Join us

रात्री काही केल्या झोप येत नाही, डोळे टक्क उघडे? रात्री ही २ पेयं प्या, गाढ झोपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2025 08:50 IST

Can't sleep at night, eyes wide open? Drink these 2 drinks at night, sleep soundly : रात्री झोप लागत नाही यामागे अनेक कारणे असू शकतात. झोप येण्यासाठी हे घरगुती उपाय करून बघा.

आजकाल अनेक शारीरिक समस्या वाढल्या आहेत. मुख्य कारण म्हणजे बदललेली जीवनशैली, खाण्या पिण्याच्या सवयी, तसेच बदललेले रहाणीमान अशा अनेक कारणांमुळे हे त्रास सुरू झाले आहेत. तसेच शारीरिकपेक्षा मानसिक आजारांचे प्रमाण फारच जास्त वाढले आहे. खास म्हणजे तरुणपिढीमध्ये. (Can't sleep at night, eyes wide open? Drink these 2 drinks at night, sleep soundly)याला कारणे अनेक आहेत. तंत्रज्ञानाचा अति वापर हे एक कारण आहे. तसेच अति विचार करण्याची वृत्ती, आत्मविश्वासातील कमतरता या सगळ्याच समस्या आहेत. ओव्हर थिंकींग करण्याचे प्रमाण फारच वाढले आहे. (Can't sleep at night, eyes wide open? Drink these 2 drinks at night, sleep soundly)मुळात अति विचार करणे हा आजार नाही. ती सवय आहे, पण ही सवय अनेक आजारांना आमंत्रण देते. 

तज्ज्ञ सांगतात, शारीरिक तसेच अनेक मानसिक आजारांचे मुळ ओवर थिंकींग असू शकते. डोक्यातील विचारांचा कल्लोळ हानिकारक ठरू शकतो. (Can't sleep at night, eyes wide open? Drink these 2 drinks at night, sleep soundly)आता नाईट लाईफ हा प्रकार फार चालतो. रात्री जागायचे आणि अगदी २ किंवा ३ वाजता झोपायला जायचे. मग झोप लागत नाही. कारण शरीराची वेगळी प्रक्रिया सुरू झाली असते. ही लाईफ स्टाईल स्वास्थ्यासाठी चांगली नाही. काही जणांना काहीच कारण नसताना झोपेचा त्रास असतो. रात्री झोप येत नाही. दिवसभर पेंग येत राहते. 

काही पेये आहेत जी आई-आजी  आपल्याला शांत झोप लागावी यासाठी प्यायला द्यायचे. ते प्यायल्यावर छान गाढ झोप लागायची. आताही जर पुन्हा झोपण्याआधी गरम अशी पेये प्यायलात तर शांत झोप लागू शकते. 

१. झोपण्यापूर्वी दूध पिणे फार उपयुक्त ठरते. दुधामध्ये वेलची घाला. तसेच सुंठ पावडर घाला. जायफळाचा वापर केल्याने झोप छान लागते हे तर जगजाहीर आहे. त्यामुळे थोडी जायफळ पूडही वापरा. झोपण्याआधी असे दूध प्या. गाढ झोप लागेल.

२. तुम्ही कधी दालचिनीचा चहा प्यायला नसाल तर मग नक्की हा प्रयोग करून बघा. दालचिनीचे तुकडे उकळत्या पाण्यामध्ये घाला. त्यामध्ये लवंग घाला. वेलची पूड घाला.  छान उकळून घ्या. गाळून घ्या. नंतर त्यामध्ये मध घाला आणि गरमागरम प्या. मस्त झोप लागेल. दालचिनी स्ट्रेसबस्टर म्हणून ओळखली जाते.     

टॅग्स : मानसिक आरोग्यनाईटलाईफहेल्थ टिप्सआरोग्य