कडाक्याची थंडी सुरु झाली की फार त्रास होतो (Winter Season). थंडीत स्किन काळवंडते. यासह केसही (Hair care Tips) रुक्ष होतात. मुख्य म्हणजे रात्री अपरात्री दात (Teeth Health) ठणकतात. ठणकणाऱ्या दातांचे असह्य वेदना बऱ्याचदा सहन होत नाही. दात अनेक कारणांमुळे ठणकतात. आजकाल दातांच्या समस्या सामान्य झाल्या आहेत. अनेकांना दातांमध्ये वेदना आणि संवेदनशीलता, आणि हिवाळ्यात याचा त्रास आणखीन वाढतो.
पाणी जरी साधे असले तरी, हिवाळ्यात थंड होतेच. आईस्क्रीम खाणे किंवा थंड वातावरणात बाहेर जाणे होतेच. यामुळे दातांमध्ये तीव्र वेदना जाणवतात. अशा परिस्थितीत दातांची काळजी घेणे खूप गरजेचे आहे जेणेकरून या ऋतूत वाढणाऱ्या समस्या टाळता येतील आणि दात निरोगी राहतील. अशा परिस्थितीत दातांची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. जेणेकरून या ऋतूत वाढणाऱ्या समस्या टाळता येतील आणि दात निरोगी राहतील(Causes of Tooth Sensitivity to Heat and Cold).
दात का दुखतात?
डॉ. देवमोय मंडल यांच्या मते, 'दातांचे दुखणे दोन प्रकारचे असू शकतात. डेंटिनल सेन्सिव्हिटी आणि पल्प सेन्सिव्हिटी. डेंटिनल सेन्सिव्हिटी ही एक सामान्य समस्या आहे. मात्र, पल्प सेन्सिव्हिटीमुळे दातांचे दुखणे अधिक वाढू शकते. दातांमध्ये कॅव्हिटी असल्यास ही समस्या अधिक वाढते. ज्यामुळे फिव्हरसोबत दातांमध्ये तीव्र वेदना जाणवू लागतात.'
पाण्यात कडीपत्ता घालताच होईल जादू; बॅड कोलेस्टेरॉल होईल कमी - हृदयही राहील निरोगी
दातांचे दुखणे वाढू नये म्हणून उपाय
पेस्टची निवड
डॉ. मंडल यांनी रासायनिक पेस्ट वापरण्याचा सल्ला दिला आहे, ज्यामुळे दातांच्या वेदना आणि संवेदनशीलतेपासून आराम मिळण्यास मदत होते.
थंड पदार्थ खाणे टाळा
हिवाळ्यात आईस्क्रीम आणि शीतपेयेसारख्या थंड गोष्टींचे सेवन कमी करावे. यामुळे दातांमध्ये तीव्र वेदना जाणवू लागतात.
फराळ खाल्ले नी वजन वाढले? करा ५ सोप्या गोष्टी; पचनक्रिया होईल सुरळीत - वजन घटेल
दातांची नियमित काळजी घ्या
दातांची नियमित काळजी घेतल्याने दात दीर्घकाळ निरोगी राहतात. दिवसातून २ वेळा दात घासा. शिवाय अति थंड किंवा अति गरम पदार्थ खाणं टाळा.