Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Chest pain causes : हार्ट अटॅकचं लक्षणं की इतर कारणांमुळे छातीत दुखतंय? जाणून घ्या ७ लक्षणं, कारणं आणि उपाय

Chest pain causes : हार्ट अटॅकचं लक्षणं की इतर कारणांमुळे छातीत दुखतंय? जाणून घ्या ७ लक्षणं, कारणं आणि उपाय

Chest pain causes and treatment : छातीत गॅस पोटाशी संबंधित परिस्थितींमुळे होऊ शकतो जसे की रिफ्लक्स रोग, हायपर अॅसिडिटी, जठराची सूज किंवा अल्सर रोग.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 11:44 AM2022-02-16T11:44:07+5:302022-02-16T11:47:51+5:30

Chest pain causes and treatment : छातीत गॅस पोटाशी संबंधित परिस्थितींमुळे होऊ शकतो जसे की रिफ्लक्स रोग, हायपर अॅसिडिटी, जठराची सूज किंवा अल्सर रोग.

Chest pain causes and treatment : Gas pain in chest symptoms causes and treatment | Chest pain causes : हार्ट अटॅकचं लक्षणं की इतर कारणांमुळे छातीत दुखतंय? जाणून घ्या ७ लक्षणं, कारणं आणि उपाय

Chest pain causes : हार्ट अटॅकचं लक्षणं की इतर कारणांमुळे छातीत दुखतंय? जाणून घ्या ७ लक्षणं, कारणं आणि उपाय

सध्याच्या चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि निष्क्रिय जीवनशैलीमुळे पोटात आणि छातीत गॅस तयार होणे सामान्य झाले आहे. गॅसमुळे अनेक वेळा पोटात आणि छातीत दुखणे जाणवते. आज आपण छातीत गॅसच्या लक्षणांबद्दल बोलत आहोत. वास्तविक, जेव्हा गॅस शरीरातून बाहेर पडू शकत नाही, तेव्हा पोटात किंवा शरीराच्या इतर भागात वेदना सुरू होतात. ही वेदना छातीपर्यंतही पोहोचते, त्यामुळे छातीत वेदना जाणवते.  (Gas pain in chest symptoms causes and treatment) जडपणा आणि अस्वस्थता जाणवते. एवढेच नाही तर छातीत गॅस झाल्यामुळे जळजळदेखील होते. डॉ. तहसीन पेटीवाला जनरल मेडिसिन आणि गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, मसिना हॉस्पिटल, मुंबई यांनी एका हिंदी वेबसाईडशी बोलताना याबाबत विस्तृत माहिती दिली आहे. 

छातीत वेदनांची लक्षणं (Chest pain symptoms)

तुम्हालाही छातीत दुखत असेल तर याचा अर्थ असा नाही की तुम्हाला हृदयाची समस्या आहे. कधीकधी गॅसमुळेही छातीत दुखते. 

१) भूक कमी लागणं

छातीत गॅस तयार झाल्यावर वेदना जाणवते, त्यासोबत भूक न लागण्याची समस्या उद्भवते. गॅस तयार झाल्यामुळे काही खावेसे वाटत नाही, त्यामुळे भूक कमी होऊ लागते.

१० मिनिटात झोपण्याची ट्रिक! रात्री पडल्या पडल्या झोप येण्यासाठी शास्त्रज्ञांनी सुचवला भन्नाट उपाय

२) आंबट ढेकर

वारंवार आंबट ढेकर येणे हे देखील गॅसचे लक्षण आहे. छातीत गॅस तयार झाल्यामुळे, लोकांना अनेकदा आंबट ढेकर येण्याचा त्रास सहन करावा लागतो. म्हणजेच छातीत गॅस तयार झाल्यामुळे आंबट ढेकरही येऊ शकते.

३) सूज येणं

जेव्हा आपल्या शरीरात गॅस तयार होतो तेव्हा आपल्याला शरीर फुगल्यासारखे वाटू शकते. अशा स्थितीत जळजळ होण्याच्या लक्षणाकडे दुर्लक्ष करता कामा नये.

४) उलटीसारखं होणं

कधीकधी छातीत गॅस तयार झाल्यामुळे लोकांना मळमळ आणि उलट्या झाल्यासारखे वाटते. गॅस तयार झाल्यामुळे मळमळ सुरू होते. यादरम्यान अस्वस्थताही जाणवू लागते.

५) चक्कर येणं

काही लोकांना गॅस तयार झाल्यामुळे अशक्तपणा, चक्कर आल्यासारखे वाटू शकते. पण डिहायड्रेशन आणि लो बीपीमुळेही चक्कर येऊ शकते.

जीम, डाएटचं टेंशन विसरा; रोज रात्री फक्त एक काम केल्यानं लवकर वजन होईल कमी

६) छातीतील वेदना

शरीराच्या ज्या भागात गॅस तयार होतो त्या भागात वेदना होणे सामान्य आहे. छातीत गॅस तयार झाला की छातीत वेदनाही होतात. काही खाल्ल्यानंतर छातीत दुखणे हे गॅसचे लक्षण आहे.

७) श्वास घ्यायला  त्रास होणं

श्वास घेण्यास त्रास होणे हे अनेक गंभीर आजारांचे लक्षण आहे. गॅसमुळेही लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. शरीरात गॅस अधिक पसरला की वेदना वाढतात आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो.

छातीत गॅस जाणवण्याची इतर कारणं (Causes of chest pain)

छातीत गॅस पोटाशी संबंधित परिस्थितींमुळे होऊ शकतो जसे की रिफ्लक्स रोग, हायपर अॅसिडिटी, जठराची सूज किंवा अल्सर रोग. इतकेच नाही तर तणाव, बैठी जीवनशैली, लठ्ठपणा आणि निद्रानाश यामुळेही छातीत गॅस जाणवतो.

उपाय (Gas in chest treatment)

१ बाहेरचे खाणे टाळा.

२ मसालेदार आणि तेलकट अन्न टाळा.

३ वेळेवर अन्न खा, अन्न चांगलं चावून खा.

४ वेळेवर झोपा आणि लवकर उठा. दिवसातून 7-8 तास झोप घ्या.

५. जेवणानंतर 45 मिनिटांनी पाणी प्या.

६. अन्न खाल्ल्यानंतर चालत जा.

७. नियमित व्यायाम, योगा आणि जॉगिंग करा.
 

Web Title: Chest pain causes and treatment : Gas pain in chest symptoms causes and treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.