Join us   

दूध पूर्णान्न म्हणून उपवासाला फक्त दूधच पिताय ? थांबा, डॉक्टर सांगतात, अशी चूक पडेल महागात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2024 8:25 PM

What Happens If You Drink Only Milk For 9 Days In Navratri How Effects In Stomach & Body : Can You Drink Only Milk During Fasting : Can we drink only milk during a fast : उपवासाला काही न खाता फक्त दूध पिणे हे कितपत योग्य आहे, पोषणतज्ज्ञ सांगतात यावरचे नेमके उत्तर...

सध्या बऱ्याचजणांचे नवरात्रीचे उपवास सुरु आहेत. काहीजण संपूर्ण नऊ दिवस उपवास करतात तर काही फक्त पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करतात. उपवास म्हटलं की आपल्याला काही मोजकेच पदार्थ खाता येतात. यामुळे या उपवासाच्या नऊ दिवसात आपल्या खाण्यावर खूप बंधन येतात. उपवासाला शक्यतो आपण दूध, फळं, ड्रायफ्रुटस, फराळाचे पदार्थ असे काही ठराविकच पदार्थ खातो. आपल्यापैकी काहीजण असे असतात जे संपूर्ण नऊ दिवस फक्त लिक्विड पिण्यावरच अधिक भर देतात. यात फळांचे ज्यूस, दही, ताक, दूध असे द्रव पदार्थ पिऊनच उपवास करतात. यातही काहीजणांचा असा समज असतो की दूध हे पूर्णान्न आहे, त्यामुळे उपवासाचे संपूर्ण नऊ दिवस फक्त दूध प्यायले तरी चालते(Can we drink only milk during a fast).

दुधातून आपल्या शरीराला आवश्यक ती पोषक तत्व मिळतात, पण म्हणून उपवासाला काही न खाता फक्त दूध पिणे हे कितपत योग्य आहे ? याचबरोबर उपवासाला काही न खाता फक्त दूध प्यायल्याने त्याचे आपल्या आरोग्यावर कोणते परिणाम होतात याबद्दल पोषणतज्ज्ञ डॉ. प्रियंका रोहतगी यांनी अधिक माहिती दिली आहे. उपवासाला फक्त दूध पिणे योग्य की अयोग्य याबद्दल त्या नेमकं काय सांगतात ते पाहूयात(Can You Drink Only Milk During Fasting).

उपवासाला फक्त दूध प्यायल्याने काय होत ? 

डॉ. प्रियंका रोहतगी यांच्या म्हणण्यानुसार, दूध हे खरंतर पूर्णान्न आहे. दुधातून आपल्या शरीराला आवश्यक ती संपूर्ण पोषक तत्व मिळतात. दुधातील याच महत्वपूर्ण गुणधर्मामुळे लहान बाळाला किमान पहिले ६ महिने तरी फक्त आईचेच दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. असे असले तरी आईचे दूध आणि गाई म्हशीचे दूध यात फार मोठा फरक असतो. याचप्रमाणे आपण जसजसे वयाने मोठे होत जातो तसतसे आपल्या पोटात लाखो बॅक्टेरिया - जीवाणू वाढतात ज्यामुळे आपल्या पोटात एक प्रकारचे वातावरण तयार होते. पोटातील या वातावरणाच्या मदतीने आपण जे काही अन्न खातो ते पचवले जाते.

उपवासाला फक्त तेलकट -कोरडंकोरडं न खाता आहारात हवेत हे ४ पदार्थ, उपवासाने शरीराला होईल फायदा...

आपल्या पोटात असणारे हे जीवाणू आपल्याला अन्न पचवण्यास मदत करतात. त्यामुळे मानवी पोट हळूहळू त्याची वेगळी अवस्था प्राप्त करून त्यानुसार अन्नाचे पचन करते. बाल्यावस्थेनंतर पोटात अनेक बदल होतात आणि दुधाशिवाय इतर अनेक प्रकारचे अन्न पचवण्याची क्षमता विकसित होते. या स्थितीत जर आपण फक्त दूध पिऊन काही दिवस राहायचे ठरवले तर ते शक्य होत नाही. यासोबतच, आपले शरीर निरोगी राहावे म्हणून सगळ्या प्रकारचे पदार्थ खाणे गरजेचे असते. आपल्या निरोगी शरीरासाठी सगळ्या प्रकारचे पोषक घटक मिळणे आवश्यक असते. यामुळेच उपवासाला फक्त दूध पिणेच पुरेसे नसते. जर आपण उपवासाचे नऊ दिवस फक्त दूध पिऊन राहायचे ठरवले तर आपले आरोग्य बिघडून आपण आजारी पडू शकतो.

उपवासाला फक्त दूधच प्यायल्याने कोणत्या शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो ? 

काहीजण उपवासाला फक्त दूध पिणेच पसंत करतात. परंतु डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हे चुकीचे आहे. उपवासाला काहीही न खाता फक्त दूध प्यायल्याने दुधातील लॅक्टोजचे प्रमाण आपल्या शरीरात वाढते. दुधातील लॅक्टोज आपल्या आतड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर साठून राहते. यामुळे आपल्या आतड्यातील चांगले बॅक्टेरिया मारले जातात.

वजन कमी व्हावे म्हणून उपवासाला फक्त फळच खाता? डॉक्टर सांगतात, हे योग्य का अयोग्य...

आपल्या शरीरातील चांगल्या बॅक्टेरियाचे प्रमाण कमी झाल्याने आपोआप वाईट बॅक्टेरियाचे प्रमाण वाढू लागेल, यामुळे आपल्या आतड्यांचे आरोग्य खराब होते. अशा स्थितीत आपल्याला लूज मोशन, गॅस, अपचन, डोकेदुखी, पोट फुगणे यासारख्या शारीरिक समस्या त्रास देऊ शकतात. आजकाल अनेकजण वजन कमी करण्यासाठी काही दिवस फक्त दूध पिण्याचा सल्ला देतात, पण ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे. यामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होईल आणि तुम्हाला अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो.

टॅग्स : शारदीय नवरात्रोत्सव २०२४आरोग्यहेल्थ टिप्सनवरात्रीनवरात्री उपवास आणि पदार्थ २०२४