Join us   

साउथमध्ये घरोघरी जसं दही खातात, ‘तसं’ खा, बॅड कोलेस्टेरॉल विसरा आणि वजनही होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2024 3:51 PM

Can Yogurt Lower Your Cholesterol? : कोलेस्ट्रॉल कमी होईल, हाडांना अधिक मजबुती मिळेल, फक्त दही कोणत्या वेळेत खाऊ नये पाहा..

उन्हाळा सुरु झाला की, आपण दह्याचे पदार्थ आवर्जून खातो (Curd). दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात, जे गुड बॅक्टेरियासारखे काम करतात (Health Tips). जे पचनक्रिया सुधारतात, आणि पोषक तत्व शरीरात सहजपणे शोषण्यास मदत करतात. दही खाल्ल्याने पोट फुगणे, गॅस आणि अपचन यांसारख्या समस्याही कमी होतात. शिवाय त्यातील पौष्टीक घटकांमुळे बॅड कोलेस्टेरॉल कमी करणे आणि हाडांनाही मजबुती देते. पण मुळात दही कधी आणि कोणत्या पद्धतीने खावे हे आपल्याला ठाऊक असायला हवे.

भारतातील प्रसिद्ध हार्ट डॉक्टर बिमल छाजेड यांच्या मते, 'जर आपण फॅटी दुधाचे दही खात असाल तर, आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. दही खाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यातून शक्य तितके फॅट्स काढून टाकणे. जर आपल्या शरीराला दह्यातून पुरेपूर पौष्टीक घटक मिळावे असं वाटत असेल तर, दह्याचा आहारात समावेश करताना दक्षिण भारतीय पद्धतीने करा'(Can Yogurt Lower Your Cholesterol?).

दही खाण्याची योग्य वेळ

दही खाण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे दुपारच्या जेवणासोबत खाणे. बरेच जण सकाळी किंवा रात्री डिनरसोबत दही खातात. परंतु, सकाळी किंवा संध्याकाळी दही खाल्ल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. यामुळे सर्दी, पित्त आणि कफ वाढते. जर आपण हृदयाचे रुग्ण असाल तर, नेहमी कमी फॅट्सयुक्त दही खा. फुल क्रीमपासून तयार दही खाणं टाळा.

नेहमी ताजे दही खा

डॉक्टरांच्या मते, नेहमी फ्रेश दही खावं. बरेच लोक साठवलेले दही खातात. पण अधिक काळ साठवून ठेवलेले दही खाल्ल्याने आरोग्याला गंभीर हानी पोहचू शकते.

FSSAI म्हणते 'या' पिठाच्या चपात्या खा; बीपीही नॉर्मल आणि हाडंही होतील मजबूत! पाहा कोणतं ते पीठ

वजन कमी करण्यास मदत

जर आपल्याला वेट लॉससाठी दही खायचं असेल तर, आपण कमी फॅटचे दही खाऊ शकता. किंवा आपण ताक देखील पिऊ शकता. नॅशनल इन्सिट्यूट ऑफ हेल्थने केलेल्या अभ्यासानुसार, दह्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, मिनरल्स, विटामिन्स अशी पोषक तत्वे आढळतात. ज्यामुळे शरीराला फायदाच होतो. शिवाय वेट कण्ट्रोलमध्ये राहण्यात मदत मिळते.

या गोष्टी दह्यात मिसळा आणि खा

साखर, मध, गूळ आणि मीठ किंवा काळे मीठ घालून दही केव्हाही खाल्ल्यास उत्तम. यामुळे दह्यातील श्लेष्मा निर्माण करणारे गुणधर्म कमी होतात. जर आपल्याला जेवणासोबत दही खायचं असेल तर, त्यात भाज्या आणि मीठ मिसळून खा.

१ रुपयाही खर्च न करता सुटलेलं पोट कमी करायचं? वाचा विराट कोहलीच्या न्यूट्रिशनिस्टने दिलेला सल्ला

दही कधी खाऊ नये?

हिवाळा आणि वसंत ऋतूमध्ये कधीही दही खाऊ नका. दह्यामध्ये जीवनसत्त्वे, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी आ६णि व्हिटॅमिन बी१२ आढळतात. दक्षिण भारतात, दही पाण्यात मिसळून प्यायले जाते. आपण देखील दही पाण्यात मिसळून पिऊ शकता. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य