Join us   

बदाम-पनीर रोज खाणं परवडत नाही? १० रूपयांत चारपट जास्त प्रोटीन देतात २ पदार्थ; ताकद येईल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2024 10:23 AM

Cheap And Healthy Source Of Protein : प्रोटीन्ससाठी काही पोषक तत्वांचा आहारात समावेश करायला हवा. कारण शरीराच्या चांगल्या कार्यासाठी प्रोटीन्सची आवश्यककता असते.  

शरीरात मसल्स आणि सेल्स तयार करण्यासाठी अमिनो एसिड्सची गरज असते. (Fitness Tips) हे एक प्रोटीन आहे, ज्यात बरीच पोषक तत्व असतात. हॉर्मोन्स, एंजाईन्ससुद्धा तयार होण्यास मदत होते. (Health Tips) रोज योग्य प्रमाणात प्रोटीन्सचे सेवन केल्यानं शरीरात कसलीही कमतरता भासत नाही. (Protein sathi kay khave) प्रोटीन्सच्या कमतरतेमुळे  पचनाच्या समस्या उद्भवणं, मेटाबॉलिझ्म स्लो होणं अशा समस्या उद्भवतात. प्रोटीन्सची कमतरता अनेक गंभीर आजाराचे कारण ठरू शकते. यामुळे मसल्स कमी होऊ लागतात.(Peanuts Are a Good  Source of Protein)

स्किन, हेअर्स, नखं कमकुवत होतात. हळूहळू हाडं कमजोर होतात. फॅटी लिव्हर, एडिमा, गंभीर इन्फेक्शन, जास्त भूक  लागण्याचे कारण ठरू शकते.  (Health Tips) शरीरातील प्रोटीन्सची कमतरता पूर्ण करण्यासाठी ५ गोष्टींकडे लक्ष  देणं गरजेचं असतं.  ज्यामुळे हेल्थ प्रोब्लेम्स वाढतात.  प्रोटीन्ससाठी काही पोषक तत्वांचा आहारात समावेश करायला हवा. कारण शरीराच्या चांगल्या कार्यासाठी प्रोटीन्सची आवश्यककता असते. (Health Tips Peanut Is Good For Protein)

पोटभर भात खा १ किलो पण वजन वाढणार नाही; भात करण्याची १ सोपी पद्धत, स्लिम दिसाल

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराल कोणते फायदे मिळतात? (Benefits Of Eating Peanuts)

१०० ग्राम शेंगदाण्यांमध्ये जवळपास ६५  ग्राम प्रोटीन्स असतात. USDA च्या रिपोर्टनुसार शेंगदाणे खाल्ल्याने प्रोटीन्सची कमतरता पूर्ण करण्यास मदत होते.  हिवाळ्यात ताज्या भूईमुगाच्या शेंगांचे सेवन केल्याने प्रोटीन्सची कमतरता पूर्ण होते. शेंगदाण्यांमध्ये  पोटॅशियम, मॅग्निज, कॉपर, कॅल्शियम, आयर्न, सेलेनियम असते. जे शरीराला खूपच गरम पडते. शेंगदाणांचे सेवन केल्याने  गंभीर आजारांपासूनही बचाव होतो आणि याचे अधिकाधिक फायदे मिळतात. 

मेंदू तल्लख राहण्यासाठी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी लोक बदाम खातात पण नियमित शेंगदाणे खाल्ल्यानेही  मेंदूचा विकास होतो म्हणूनचच शेंगदाण्यांना 'गरिबांचे बदाम' असं म्हणलं जातं. यात एंटी ऑक्सिडेंटस आयर्न, कॅल्शियम, जिंक असते. ज्यामुळे रोगप्रतिरकारकशक्ती कमी होते. शेंगदाणे खाल्ल्याने शरीराची सूज कमी होते आणि डायबिटीज टाईप २ चा धोका कमी होतो. 

सोयाबीन

सोयाबीन आणि सोया प्रोडक्ट्स हाय प्रोटीन असतात. ज्यामुळे कॅन्सरपासूनही बचाव होतो.  NCCIH च्या रिपोर्टनुसार सोया प्रोडक्ट्सचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने डायरिया, गॅस, पुरूषांमध्ये फिमेल हॉर्मोन्सची कमतरता अशी लक्षणं जाणवू शकतात.  

टॅग्स : हेल्थ टिप्सफिटनेस टिप्सवेट लॉस टिप्स