Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Cancer : चपाती खाल्ल्यानं वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या प्रकारच्या गव्हावर संशोधनाला सुरूवात, तज्ज्ञांचा इशारा

Cancer : चपाती खाल्ल्यानं वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या प्रकारच्या गव्हावर संशोधनाला सुरूवात, तज्ज्ञांचा इशारा

Cancer : अलिकडे ब्रिटिश शास्त्रज्ञांनी कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी गव्हाच्या नवीन जातीचा शोध लावला आहे. शास्त्रज्ञांनी जनुक संपादन तंत्राने गव्हाची एक नवीन प्रजाती तयार केली आहे जी कॅन्सरपासून बचाव करण्यास मदत करू शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 11:45 AM2021-09-08T11:45:58+5:302021-09-08T12:14:32+5:30

Cancer : अलिकडे ब्रिटिश शास्त्रज्ञांनी कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी गव्हाच्या नवीन जातीचा शोध लावला आहे. शास्त्रज्ञांनी जनुक संपादन तंत्राने गव्हाची एक नवीन प्रजाती तयार केली आहे जी कॅन्सरपासून बचाव करण्यास मदत करू शकते.

Cancer : Scientists are growing genetically modified wheat crops which can reduce the risk of cancer | Cancer : चपाती खाल्ल्यानं वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या प्रकारच्या गव्हावर संशोधनाला सुरूवात, तज्ज्ञांचा इशारा

Cancer : चपाती खाल्ल्यानं वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या प्रकारच्या गव्हावर संशोधनाला सुरूवात, तज्ज्ञांचा इशारा

Highlightsकॅन्सरपासून बचावासाठी शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या गव्हाच्या प्रजातींमध्ये एस्पार्जिन नावाच्या अमीनो आम्लाचे प्रमाण कमी केले आहे. जीन तंत्रज्ञानाद्वारे युरोपमध्ये पहिल्यांदाच गव्हाचे पीक घेतले जात आहे,  चीन आणि अमेरिकेने हे तंत्र फार पूर्वी वापरून पाहिले होते.

आपल्या रोजच्या जेवणात चपातीचा समावेश असतोच. चपातीच्या सेवनाबाबत तज्त्रांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे.  भारतात कॅन्सरच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस अधिकाधिक वाढ होत आहे. नॅशनल कॅन्सर रजिस्ट्री प्रोगाम रिपोर्टनुसार कॅन्सरच्या सध्याच्या घडीला 13.9 लाख केसेस समोर आल्या आहेत. हा आकडा  २०२५ पर्यंत १५.७ लाखांपर्यंत पोहोचू शकतो. या रिपोर्टमध्ये २०१६ मध्ये १२.५ लाख केसेस आणि २०१९ मध्ये १३.६ लाख केसेसचा डेटा नमुद करण्यात आला होता. २०१२ ते २०१६ मध्ये करण्यात आलेल्या डेटा कलेक्शनच्या आधाारे ही माहिती प्रसारित करण्यात आली. यात काही रुग्णालयातील आकडेवारी होती. 

जगभरात हृदयविकाराप्रमाणेच कॅन्सरच्या केसेसमध्येही झपाट्याने वाढ होत आहे आणि शास्त्रज्ञ ते कमी करण्यासाठी काही गोष्टींवर काम करत आहेत. अलिकडे ब्रिटिश शास्त्रज्ञांनी कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी गव्हाच्या नवीन जातीचा शोध लावला आहे. शास्त्रज्ञांनी जनुक संपादन तंत्राने गव्हाची एक नवीन प्रजाती तयार केली आहे जी कॅन्सरपासून बचाव करण्यास मदत करू शकते.

कॅन्सरला रोखण्यासाठी गव्हाचा नवा प्रकार

कॅन्सरपासून बचावासाठी शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या गव्हाच्या प्रजातींमध्ये एस्पार्जिन नावाच्या अमीनो आम्लाचे प्रमाण कमी केले आहे. हे काम यूकेच्या ब्रिस्टल विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केले आहे, जे हर्टफोर्डशायरमध्ये अनुवांशिकदृष्ट्या सुधारित गव्हाचे वाण विकसित करण्यात गुंतलेले आहेत. शास्त्रज्ञांचा हा प्रकल्प 5 वर्षे चालणार आहे. जीन तंत्रज्ञानाद्वारे युरोपमध्ये पहिल्यांदाच गव्हाचे पीक घेतले जात आहे,  चीन आणि अमेरिकेने हे तंत्र फार पूर्वी वापरून पाहिले होते.

गव्हाचा  कॅन्सरशी काय संबंध?

संशोधकांच्या मते, सामान्यत: जेव्हा आपण सामान्य गहू शिजवतो, तेव्हा त्यात असलेले एस्पार्जिन कॅन्सरला कारणीभूत पदार्थ एक्रिलामाइडमध्ये रूपांतरित होतो. ज्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. यामुळेच शास्त्रज्ञांनी गव्हाची नवीन प्रजात विकसित करण्यासाठी एस्परजिन काढून टाकले आहे. गेल्या वर्षी, अर्जेंटिना अनुवांशिक सुधारित गव्हाच्या लागवडीला आणि वापरास परवानगी देणारा पहिला देश ठरला.

एसपर्जिन काढून टाकल्यानं एंटी कॅन्सर बनतील गहू

ब्रिस्टल विद्यापीठाचे संशोधक १९९० पासून अनुवांशिकदृष्ट्या सुधारित पिकांच्या निर्मितीमध्ये गुंतले आहेत. संशोधक निगेल हॅलफोर्डचा असा विश्वास आहे की २००२ मध्ये एक्रेलामाइडचा शोध लागला होता आणि उंदीरांवर संशोधन करण्यात आले होते. संशोधनात असे दिसून आले आहे की एसपर्जिन पसरवणाऱ्या एक्रिलामाइडमुळे कॅन्सरचा आजार होतो. ज्यामुळे मानवांमध्ये या प्राणघातक रोगाचा धोका वाढतो. नवीन गहू पिकाच्या गुणवत्तेच्या पातळीवर कोणताही बदल झालेला नाही, फक्त त्यातून एस्परजीन काढून टाकण्यात आले आहे.

Web Title: Cancer : Scientists are growing genetically modified wheat crops which can reduce the risk of cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.