Join us   

Cancer and food :  जेवणात हे ५ पदार्थ जास्त खाल्ल्यानं वाढतो जीवघेण्या कॅन्सरचा धोका; डॉक्टरांनी सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 12:21 PM

Cancer and food : लवकर लक्षणं ओळखल्यास, या रोगांवर उपचार केले जाऊ शकतात जेणेकरून कॅन्सरचा धोका टाळता येईल.

कोरोनाकाळात सर्वाधिक लोकांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला सुरूवात केली. लॉकडाऊन उघडल्यानंतर परत जैसे थे अशी स्थिती पाहायला मिळतेय. बाहेरचं खाणं लोकांनी सुरू केलंय. खाण्यापिण्यात अनियमितता दिसून येतेय याच कारणामुळे लोकांना सजग राहण्याचं आवाहन केलं जात आहे. तुम्हाला माहितच असेल की जर तुम्ही निरोगी खाल तरच तुम्हाला उत्साही वाटेल आणि तंदुरुस्त व्हाल.  अन्नामध्ये ट्रान्स फॅट आणि रिफाइंड उत्पादने जास्त असतील तर आळस आणि आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. तसंच, चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे यकृत, मूत्रपिंड आणि हृदयाशी संबंधित आजार होऊ शकतात.

कामाच्या नादात अनेक महिला जेवणाच्या वेळा चुकवतात. सतत असाच प्रकार सुरू राहिल्यास गंभीर आजार होण्याची शक्यता असते.  लवकर लक्षणं ओळखल्यास, या रोगांवर उपचार केले जाऊ शकतात जेणेकरून कॅन्सरचा धोका टाळता येईल. सत्यवाडी राजा हरिश्चंद्र शासकीय रुग्णालयाचे वरिष्ठ  (MBBS MS) डॉ. पर्व शर्मा यांनी 5 प्रकारचे अन्न पदार्थ खाताना सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. जेणेकरून कॅन्सरचा धोका टाळता येऊ शकतो. 

अन्न कॅन्सरचं कारण कसं ठरू शकतं?

डॉ. पर्व कुमार शर्मा यांचा असा विश्वास आहे की कर्करोग हे जगभरातील मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे, परंतु संबंधित जीवनशैलीत बदल करून हे टाळता येऊ शकते. शरीरात विविध कारणांमुळे कॅन्सरच्या पेशी वाढतात  शारीरिक हालचालींचा अभाव, धूम्रपान, लठ्ठपणा, अल्कोहोल आणि अतिनील किरणांचा संपर्क इतर काही घटक आहेत जे त्यांची भूमिका बजावू शकतात. तज्ञांचे म्हणणे आहे की संशोधनामध्ये असेही वाढते पुरावे आहेत की आपल्या आहाराच्या सवयी कॅन्सरचा धोका वाढवू किंवा कमी करू शकतात. अलर्ट! फक्त छातीत दुखणं नाही तर 'ही' ३ लक्षणं आहेत हार्ट अटॅकचे संकेत; जाणून घ्या बचावाचे उपाय

प्रोसेस्ड मीट

डॉक्टर म्हणतात की एनिमल बेस्ड आणि खारट करून साठवलेले कोणतेही उत्पादन घेणे आपल्या आरोग्यासाठी हानीकारक आहे. या पदार्थांमुळे वजन वाढण्यापासून ते कॅन्सरपर्यंत आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. डॉ.ने सांगितले की प्रक्रिया केलेल्या मांसापासून एक संयुग तयार होते ज्यात कार्सिनोजेन्स असू शकते. यामुळे एखाद्या व्यक्तीला कोलोरेक्टल आणि कोलन कॅन्सर होण्याचा धोका वाढू शकतो. हॉट डॉग, सलामी आणि सॉसेजसारख्या प्रक्रिया केलेल्या मांसाऐवजी घरी  ताजं मांस शिजवून शकता.  कपडे धुताना तुम्हीसुद्धा 'ही'च चूक करताय? थांबा, समोर आला डिटर्जेंट कंपनीचा आर्श्चयकारक रिपोर्ट

तळलेले खाणं

तळलेले पदार्थ जास्त खाल्ल्याने शरीरातील कर्करोगाच्या पेशींचा विकार होऊ शकतो. जेव्हा बटाटे किंवा मांसासारखे पदार्थ उच्च तापमानावर तळलेले असतात, तेव्हा क्रिलामाइड नावाचे संयुग तयार होते. संशोधनाचा हवाला देत, डॉ पर्व म्हणतात की या कंपाऊंडमध्ये कार्सिनोजेनिक गुणधर्म आहेत आणि अगदी डीएनएचे नुकसान करतात. याव्यतिरिक्त, तळलेले पदार्थ शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण आणि जळजळ देखील वाढवू शकतात जे कॅन्सरच्या पेशींच्या वाढीशी जोडलेले आहेत. 

रिफाईन उत्पादनं

डॉक्टर म्हणतात की, रिफाईन पीठ, साखर किंवा तेल कर्करोगाच्या पेशी विकसित होण्याचा धोका वाढवतात. जास्त प्रमाणात रिफाईन साखर आणि कार्बोहायड्रेट शरीरात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि जळजळ होण्याचा धोका वाढवू शकतात, जे शरीरातील विविध प्रकारच्या कॅन्सरसाठी कारणीभूत ठरते. 

ज्या लोकांच्या आहारात रिफाईन उत्पादने जास्त प्रमाणात असतात त्यांना स्तन आणि एंडोमेट्रियल (गर्भाशयाच्या) कर्करोगाचा धोका जास्त असतो. म्हणून, आपण या प्रकारच्या अन्नाचे सेवन अगदी कमी प्रमाणात केले पाहिजे. साखरेऐवजी गूळ किंवा मध घ्या. रिफाईन तेलाऐवजी मोहोरीचे तेल किंवा तूप वापरू शकता. 

मद्यपान/ धुम्रपान

अल्कोहोलिक आणि कार्बोनेटेड पेये दोन्हीमध्ये रिफाईन साखर आणि कॅलरी असतात. दोनपैकी एका द्रवपदार्थाचा जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरात फ्री रॅडीकल्सची संख्या वाढू शकते ज्यामुळे जळजळ होऊ शकते. अल्कोहोल रोगप्रतिकारक कार्यास देखील बिघडवते.

डबाबंद पॅक्ड फूडचे सेवन

पॅकेज केलेले पदार्थ खाण्याचा ट्रेंड भारतात हळूहळू आणि सातत्याने वाढत आहे. आता तुम्हाला पॅकेज केलेल्या उत्पादनांमध्ये बाजारात सर्वकाही सहज सापडेल जे शिजवणे देखील खूप सोपे आहे. झटपट पोहे, नूडल, इडली, उपमा, पास्ता असे अनेक प्रकारचे पॅक केलेले पदार्थ आहेत जे तुम्ही निवडू शकता.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यकर्करोग