Join us   

काजू दिन : काजू खाणे आरोग्यासाठी उत्तम, मात्र हे ५ आजार असतील तर काजू खाणे टाळाच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2022 12:57 PM

National Cashew Day काजूला पॉवर हाऊस देखील म्हणतात. मात्र, काही लोकांनी याचे अतिसेवन केले तर त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते..

आज देशभरात काजू दिवस साजरा करण्यात येत आहे. दरवर्षी २३ नोव्हेंबर रोजी काजू दिवस साजरा करण्यात येतो. काजूचे अनेक फायदे आहेत. काजूपासून अनेक पदार्थ बनवले जातात. गोड असो या झणझणीत काजूचा वापर प्रत्येक पदार्थात केला जातो. त्यातील पौष्टिक घटक आपल्या शरीरासाठी खुप उपयुक्त आहेत. काजूमध्ये मॅग्नेशियम, पोटैशियम, कॉपर, झिंक, आयरन, आणि सेलेनियमसारखे पौष्टिक घटक आहेत. ज्याच्या सेवनेना शरीरात दुप्पटीने उर्जा वाढते. दैनंदिन आयुष्यात जर काजूचा आहारात समावेश केला तर निश्चितच शरीरातील चयापचयची क्रिया सुरळीत होते. काजू आरोग्याला इतके फायदेशीर असूनही या विशिष्ट लोकांनी त्याचे अतिसेवन नाही केले पाहिजे, कारण त्यातील असणारे घटक काही विशिष्ट आजार असणाऱ्या लोकांसाठी हानिकारक ठरू शकते.

मायग्रेनग्रस्त

डोकेदुखी अथवा मायग्रेनग्रस्त लोकांनी काजूचे अधिक सेवन नाही केले पाहिजे. विशेषतज्ञांच्या अहवालानुसार काजूमधील असलेले अमिनो एॅसिड डोकेदुखी आणि मायग्रेनग्रस्त लोकांसाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे त्यांनी नियंत्रणात काजूचे सेवन करावे.

पोट फुगणे गॅस

काजूमध्ये फायबर अधिक प्रमाणावर आढळुन येते. जे शरीरासाठी खुप फायदेशीर आहे. मात्र अधिक प्रमाणावर फायबर पोट फुगणे आणि गॅससारखे गंभीर आजाराचे कारण बनू शकते. त्यामुळे ज्यांना पचानाच्या संबंधित त्रास असतील तर त्यांनी कमी प्रमाणात काजूचे सेवन करावे.

लठ्ठपणा

जर आपल्याला वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर, काजूचा आहारात समावेश कमी प्रमाणात करावा. विशेषतज्ञांच्या अहवालानुसार काजूमध्ये कॅलरीजचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे अतिसेवनाने शरीरात कॅरीजची संख्या वाढू शकते. काजू आपल्याला खायला आवडत असेल तर त्याचे सेवन कमी प्रमाणात करावे.

उच्च रक्तदाब

काजूमध्ये जास्त प्रमाणात सोडियमचे प्रमाण आढळुन येते. जे आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. जर आपण रक्तदाबासारख्या समस्याशी दोन हात करत असाल, तर काजूचे सेवन कमी करावे. कारण काजूचे सेवन आहारातून अधिक कराल तर त्याचा फटका तुमच्या शरीराला पडू शकतो. ज्यामुळे उच्च रक्तदाब, पक्षाघात आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. इतकेच नाही तर सोडियमचा थेट परिणाम आपल्या किडनीवरही होतो.

एॅलर्जी

काही लोकांना काजूचे अधिक सेवन केल्याने त्यांच्या शरीरातील पचनक्रिया विस्कळीत होते. काहींना उलट्या, लूज मोशन, शरीरावर खाज सुटणे असे गंभीर समस्या उद्भवतात.

टॅग्स : आरोग्यलाइफस्टाइलहेल्थ टिप्स