Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > रोजच्या खाण्यातील ८ पदार्थांमुळे होऊ शकतो कॅन्सर; आजच सवयी बदला, जीवघेणे आजार दूर राहतील

रोजच्या खाण्यातील ८ पदार्थांमुळे होऊ शकतो कॅन्सर; आजच सवयी बदला, जीवघेणे आजार दूर राहतील

Cancer Causing Foods : हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार प्रोसेस्ड मीट, रिफाईन कार्बोहायड्रेड्स, जास्त भाजलेले किंवा तळलेले पदार्थ कॅन्सरचा धोका वाढवतात. 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 03:07 PM2023-12-14T15:07:54+5:302023-12-14T16:48:25+5:30

Cancer Causing Foods : हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार प्रोसेस्ड मीट, रिफाईन कार्बोहायड्रेड्स, जास्त भाजलेले किंवा तळलेले पदार्थ कॅन्सरचा धोका वाढवतात. 

Cancer Causing Foods : Eight Cancer Causing Foods According to Dietician | रोजच्या खाण्यातील ८ पदार्थांमुळे होऊ शकतो कॅन्सर; आजच सवयी बदला, जीवघेणे आजार दूर राहतील

रोजच्या खाण्यातील ८ पदार्थांमुळे होऊ शकतो कॅन्सर; आजच सवयी बदला, जीवघेणे आजार दूर राहतील

चांगल्या आरोग्याासाठी तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी चांगल्या असणं गरजेचं असते. अन्यथा कमी वयातच कोलेस्टेरॉल, थायरॉईल, पचनाशी संबंधित आजार, लठ्ठपणाची समस्या उद्भवते. पॅकेज फुड्स, कोल्ड ड्रिंक्स, चॉकलेट, ब्रेड, बटर  यासांरखे रोजच्या खाण्यातले पदार्थ तब्येतीसाठी नुकसानकराक ठरतात. (Food That May Increase Your Risk Of Cance) हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार प्रोसेस्ड मीट, रिफाईन कार्बोहायड्रेड्स, जास्त भाजलेले किंवा तळलेले पदार्थ कॅन्सरचा धोका वाढवतात.  आहारातज्ज्ञ प्रियांशी भटनागर यांच्यामते लाईफस्टाईलशी संबंधित गंभीर आजारांपासून बचाव करायचा असेल तर रोजच्या खाण्यातले काही धोकादायक पदार्थ किचनमधून दूर करावे लागतील.  (Eight Cancer Causing Foods According to Dietician)

१) हायड्रोजन व्हेजिटेबल ऑईल

हायड्रोजन व्हेजिटेबल ऑईल तुमच्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. यात हायड्रोजन फॅट्सचे प्रमाण अधिक असते. ज्याला ट्रांस फॅट असं म्हटलं जातं. ट्रांस फॅट हृदय रोग आणि अन्य आरोग्याच्या समस्या वाढू शकते. याशिवाय तुम्ही नारळाचे तेल, कोको बटर किंवा ऑलिव्ह ऑईलचा वापर करू शकता. 

२) मैदा

मैद्याचे पोषण मूल्य शुन्य आहे. हे एक स्टार्च आहे. ज्याला ब्लिच केले जाते. मैद्याऐवजी तुम्ही आहारात गहू, ज्वारी, बाजरी, जवस यांसारख्या पदार्थांचे सेवन करू शकता. मोड आलेली कडधान्य तसंच ग्लुटेन फ्री उत्पादनांचा वापर करा. 

३) सॉफ्ट ड्रिंक्स

सॉफ्ट ड्रिंक्समध्ये हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरपचे प्रमाण अधिक असते. यात पोषक तत्व कमी आणि कॅलरीजचे प्रमाण अधिक असते. त्यातील घटक तुमची साखरेची पातळी वाढवू शकतात. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी फ्रेश ज्यूस किंवा पिण्याच्या पाण्याचे सेवन करा.

कोण म्हणतं प्रोटीनसाठी खूप खर्च लागतो? 20 रुपयांत भरपूर प्रोटीन देतील ५ पदार्थ, मजबूत होतील हाडं

४) लो फॅट प्रोसेस्ड फूड

लो फॅट आणि फॅट फ्री असल्याच्या दावा करणाऱ्या पदार्थांमध्ये  केमिकल्स, एडिटिव्ह आणि प्रेजर्व्हेटिव्हज असतात.  यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढण्याचा धोका जास्त असतो. म्हणून नैसर्गिक फॅट्सयुक्त पदार्थांचे सेवन करा.

५) व्हाईट आणि ब्राऊन ब्रेड

व्हाईट ब्रेडबरोबरच ब्राऊन ब्रेडही तब्येतीसाठी नुकसानकारक ठरतो ब्राऊन ब्रेड गव्हापासून तयार केलेला असतो पण अनेकदा तो गव्हापासून बनवला जात नसून त्यात सिंथेटिक कलरचा वापर केला जातो. सिंथेटिक कलर ब्रेड तब्येतीसाठी नुकसानकारक ठरतो. 

६) फ्राईड फ्रोजन फूड

फ्राईड फ्रोजन फूडसचे सेवन केल्याने तब्येतीच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. यातील विषारी पदार्थ तब्येतीसाठी नुकसानकारक ठरतात. जास्त मीठ-तेलयुक्त पदार्थांपासून लांब राहा.

पोट सुटण्याच्या भितीने भात कमी खाता? या पद्धतीने हवा तितका भात खा-१ किलोही वजन वाढणार नाही

७) पांढरी साखर

साखर ही एखाद्या विषाप्रमाणे आहे. आहारात साखरेचे जास्त प्रमाण हृदयाचे विकार, त्वचेचे विकार, डायबिटीस, कॅन्सर, त्वचा लूज होणं, सुरकुत्या यांचे कारण ठरू शकते.

८) बटर

बटर आजकाल प्रत्येक भाजीत आणि पदार्थात वापरले जाते. जास्त प्रमाणात बटर खाल्ल्याने कोलेस्टेरॉल जमा होते यामुळे हृदयाचे गंभीर आजार होऊ शकतात. 
 

Web Title: Cancer Causing Foods : Eight Cancer Causing Foods According to Dietician

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.