Join us   

सतत थकवा, अंगदुखी? ब्लड कॅन्सरचे संकेत देतात साधी वाटणारी 'ही' लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 3:09 PM

Cancer Symptoms Causes : जर तुम्ही व्यवस्थित आहार घेऊनही  सहज आजारी पडत असाल आणि तुमच्यासोबत असे वारंवार होत असेल तर सावध व्हा.

कॅन्सर (Cancer) हा एक जीवघेणा आजार आहे.  शरीरात पूर्णपणे प्रसार झाल्यानंतर या आजाराची लक्षणं दिसून येतात. सुरूवातीची लक्षणं ओळखून उपचार सुरू केले नाही तर ब्लड कॅन्सरही होऊ शकतो. ज्याला ल्यूकेमिया असं म्हणतात. ब्लड कॅन्सर (Blood Cancer) हा एक असा आजार आहे जो ब्लड सेल्स प्रोडक्शन आणि फंक्शन्सना प्रभावित करतो. हा एक जीवघेणा आजार असून याची लक्षणं बरीच उशीरा दिसायला सुरूवात होते. (Cancer Symptoms Causes)

सतत आजारी पडणं

सतत आजारी पडणे हे शरीरातील अशक्तपणाचे लक्षण आहे. जर तुम्ही व्यवस्थित आहार घेऊनही  सहज आजारी पडत असाल आणि तुमच्यासोबत असे वारंवार होत असेल तर सावध व्हा. कारण ही ब्लड कॅन्सरची लक्षणे असू शकतात.

आराम केल्यानंतरही थकवा  जाणवणं

विश्रांती घेतल्यानंतरही नेहमी थकवा जाणवणे किंवा शरीरात अशक्तपणा जाणवणे ही देखील ब्लड कॅन्सरची लक्षणे असू शकतात. त्यामुळे, तुम्हाला असे वाटत असल्यास, डॉक्टरांकडून तुमच्या आरोग्याची तपासणी करून घ्या.

अंगदुखी

जर तुम्हाला सांधेदुखी, डोकेदुखी, पोटदुखी यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, कारण हा ब्लड कॅन्सर असू शकतो.

ब्लड इन्फेक्शन

ब्लड कॅन्सरमध्ये ही समस्या नेहमीच दिसून येते. शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे त्वचेच्या संसर्गाचा धोका वाढतो. ब्लड कॅन्सरमध्ये रक्तपेशींची संख्या कमी होऊ लागते, ज्यामुळे संसर्गाचा धोका निर्माण होतो.

लक्षणांमध्ये बदल

लक्षणांमधील बदल हे देखील ब्लड कॅन्सरचे लक्षण असू शकते. जर तुम्हाला काही दिवस आणि नंतर काही दिवस वेगवेगळी लक्षणे जाणवत असतील किंवा कोणतीही लक्षणे पुन्हा पुन्हा येत असतील तर या समस्येकडे दुर्लक्ष करू नका आणि लगेच डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या.

ब्लड कॅन्सरचे मुख्य प्रकार ल्युकेमिया, लिंफोमा, मायलोइड्प्लास्टीक सिंड्रोम, मायलोप्रोलिफेरिटिव्ह डिसॉर्डर आणि मल्टीपल मायलोमा आहे. यामुळे शरीराच्या विविध अंगावर परीणाम होतो. ज्याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही.

 UPMC हिलमॅन कॅन्सर सेंटरच्या रिपोर्टनुसार तुम्‍ही आजारी पडल्‍यास किंवा सहज संसर्ग होत असल्‍यास, किंवा तुम्‍हाला सहज ताप किंवा थंडी वाजत असल्‍यास सावध राहा.  तुमच्या शरीरातील रोगांशी लढणाऱ्या पांढऱ्या रक्त पेशींच्या कमतरतेमुळे असे होऊ शकते.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यकर्करोग