Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > प्लास्टीकच्या बाटल्या, डबे वापरताना न चुकता तपासा १ गोष्ट, नाहीतर आरोग्याशी खेळ...

प्लास्टीकच्या बाटल्या, डबे वापरताना न चुकता तपासा १ गोष्ट, नाहीतर आरोग्याशी खेळ...

Check 1 thing surely while using plastic bottles and containers : BPA म्हणजेच बिस्फेनोल ए हा प्लास्टीकमध्ये असणारा घातक घटक आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2023 11:35 AM2023-11-30T11:35:19+5:302023-11-30T11:37:33+5:30

Check 1 thing surely while using plastic bottles and containers : BPA म्हणजेच बिस्फेनोल ए हा प्लास्टीकमध्ये असणारा घातक घटक आहे.

Check 1 thing without fail while using plastic bottles, cans, otherwise play with health.... | प्लास्टीकच्या बाटल्या, डबे वापरताना न चुकता तपासा १ गोष्ट, नाहीतर आरोग्याशी खेळ...

प्लास्टीकच्या बाटल्या, डबे वापरताना न चुकता तपासा १ गोष्ट, नाहीतर आरोग्याशी खेळ...

आपण सगळेच अगदी सर्रासपणे पाणी पिण्यासाठी किंवा अन्नपदार्थ ठेवण्यासाठी आणि कॅरी करण्यासाठी प्लास्टीकच्या बाटल्या किंवा डब्यांचा वापर करतो. हे डबे किंवा बाटल्या कॅरी करायला आणि धुवायला सोपे असल्याने याचा प्रामुख्याने वापर केला जातो. अगदी लहान बाळांच्या बाटल्यांपासून ते घरातील डब्यांपर्यंत बहुतांश गोष्टींसाठी आपल्या घरात प्लास्टीकने शिरकाव केलेला दिसतो. प्लास्टीक वापरणे आरोग्यासाठी योग्य नाही हे आपण अनेकदा ऐकतो मात्र ते प्रत्यक्ष कृतीत आणणे म्हणावे तितके सोपे नसते. ऑफीसमध्ये आपण प्लास्टीकच्या कपातून चहा पितो. काहीवेळा आपण अन्नपदार्थही प्लास्टीकच्या पिशव्यांमधून आणतो. कॅरी करण्यासाठी हे सोपे असले तरी आरोग्यासाठी ते फायद्याचे नसते (Check 1 thing surely while using plastic bottles and containers ). 

पण मग प्लास्टीक वापरतच असाल तर किमान काही गोष्टींची काळजी आवर्जून घ्यायला हवी. जेणेकरुन या प्लास्टीकचा आरोग्यावर खूप जास्त परिणाम होणार नाही. काळजी घ्यायची म्हणजे नेमकं काय करायचं ते प्रसिद्ध आहारतज्ज्ञ अमिता गद्रे यांनी सांगितले आहे. BPA  म्हणजेच बिस्फेनोल ए हा प्लास्टीकमध्ये असणारा घातक घटक आहे. त्याकडे आपण बारकाईने लक्ष द्यायला हवे. अन्यथा भविष्यात आपल्या आरोग्यावर त्याचा विपरीत परीणाम होण्याची शक्यता असते. या गोष्टी वेळीच समजून घेऊन त्याप्रमाणे कृती केल्यास त्याचा फायदा होण्यास मदत होईल. 

(Image : Google)
(Image : Google)

१. प्लास्टीकच्या बाटल्या, वॉटर प्युरीफायर हे प्लास्टीकचे असल्याने यातील BPA हा घटक आरोग्यासाठी घातक असतो. कमी दर्जाच्या प्लास्टीकमध्ये हा घटक असतो तो घटक पाणी आणि अन्नाच्या माध्यमातून आपल्या शरीरात जाण्याची शक्यता असते. 

२. यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण प्लास्टीकच्या बाटल्या आणि डबे खरेदी करतो त्याच्या खाली रिसायकलचे एक त्रिकोणी चिन्ह असते. या चिन्हामध्ये १ ते ७ आकडे दिलेले असतात. आपण क्वचितच हे इतक्या बारकाईने पाहत असू. पण बाटली किंवा डबा खरेदी करताना ३ आणि ७ आकडा असलेल्या बाटल्या, डबे अजिबात खरेदी करायचे नाहीत. १, २, ४,५,७ हे आकडे असलेले कंटेनर BPA फ्री असतात.

३. तसेच प्लास्टीकच्या पातळ अशा पिशव्यांमध्ये ठेवलेले अन्नपदार्थ खाणे योग्य नाही. तसेच हॉटेलमधून पार्सल म्हणून दिल्या जाणाऱ्या अतिशय पातळ अशा प्लास्टीकच्या डब्यांमधून येणारे अन्नपदार्थ थेट मायक्रोवेव्हमध्ये गरम करु नयेत.  हे पदार्थ काचेच्या एका भांड्यात काढून मगच गरम केलेले चांगले. 
 

Web Title: Check 1 thing without fail while using plastic bottles, cans, otherwise play with health....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.