Join us   

हवा बदल झाला की आजारी पडता? सर्दी-खोकल्याने बेजार? बाबा रामदेव सांगतात एक खास काढा प्या..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2024 2:39 PM

Changing weather causing cold? Ramdev Baba shares Ayurvedic Immunity Booster Drink Recipe : आयुर्वेदीक काढ्याची पाहा कमाल; सर्दी, खोकला आणि कफपासून मिळेल त्वरित सुटका..

आता लवकरच हिवाळा संपून उन्हाळ्याला सुरुवात होईल. हवामानात बदल झाला की, आरोग्यात देखील बदल घडतात. इम्युनिटी कमी झाली, की अर्थात आजारांचा त्रास होतो. थोड्याशा निष्काळजीपणामुळे डोकेदुखी, सर्दी, खोकला, ताप यासारख्या समस्या उद्भवतात (Cold and Cough). तापमानातील बदलांमुळे घातक बॅक्टेरियांचा वावर देखील वाढतो. ज्यामुळे सर्दी, खोकला, घशात कफ होण्याची समस्या निर्माण होते (Health Care).

जर आपण देखील सर्दी, खोकला, कफ या समस्यांमुळे त्रस्त असाल तर, एकदा योगगुरु रामदेव बाबा (Ramdev Baba) यांनी शेअर केलेला आयुर्वेदिक काढा पिऊन पाहा. खोकला आणि सर्दीवरील उपचारावर हे फायदेशीर ठरते(Changing weather causing cold? Ramdev Baba shares Ayurvedic Immunity Booster Drink Recipe).

सर्दी-खोकला घालवण्यासाठी आयुर्वेदिक उपाय

बाबा रामदेव यांच्या म्हणण्यानुसार, 'स्वयंपाकघरातील अनेक औषधी वनस्पती खोकला आणि सर्दी दूर करण्यास मदत करू शकतात. या आयुर्वेदिक काढ्यामुळे सर्दी, खोकला, कफचा त्रास कमी होईलच. यासह आरोग्याला अनेक फायदेशीर पौष्टीक घटक प्रदान करतील.'

जेवणानंतर की जेवणाआधी? ताक नेमके कधी प्यावे? ताक प्यायल्याने वजन तर घटतेच; आणि...

आयुर्वेदिक काढा तयार करण्याची सोपी कृती

लागणारं साहित्य

ज्येष्ठमध

सुंठ

दालचिनी

तुळशीची पानं

कृती

सर्वप्रथम, एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर त्यात एक ज्येष्ठमधाचा तुकडा घाला. नंतर सुंठ आणि दालचिनीची पावडर घालून मिक्स करा. मध्यम आचेवर गॅस ठेवा. पाणी उकळून निम्मे झाल्यावर त्यात तुळशीची पानं घाला. काढ्याला उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम लो करा. निदान १० मिनिटांसाठी काढा उकळवण्यासाठी ठेवा. १० मिनीटानंतर गॅस बंद करा. एका कपवर चहाची गाळणी ठेवा. त्यात काढा ओतून, काढा कोमट झाल्यावर प्या.

आयुर्वेदिक काढा म्हणजे इम्युनिटी बुस्टर

हवामानात बदल झाला की, मुलं आजारी पडतात? मुलांना रोज खायला द्या ३ पदार्थ; वाढेल इम्यूनिटी..

आयुर्वेदिक गोष्टींचा वापर करून तयार केलेला काढा, एक इम्युनिटी बुस्टर म्हणून काम करते. यामुळे शरीर तंदुरुस्त राहते. ज्येष्ठमध, सुंठ, दालचिनी, तुळशीची पानांमध्ये अँटी बायोटिक गुणधर्म असतात. यामुळे आयुर्वेदिक गोष्टींयुक्त काढा प्यायल्याने सर्दी, खोकला, कफ यापासून आराम मिळतो. आपण हे आयुर्वेदिक काढा दिवसातून दोन ते तीन वेळा पिऊ शकता. ज्यांना गंभीर आजारांचा धोका आहे, त्यांनी हा काढा पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

टॅग्स : रामदेव बाबाहेल्थ टिप्सआरोग्य