Join us

उन्हाळ्यात प्या काकडीचे डिटॉक्स वॉटर, ५ मिनिटांचे काम-पोटाला आराम आणि पोटावरची चरबीही गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2025 18:32 IST

Check out this cucumber detox water, it will make stomach diseases and fat disappear : रोज प्या हे डिटॉक्स वॉटर शरीर होईल साफ. पोटाची चरबीही कमी होईल.

पोटाच्या समस्यांचे प्रमाण फार वाढले आहे. वाढत्या प्रदूषणामुळे असेल किंवा खाण्याच्या सवयींमुळे. जेवणाच्या वेळा पाळल्या जात नाहीत. (Check out this cucumber detox water, it will make stomach diseases and fat disappear)त्यामुळेही त्रास होतो. बाहेरचे तेलकट पदार्थ भरपूर खाल्ले जातात. तसेच स्थुलतेच्या समस्याही वाढल्या आहेत. पोटाचे आजार, सातत्याने वाढणारे वजन कमी करण्यासाठी एक रामबाण उपाय आहे. तो म्हणजे डिटॉक्स वॉटर. फारच सोपा उपाय आहे. पाहा किती उपयुक्त असते हे पाणी.(Check out this cucumber detox water, it will make stomach diseases and fat disappear)

 डिटॉक्स म्हणजे नेमकं काय असतं ? डिटॉक्सही शरीरातील घाण बाहेर काढण्याची प्रक्रिया आहे. शरीराला हानिकारक किंवा गरजेचे नसलेले पदार्थ शरीराबाहेर मलमुत्रावाटे टाकून देण्याची ही प्रक्रिया आरोग्यासाठी फार उपयुक्त असते. (Check out this cucumber detox water, it will make stomach diseases and fat disappear)पचनसंस्था सुरळीत चालावी यासाठी डिटॉक्स गरजेचे असते. शरीरातील टॉक्सिन्स शरीराबाहेर गेले नाहीत तर पचन, यकृत, आतडे आदी अवयवांचे आजार उद्भवतात. (Check out this cucumber detox water, it will make stomach diseases and fat disappear)

डिटॉक्स वॉटर तयार करायची कृती-

हे डिटॉक्स वॉटर तयार करणं अगदीच सोपं आहे. तसेच त्याचे विविध प्रकारही असतात. त्यापैकी एक प्रकार अगदीच साध्या सामग्रीचा वापर करून तयार करता येतो. रोज सकाळी मोठ्या बाटलीमध्ये असे पाणी तयार करून ठेवायचे. मग दिवसभर पित राहायचे. अगदी ५ मिनिटांचे काम आहे. 

१. एका काकडीचे गोल गोल काप करून घ्या. काकडीची सालं काढू नका. त्यांच्यामध्ये पोषकतत्वे असतात. २. एक लिंबूही तसाच गोल गोल  चिरून घ्या.  ३. एक लहान आलं घ्या. त्याचेही गोल काप करून घ्या. ४. आता काकडी, लिंबू, आलं एका बाटलीमध्ये टाका. त्यामध्ये पाणी भरून घ्या. पुदिन्याची पाने त्यामध्ये टाका. बाटलीचे झाकण बंद करून ठेवा. ५. ३ ते ४ तासांमध्ये डिटॉक्स वॉटर तयार होईल.

उन्हाळ्याच्या दिवसांसाठी उत्तम पेय काकडी शरीराला हायड्रेटेड राहण्यासाठी मदत करते. काकडीमध्ये कॅलरीजही खुप कमी असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी काकडीचा उपयोग होतो. लिंबामध्ये जीवनसत्त्व 'सी' भरपूर प्रमाणात असते. तसेच त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. त्वचेसाठी लिंबू फारच उपयुक्त ठरते. आलं पचन सुधारते. पोटातील अडकलेला गॅस बाहेर काढते. चरबी कमी करण्यासाठी मदत करते. पुदिना हा पाचक पदार्थ आहे. पुदिन्यामध्ये जीवनसत्त्व 'ए', 'बी', 'सी 'असतात. तसेच इतरही अनेक घटक असतात. या सर्व पदार्थांचे मिश्रण असलेले पाणी शरीरासाठी चांगेलच. उन्हाळ्यामध्ये तर अतिउत्तम.      

टॅग्स : आरोग्यआहार योजनाअन्नहोम रेमेडीहेल्थ टिप्स