वजन वाढण्याची समस्या आजकाल खूपच कॉमन झाली आहे. वाढत्या वजनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित वर्कआऊट तर काहीजण चालायला जातात. (Weight Loss Tips) रोज व्यायाम आणि डाएट करूनही हवातसा बदलल शरीरात दिसत नाही. याचं कारण झोपेच्या वेळा, व्यस्त जीवनशैली असू शकते. शरीरात असे काही हॉर्मोन्स वाढतात ते मेटाबॉलिझ्म डिस्टर्ब करतात त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता जास्त असते. (Why Is Sleep Important to Weight Loss)
जास्त झोपल्यानं वजन कमी करण्यास मदत होते (Does sleep affect weight loss)
फिटनेस एक्सपर्ट गुंजन यांनी सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त झोप घेत असाल तर नक्कीच तुमचं वजन वाढू शकतं. याचा अर्थ असा नाही की कमी झोपून तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता. गुंजन यांनी सांगितले की जर तुम्ही एक दिवससुद्धा कमी झोप घेतली तर शरीरातील ग्रेलिन (Ghrelin) हार्मोन वाढतात. (The relationship between sleep and weight loss)
ग्रेलिन हॉर्मोन भूक म्हणजेच एपेटाईट कंट्रोल करण्यात मदत करतो. जेव्हा तुम्हाला सतत भूक लागते तेव्हा तुम्ही भूक दूर करण्यासाठी काहीतरी खाल्ल्यानं शरीरात अतिरिक्त कॅलरीज वाढतील. त्यामुळे तुमचे वजनही वेगाने वाढू लागते. म्हणूनच असे म्हणता येईल की वजन आणि रात्रीच्या झोपेचा खोल संबंध आहे.
मेडिकल न्यूज टुडेच्या रिपोर्टनुसार २०२१ च्या एका अभ्यासात दिसून आलं की स्लिम एपनियानं पीडित असलेल्या लोकांना १२ महिने चांगली झोप आली त्याचं वजनही वेगानं कमी झालं. या अभ्यासात दिसून आलं की जे लोक कमी झोपतात किंवा अन्हेल्दी फूड्स, फ्राईड स्नॅक्स खाता त्यांना रात्रभर क्रेव्हींग्स कंट्रोल होत नाही आणि दिवसभर क्रेव्हिंग्स येत राहतात. जर तुम्ही रात्री ७ ते ८ तासांची झोप घेतली तर वजन वाढणं टाळता येऊ शकतं.