Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पावसाळ्याला दोष देण्यापेक्षा सवयी बदला, फक्त 5 चुक टाळा अन राहा निरोगी 

पावसाळ्याला दोष देण्यापेक्षा सवयी बदला, फक्त 5 चुक टाळा अन राहा निरोगी 

पावसाळ्यात केवळ जिवाणू विषाणुंमुळेच नाही तर खाण्यापिण्याच्या बाबत आपण दाखवत असलेला निष्काळजीपणा, आहारात होणार्‍या चुका याचे परिणामही आरोग्यावर होतात. पावसाळ्या आपण पोषणासंदर्भात काय चुका करतो किमान एवढं जरी समजून घेतलं तरी पावसाळ्यात आपण आपलं आरोग्य सांभाळू शकतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2021 02:15 PM2021-09-01T14:15:17+5:302021-09-01T14:22:33+5:30

पावसाळ्यात केवळ जिवाणू विषाणुंमुळेच नाही तर खाण्यापिण्याच्या बाबत आपण दाखवत असलेला निष्काळजीपणा, आहारात होणार्‍या चुका याचे परिणामही आरोग्यावर होतात. पावसाळ्या आपण पोषणासंदर्भात काय चुका करतो किमान एवढं जरी समजून घेतलं तरी पावसाळ्यात आपण आपलं आरोग्य सांभाळू शकतो.

Change habits instead of blaming the rain, just avoid 5 mistakes and stay healthy in rainy season | पावसाळ्याला दोष देण्यापेक्षा सवयी बदला, फक्त 5 चुक टाळा अन राहा निरोगी 

पावसाळ्याला दोष देण्यापेक्षा सवयी बदला, फक्त 5 चुक टाळा अन राहा निरोगी 

Highlightsआपल्या आहारातील क जीवनसत्त्वाचा अभाव या काळात आपल्याला आजारी होण्यास कारणीभूत होतो. पावसाळ्यात दही ताकाबद्दल नाहक भीती बाळगून त्यांचं सेवन करण्याचं टाळलं जातं.शेतातील माती, मातीतील जीवजंतू याच्या भीतीमुळे केवळ पावसाळ्यात मिळणार्‍या कित्येक भाज्यांकडे पाठ फिरवली जाते.

 आला पावसाळा आरोग्य सांभाळा अशी सूचना आरोग्य तज्ज्ञांकडून मिळाली की आरोग्याबाबत या काळात आपण जास्त दक्ष असायला हवं अशी अपेक्षा असते. इतर  ऋतुंच्या तुलनेत पावसाळ्यात आजारी पडण्याचं प्रमाण जास्त असतं. पावसाळ्यात विविध प्रकारचे संक्रमक विषाणू जीवाणू शरीराल प्रवेश करण्याचा सर्वात जास्त धोका असतो. हे जीवाणू विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करते झाले की सर्दी, फ्लू, टायफॉइड, काविळ यासारखे आजार छळतात. पावसाळ्यात केवळ जिवाणू विषाणुंमुळेच नाही तर खाण्यापिण्याच्या बाबत आपण दाखवत असलेला निष्काळजीपणा, आहारात होणार्‍या चुका याचे परिणामही आरोग्यावर होतात. पावसाळ्या आपण पोषणासंदर्भात काय चुका करतो किमान एवढं जरी समजून घेतलं तरी पावसाळ्यात आपण आपलं आरोग्य सांभाळू शकतो.

पावसाळ्यातल्या चुका

छायाचित्र- गुगल

1. पावसाळा सुरु झाला आहे, मग आंबट चिंबट खायला नको असा ग्रह करुन पावसाळ्यात क जीवनसत्त्वयुक्त फळांपासून आपण अंतर राखतो. लिंबू ,संत्री, मोसंबी यांचं सेवन आपण थांबवतो. पण जे आपण टाळतो त्यात क जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असतं. हे जीवनसत्त्वच आपल्या रोगप्रतिकारशक्तीस बळ देतं . आपल्या आहारातील क जीवनसत्त्वाचा अभाव या काळात आपल्याला आजारी होण्यास कारणीभूत होतो. अगदी आंबट चवीची फळं पावसाळ्यात टाळत असाल तर किमान पपई, पेरु ही फळं तरी खायला हवीत. या फळांमधूनही रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी गुणधर्म शरीरात जातात.

छायाचित्र- गुगल

2. पावसाळ्यात आंबट फळांप्रमाणे आणखी एक भीती नाहक बाळगली जाते ती दही आणि ताकाबद्दल. पावसाळ्यात बाधेल म्हणून अनेकजण दही ताकाचा आहारात समावेश करतच नाही. पण ही चूक पावसाळ्यात आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरते. दही आणि ताक हे प्रोबायोटिक आहारीय घटक आहेत. यामुळे पोटात चांगले जीवाणू तयार होतात. हे जीवाणू पचनासाठी खूप महत्त्वाचे असतात. शरीरात जर चांगल्या जिवाणुंची कमतरता असेल तर आपली रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि वेगवेगळ्या आजारांच्या संसर्गाचा धोका वाढतो. म्हणूनच पावसाळ्यात दही ताकासारखे प्रोबायोटिक पदार्थ आहारात मर्यादित प्रमाणात असायलाच हवेत.

छायाचित्र- गुगल

3. जसा ऋतु बदलतो त्याप्रमाणे आपण आपल्या आहारविहारात आरोग्यदायी बदल करणं, सवयी बदलणं आवश्यक असतं. पण तसं होत नाही. उन्न्हाळ्यात फ्रीजमधलं थंड पाणी पिण्याची सवय असणारे पावसाळ्यातही फ्रीजमधलंच पाणी पितात. पण पावसाळ्यात फ्रीजमधलं थंड पाणी पिणं हे खूप धोकादायक असतं. फ्रीजमधल्या थंड पाण्यानं घशात विषाणुंच्या संसर्गाचा धोका असतो. म्हणूनच पावसाळ्यात साधं हंड्यातलं, पंचीपात्रीतलं पाणी प्यायला हवं.

छायाचित्र- गुगल

4. पावसाळ्यात वेगवेगळ्या रानभाज्या येतात. पण केवळ शेतातील माती, मातीतील जीवजंतू याच्या भीतीमुळे केवळ पावसाळ्यात मिळणार्‍या कित्येक भाज्यांकडे पाठ फिरवली जाते. त्यामुळे त्या त्या ऋतुचा सामना करताना शरीरात आवश्यक असलेली तत्त्वं निर्माणच होवू शकत नाही. त्याचाच परिणाम म्हणून पावसाळ्यात रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि वारंवार आजारपणं डोकं वर काढतात.

छायाचित्र- गुगल

5. पावसाळी हवेमुळे खमंग, मसालेदार खाण्याची इच्छा जागी होते आणि पावलं आपोआपच बाहेर वेगवेगळ्या पदार्थांच्या गाड्यांकडे वळतात. पण तेलकट भजी खाणं, चाट खाणं, मसालेदार पदार्थ खाणं यामुळे पोट फुगणं , पोट बिघडणं, अँसिडिटी होणं यासारखे पचनासंदर्भातले त्रास होतात. पावसाळ्यात घरातल्या पौष्टिक खाण्याला महत्त्व दिलं तर आरोग्य व्यवस्थित सांभाळलं जातं.

Web Title: Change habits instead of blaming the rain, just avoid 5 mistakes and stay healthy in rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.