चिया सीड्स. आता सुपरफूड म्हणून ओळखले जाते. या लहान बिया पौष्टिक असतात. याचा मुख्य वापर वजन कमी करण्यासाठी होतो. या बियांमधे फायबर आणि प्रथिने जास्त असतात. त्यामुळे कमी खाल्ले तरी पोटभरल्याचे समाधान मिळते. वजन कमी करताना किंवा एरव्हीही आहारात या चिया सिड्स किती असाव्यात? खाताना काय काळजी घ्यायची?
आहारतज्ज्ञ, डॉ स्मृती झुनझुनवाला यांच्या मते, ''बरेच लोक चिया बियांना सब्जा समजतात. या दोन बियांमध्ये खूप फरक आहे. त्यातील सर्वात मोठा फरक म्हणजे, सब्जा लगेच पाण्यात विरघळतात आणि घट्ट होतात, तर चिया बियांना पाणी शोषण्यास वेळ लागतो. चिया सीड्स फायबर, प्रोटीन, ओमेगा ३ ने समृद्ध असतात. पोटही साफ व्हायला मदत होते''(Chia Seed Water for Weight Loss: Does It Work?).
चिया सिड्स खाण्याचे फायदे काय?
१. त्यात अँटिऑक्सिडंट असतात, हे घटक हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करतात.
२. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त. चिया सीड्समध्ये इनसॉल्यूबल फायबर असते. जे वजन कमी करण्यासाठी खूप महत्वाचे आहे. दररोज २५ ते ३० ग्राम इनसॉल्यूबल फायबरचे सेवन केले पाहिजे. यासाठी ४ ते ५ चमचे चिया सीड्सचे सेवन करा. मात्र, या आहारासोबत व्यायाम देखील तितकाच महत्वाचा आहे.
भूमी पेडणेकरने कमी केलं ३२ किलो वजन, पण कसं? आईचा सल्ला तिने ऐकला आणि...
३. २ चमचे चिया सीड्स रात्रभर भिजत ठेवा, सकाळी त्याचे सेवन करा. सॅलेड आणि फ्रूट कस्टर्डवर मिक्स करून खाऊ शकता. २-३ चमचे बिया इतर बियांमध्ये मिसळून खाऊ शकता.
४. चिया सीड्सचे पुडिंग किंवा पॅनकेक बनवून खाऊ शकता. हे सीड्स दलियाबरोबर देखील खाता येते.