Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सतत पोट दुखतं, पचन खराब-पित्त-जुलाब-उलट्या-गॅसेसचा त्रास? आतड्यांचा आजार तर नाही..

सतत पोट दुखतं, पचन खराब-पित्त-जुलाब-उलट्या-गॅसेसचा त्रास? आतड्यांचा आजार तर नाही..

Causes of stomach pain, diarrhea, and nausea वाट्टेल ते खाणं, चुकीची जीवनशैली यामुळे आतड्यांचे अनेक आजार होऊ शकतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2023 01:18 PM2023-04-27T13:18:11+5:302023-04-27T13:19:07+5:30

Causes of stomach pain, diarrhea, and nausea वाट्टेल ते खाणं, चुकीची जीवनशैली यामुळे आतड्यांचे अनेक आजार होऊ शकतात.

Causes of stomach pain, diarrhea, and nausea | सतत पोट दुखतं, पचन खराब-पित्त-जुलाब-उलट्या-गॅसेसचा त्रास? आतड्यांचा आजार तर नाही..

सतत पोट दुखतं, पचन खराब-पित्त-जुलाब-उलट्या-गॅसेसचा त्रास? आतड्यांचा आजार तर नाही..

पोटात गॅस तयार होणे ही एक सामान्य समस्या मानली जाते. पोटात गॅस तयार झाल्यामुळे, कधीकधी तीव्र वेदना देखील होतात, जे काही गंभीर आजारांचे देखील लक्षणं असू शकतात. पोटात वारंवार गॅस निर्माण होत असेल तर, ही गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आजाराची लक्षणं असू शकतात. या आजारात लोकांना पोटात असह्ह्य वेदना होतात. व खाल्लेलं अन्न वेळेवर पचत नाही.

यासंदर्भात, युनायटेड मेडिकल डॉक्टर्स आणि डिग्निटी हेल्थ नॉर्थरिज हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट सोहेल सलेम सांगतात, ''पोटातील गॅसची समस्या सामान्य जरी असली तरी दुर्लक्ष करू नका, वारंवार ही समस्या उद्भवत असेल तर, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या, ही गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आजाराचे संकेत असू शकते''(Causes of stomach pain, diarrhea, and nausea).

आतड्यांचे आजार म्हणजे..

डॉ.सलेम यांच्या मते, आतड्यांच्या निगडीत समस्या लहान किंवा मोठ्या आतड्यात दिसून येते. आतड्यांसंबंधी समस्यांची अनेक कारणे आहेत, ज्यामध्ये क्रोहन रोग किंवा अल्सरेटिव्ह कोलायटिस, आतड्यांमध्ये सूज, फिजिकल ब्लॉकेज, स्नायू दुखणे, पचनसंस्थेवर परिणाम इत्यादी समस्या उद्भवू शकतात.

रोज दोन दोन वाट्या सॅलेड खाताय? पोट बिघडेल,आजार लागतील मागे..सावधान..

त्रास कुणाला होऊ शकतो?

प्रत्येकाला कधी ना कधी आतड्यांसंबंधी आजार होतात. काही लोकांना अन्नातून विषबाधा देखील होते. जे बहुतेक वेळा विषाणूजन्य आणि बुरशीजन्य पदार्थ खाल्ल्यामुळे होते. ज्यामुळे क्रोहन रोग, अल्सरेटिव्ह कोलायटिस, सेलियाक रोग किंवा आतड्यांतील कर्करोग यांसारखे आतड्यांसंबंधी आजार होऊ शकतात. पोटाच्या शस्त्रक्रियेनेही आतड्यांमध्ये समस्या निर्माण होऊ शकते.

पोटाच्या समस्येपासून बचावासाठी उपाय

आहारातून २५ ते ३० ग्रॅम फायबर मिळेल असे पाहा. ज्यामुळे पचनसंस्था योग्यरित्या काम करेल. यासह ब्लड प्रेशर व गुड कोलेस्टेरॉल नियंत्रित राहेल. अँटीबायोटिक्स मेडिसिन कमी प्रमाणात घ्या. मनाने घेऊ नका त्यामुळे आतड्यात गंभीर संसर्ग होऊ शकते.

समजा, साखर पूर्णच बंद केली तर तब्येतीवर वाईट परिणाम होतात का?

दैनंदिन जीवनशैलीवर आतड्यांसंबंधी रोगांचा प्रभाव

आतड्याच्या आजारांचा दैनंदिन जीवनशैली आणि आरोग्यावरही परिणाम होतो. आतड्यांसंबंधी समस्यांमुळे दैनंदिन जीवनावर वाईट परिणाम होतो. आतड्यांसंबंधी आजारांचा खाण्याच्या सवयींवरही परिणाम होऊ शकतो. जसे की तुम्ही काय खाता, तुम्ही किती खातात, तसेच तुम्ही खाल्लेल्या अन्नातून कितपत पौष्टीक घटक मिळते.?

उलट्या व अतिसार

आतड्यांमध्ये ब्लॉकेज निर्माण झाल्यास, अन्न किंवा पाणी पचत नाही. ज्यामुळे उलटी व डायरिया यासारखे आजार निर्माण होतात. जर आतड्याची नलिका योग्यरित्या काम करत असेल तर, अन्न व पाणी चांगल्या प्रकारे पचते. यामुळे शरीरातून सोलिड वेस्ट सहजरित्या बाहेर पडते. जर आतड्यांमध्ये समस्या असल्यास शरीरात विविध आजार उद्भवण्याची शक्यता निर्माण होते.

Web Title: Causes of stomach pain, diarrhea, and nausea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.