Join us   

रोजच्या जेवणातील 'हे' चार पदार्थ वाढवताहेत जीवघेण्या कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2021 11:38 AM

Cancer : उच्च तापमानावर शिजवलेले, तळलेले, भाजलेले किंवा ग्रिल केलेले अन्न कॅन्सरच्या धोका वाढवू शकते.

भारतात दिवसेंदिवस कॅन्सरच्या रुग्णांमध्ये  वाढ होत आहे. अनियमित जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होताना दिसून येतोय. चांगल्या दिनचर्येसोबतच आपल्याला खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्यायला हवं. काही पदार्थांचे सेवन मर्यादित प्रमाणात करायला हवं जेणेकरून कॅन्सरचा धोका वाढणार नाही. डायटिशियन प्रिया पांडेय यांनी एक वेबसाईडशी बोलताना कॅन्सरचा  धोका कमी करण्यसाठी आहारातून कोणते पदार्थ वगळायला हवेत याबाबत सांगितले आहे. 

जास्त शिजलेले अन्नपदार्थ

उच्च तापमानावर शिजवलेले, तळलेले, भाजलेले किंवा ग्रिल केलेले अन्न कॅन्सरच्या धोका वाढवू शकते. हे हेट्रोसायक्लिक अमाईन्स आणि ग्लाइकेशन प्रॉडक्ट्स सारख्या हानिकारक संयुगांचे उत्पादन वाढवते.  जे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरतात. 

प्रोसेस्ड मीट

प्रक्रिया केलेल्या मांसाच्या अतिसेवनामुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो. असे इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरने म्हटले आहे. त्यांच्या मते, प्रक्रिया केलेल्या मांसाच्या अतिसेवनानं कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो. कारण या मांसाला चव देण्यासाठी वापरलेले मीठ आणि धूर कोलन कॅन्सरचा धोका वाढवू शकतात.

प्रोसेस्ड फूड

प्रक्रिया केलेल्या पदार्थांचा जास्त वापर केल्याने कॅन्सरचा धोका देखील वाढू शकतो. खरं तर, या पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, आणि त्याच वेळी ते पोषक तत्व आणि फायबरर्स कमी प्रमाणात असतात, ज्यामुळे या गोष्टींमुळे रक्तातील साखर वाढते आणि यामुळे अनेक प्रकारच्या कॅन्सरचा धोका वाढू शकतो.

खारट पदार्थ

खारट पदार्थांचा जास्त वापर कॅन्सरचा धोका वाढवू शकतो. यामध्ये लोणचं, फराळ, मासे आणि मसालेदार भाज्यांचा समावेश आहे. ज्यामुळे कोलन कॅन्सरचा धोका वाढू शकतो. अशा पदार्थांचे  जास्त सेवन हृदयाच्या आरोग्यासाठी  धोकादायक ठरते. म्हणून आहारात खारट पदार्थांचा आणि मीठाचा वापर खूप कमी असावा. 

रात्री उशीरा जेवण करण्याची सवय माणसाला मोठ्या अडचणीत टाकू शकते. इंटरनॅशनल जर्नल ऑफ कॅन्सरच्या एका रिपोर्टनुसार, रात्री उशीरा जेवण केल्याने लोकांना ब्रेस्ट आणि प्रोस्टेट कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो. हा रिसर्च एका खाण्या-पिण्याच्या सवयीच्या एका अशा डेटावर आधारित आहे ज्यात लोकांना झोप आणि जेवणाच्या वेळेबाबत प्रश्न विचारण्यात आले होते.

अभ्यासकांनी या रिसर्चमध्ये प्रोस्टेट कॅन्सरच्या ६२१ केसेस आणि ब्रेस्ट कॅन्सरच्या १२०५ केसेसवर लक्ष केंद्रीत केलं होतं. ज्यात ८७२ पुरूष आणि १३२१ महिलांचा समावेश होता.  या लोकांच्या झोपेचा आणि खाण्या-पिण्याच्या सवयीची तुलना सामान्य लोकांच्या सवयींसोबत केली गेली.

जेवून लगेच झोपणाऱ्यांनी सावधान 

अभ्यासकांनी या रिपोर्टमध्ये दावा केलाय की, रात्री जेवणानंतर लगेच झोपणाऱ्या लोकांमध्ये कॅन्सरचा धोका अधिक राहतो. रात्री जेवणानंतर दोन तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ जास्त जागणाऱ्यांमध्ये ब्रेस्ट आणि प्रोस्टेट कॅन्सरचा धोका २० टक्के कमी आढळून आला. रात्री उशीरा जेवण करणाऱ्यांच्या टायमिंगबाबतही अभ्यासकांनी धक्कादायक आकडेवारी समोर आणली आहे.

रात्री कधी जेवणं सुरक्षित ?

अभ्यासकांनी रात्री ९ वाजताच्याआधी जेवण करणाऱ्यांमध्ये कॅन्सरचा धोका कमी असण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यांचं मत आहे की रात्री १० वाजतानंतर जेवण करणाऱ्यांमध्ये ९ वाजताच्या आधी जेवण करणाऱ्यांच्या तुलनेत कॅन्सरचा धोका जास्त  असतो. ही आकडेवारी फूड आणि कॅन्सरवरील अभ्यासात शरीराच्या इंटरनल क्लॉक किंवा स्कार्डियन रिदम्सच्या महत्वावर जोर देते. या रिसर्चचे मुख्य अभ्यासक डॉ. मनोलिस कोजेविनास सांगतात की, 'जर हे निष्कर्ष निश्चित झाले तर याने कॅन्सरला आळा घालण्यासाठी मोठा फायदा होऊ शकतो खासकरून त्या लोकांसाठी जे रात्री अवेळी जेवण करत नाही'. या रिसर्चचा प्रभाव दक्षिण यूरोपसारख्या काही संस्कृतींसाठी महत्वपूर्ण होऊ शकतो जिथे लोकांना रात्री उशीरा जेवण करण्याची सवय असते.  

टॅग्स : कर्करोगहेल्थ टिप्सआरोग्य