केसांची वाढ खरंच होते? काय खरं आणि काय खोटं, तज्ज्ञ सांगतात..

केसांची समस्या सध्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. केस अकाली पांढरे होणे, केस गळती, केसांमध्ये कोंडा, केस गळतीमुळे टक्कल पडणे, या सर्व कारणांमुळे तरुण पिढी त्रस्त आहे. केसांच्या गळतीमुळे टक्कल किंवा केस विरळ होतात. काही वेळेला स्काल्पच्या काही भागात केसांची ग्रोथ खुंटते. केसांच्या रि-ग्रोथसाठी आपण अनेक उपाय करून पाहतो. महागडे प्रॉडक्ट्स यासह आहारात बदल आणि योगाचा देखील दैनंदिन आयुष्यात समावेश करतो. केसांच्या वाढीसाठी आतापर्यंत अनेकांनी  नखांवर नखं घासण्याचा उपाय करून पाहा, असा सल्ला नक्कीच दिला असेल. हे एक योगासना आहे, ज्याला बालायम असे म्हणतात. पण योगामुळे खरंच केसांच्या समस्या सुटतात का?

यासंदर्भात, हेअर ट्रान्सप्लांट सेंटरचे डर्मटोलॉजिस्ट डॉ. धनंजय चव्हाण म्हणतात, ''बालायम ही एक जुनी योगसाधना आहे. हा योग दोन शब्दांनी बनला आहे, बाल आणि व्यायाम. ज्याला योग थेरपी म्हणता येईल. अनेक लोकं या बालायम योगवर विश्वास ठेवतात. ज्यात नखांवर नखे घासण्यात येते. परदेशातील लोकं याला एक्यूप्रेशर थेरपीच्या नावाने ओळखतात''(Can rubbing your nails together really improve your health? ).

बालायम केल्याने केसांची वाढ कशी होते?

स्टेम पेशी सक्रिय करते

डॉ.धनंजय चव्हाण सांगतात, ''आपल्या शरीरात आढळणाऱ्या एडल्ट स्टेम पेशी, केसांची वाढ, केस काळे, आणि केसांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जेव्हा आपण आपली नखे एकत्र घासतो, तेव्हा शरीरातील काही रसायने मेंदूमध्ये सक्रिय होतात. ही रसायने एडल्ट स्टेम पेशी सक्रिय करण्याचे काम करतात. ज्यामुळे केसांची वाढ होते.''

ताक म्हणजे उन्हाळ्यात अमृत, पण मीठ घालून ताकात पिताय का? कुणी टाळलेलंच बरं..

माइंडसेटवर होतो परिणाम

याबाबतीत प्लॅस्टिक सर्जन डॉ.अनिल गर्ग सांगतात, ''जेव्हा आपण माइंडसेटने बालायम हा योग करतो, तेव्हा केसांची चांगली वाढ होते. व केसांची गळती थांबते. बालायम करत असताना आपले रक्त परीसंचरण सुधारते. ज्यामुळे केसांची वाढ होते.

वायब्रेशन निर्माण करते

जेव्हा आपण बालायम योग करतो, तेव्हा शरीरातील ऊर्जेचा प्रवाह वाढतो. यामुळे आपल्या शरीरातील अग्नि तत्व वाढते, व टाळूमध्ये एक प्रकारचे वायब्रेशन निर्माण होते. याला आपण केसांचा मसाज असेही म्हणू शकतो. त्यामुळे केसगळती कमी होऊन नवीन केस येतात.

उन्हाळ्यात जुलाब, युरिन इनफेक्शनचा तर त्रास वाढला नाही? तुमचं पाणी शुद्ध आहे का..

बालायम योग करण्याची योग्य पद्धत

डॉ.धनंजय सांगतात, ''बालायम हा योग आपण योगाप्रमाणे करू शकता. सर्वप्रथम रिकाम्या जागेत योगा चटई टाकून योगाच्या मुद्रेत बसा. यानंतर दोन्ही हात चोळा, आता दीर्घ श्वास घ्या व सोडा, तसेच हातांची नखे एकमेकांवर घासा. हा योग निदान तीन - चार महिने करा, याने नक्कीच केसांना फायदा होईल.

Web Title: Can rubbing your nails together really improve your health?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.