Join us   

रात्री भात उरला तर फ्रिजमध्ये ठेवता? तज्ज्ञ सांगतात, वाढतो अपचनाचा त्रास-विषबाधेचाही धोका कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2024 6:47 PM

Can you reheat rice? Tips for preventing food poisoning : फ्रिजमधला शिळा भात खात असाल तर सावधान..

बहुतांश घरांमध्ये उरलेलं अन्न हे फ्रिजमध्ये ठेवलं जातं (Rice). यामुळे अन्न लवकर खराब होत नाही. शिवाय पुन्हा गरम करून आपण खाऊ शकतो. पण काही पदार्थ आपण फ्रिजमध्ये ठेवून चूक करतो (Health Tips). काही पदार्थ रेफ्रिजरेटरमध्ये साठवून ठेवल्यास नुकसान होऊ शकते (Food Poisoning). शिवाय पुन्हा गरम करून खाल्ल्यास शरीरातील टॉक्सिन्स वाढू शकतात. ज्यात भाताचाही समावेश आहे.

बरेच लोक फ्रिजमध्ये भात स्टोअर करून ठेवतात. जे योग्य नाही. फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवलेला भात खाऊ नये?  याची माहिती आरोग्य तज्ज्ञ डॉ. डिंपल यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून दिली आहे(Can you reheat rice? Tips for preventing food poisoning).

तज्ज्ञांच्या मते, शिजवलेला भात पुन्हा गरम करून खाल्ल्यास शरीरातील टॉक्सिन्स वाढवते. कच्च्या तांदळात बॅसिलस सेरियस नावाचा जीवाणू आढळतो, ज्यामुळे अन्नातील विषारी पदार्थ वाढू शकतात. तांदूळ शिजल्यानंतर हे बॅक्टेरिया जास्त वाढू लागतात. जर भात शिजल्यानंतर जास्त वेळ खोलीच्या तापमानात ठेवला तर हे बॅक्टेरिया वाढू लागतात. जे शरीरासाठी हानीकारक ठरते.

सत्तरी पार करणारी रेखा 'या' ट्रेण्डी साड्यांमुळे दिसते तिशीतली; ट्राय करा 'हे' ७ सुंदर साड्या - मिळेल रिच लूक

शिजवलेला भात रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याने कोणत्या समस्या निर्माण होतात?

पचनक्रिया समस्या

पांढऱ्या तांदळात बॅसिलस सेरियस बॅक्टेरियाचे प्रमाण जास्त असते. तयार भात तांदूळ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याने भांड्याच्या तळाशी, बुरशी निर्माण होते. ज्यामुळे पचनक्रियेत अडथळे निर्माण होतात.

उलट्या

भात अधिक वेळ स्टोअर करून ठेवल्यास, त्यात बुरशी तयार होतात. त्या बुरशीमुळे मायकोटॉक्सिन होऊ शकतात. भातामध्ये बुरशी लवकर दिसू लागते. ज्यामुळे अपचन, लट्या आणि जुलाब यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

ऐन तारुण्यात पायऱ्या चढताना दम लागतो - श्वास फुलतो? ५ गोष्टी; दम लागणं बंद - ताकद वाढेल

विषबाधा

अधिक वेळ स्टोअर करून ठेवलेला भात खाल्ल्याने अन्नातून विषबाधा होण्याचा धोका निर्माण होतो. ज्यामुळे भातामध्ये बॅक्टेरिया वाढू लागतात, आणि अपचनाचा त्रास होऊ लागतो. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यअन्न