महाराष्ट्रीयन लोकांसाठी चपाती म्हणजे जेवणच. ब्रेकफास्टला चपाती - चहा, दुपारच्या जेवणाला चपाती - भाजी, काहींकडे रात्रीच्या जेवणाला चपाती किंवा भाकरी केली जाते. भारतात प्रत्येकाकडे चपाती करण्याची पद्धत वेगळी आहे. मुख्य म्हणजे हे आपल्या डेली डाएटचा भाग बनला आहे. काही लोकं चपाती खाणं टाळतात.
गव्हाच्या पिठात ग्लूटेन असते, त्यामुळे गव्हाची चपाती खाऊ नये, असे सांगण्यात येते. तर, काही तज्ज्ञ चपाती खाण्याचा सल्ला देतात. त्यामुळे चपाती खावी की टाळावी असा प्रश्न पडतो. परंतु एक महिना चपाती न खाल्ल्याने शरीरात काय बदल घडतात? याची माहिती लखनौच्या चरक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या आहार आणि पोषण विभागाच्या प्रमुख डॉ. इंदुजा दीक्षित यांनी दिली आहे(Chapati for Weight Loss – What Do The Experts Say?).
गहू हानिकारक नाही
आहारतज्ज्ञांच्या मते, गहू आरोग्यासाठी अजिबात हानिकारक नाही. यामध्ये असलेले ग्लूटेन हे एक प्रकारचे प्रोटीन आहे. ज्यामुळे आरोग्याला फायदाच होतो. परंतु, ज्यांना गंभीर आजार आहे, किंवा ज्यांना डॉक्टरांनी ग्लूटेनयुक्त पदार्थ खाण्यास मनाई केली आहे, त्यांनी चपाती खाणं टाळावे, किंवा कमी प्रमाणात खावी.
पावसाळ्यात प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून नियमित खा ५ गोष्टी, आजारपणं राहतील लांब
संतुलित आहार
प्रत्येक गोष्टीचा अतिरेक वाईट आहे, मग ती कोणतीही गोष्ट असो. जर आपण जेवताना चपाती जास्त व इतर पदार्थ कामी खात असाल तर, ते योग्य नाही. त्यामुळे अतिरेक टाळा - प्रमाणात खा. संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. यासाठी २ चपात्यांसह, थोडा भात, डाळ आणि भाजी खा.
चपाती - पोषक तत्वांनी परिपूर्ण
गहू अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. यामध्ये पोटॅशियम, फोलेट, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन बी12, फायबर, लोह, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट, प्रथिने आणि सोडियम यासह इतर अनेक पोषक घटक असतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
सतत मैद्याचे पदार्थ खात असाल तर हे ५ आजार तुम्हाला झालेच म्हणून समजा..
एक महिना चपाती न खाल्ल्याने काय होईल?
जर आपण एक महिला चपाती खात नसाल तर, शरीरातील उर्जा पातळी कमी होऊ शकते. यासोबतच अशक्तपणा, त्वचेवर पुरळ उठणे, ओठ फुटणे, मूड बदलणे, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे, हाडे कमकुवत होणे यासारख्या समस्याही होऊ शकतात. महिनाभर गव्हाच्या पिठाची चपाती न खाल्ल्याने शरीराला विशेष फायदा होत नाही, उलट नुकसान होते.