लहान मुलांना विविध आजारांपासून वाचवण्यासाठी आपण सतत काही ना काही उपाय करत असतो. पायाला भिंगरी असल्यासारखे हे चिल्ले-पिल्ले सगळीकडे धावपळ करतात. मातीत खेळतात. (children grind their teeth in sleep? Worms in the stomach or some serious disease?)इतरही मस्ती करतच असतात. अर्थात लहान मुलं मस्ती करणारंच. त्यांना आपण थांबवू शकत नाही. चिंता असते ती आजारपणाची. धूळ, माती, प्रदूषण आणि सतत बदलत्या हवामानामुळे रोगराई पसरते. (children grind their teeth in sleep? Worms in the stomach or some serious disease?)त्याचा प्रथम शिकार ही लहान मुलच होतात. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे असते. मुलांना सर्दी खोकला झाल्यावर तो आपण आपल्या रामबाण औषधांनी बरा करतोच. पण एक आजार आहे, जो मुलांमध्ये सतत उद्भवतो. तो म्हणजे जंत. मुलांना सतत जंतांचा त्रास होतो. अनेकदा त्याची काही लक्षणेही दिसून येत नाहीत त्यामुळे उपायही वेळीच केले जात नाहीत.
जंत म्हणजे काय?
जंत म्हणजे अगदी लहान कृमी असतात. (children grind their teeth in sleep? Worms in the stomach or some serious disease?)ज्या आपल्याला दिसतही नाहीत. या कृमी पाण्यामध्ये असतात. जमिनीवर असतात. तसेच अन्नातही असतात. त्याच्यापासून शरीराचा बचाव करणे कठीणच आहे. त्या अनेक मार्गे शरीरामध्ये प्रवेश करतात. त्या पचनसंस्थेवर परिणाम करायला सुरवात करतात. वेळीच उपचार केले नाहीत तर, सर्वच संस्थांवर परिणाम करू शकतात. मातीमधून हे जंत पोटात जातात, त्यामुळे लहान मुलांना त्याचा त्रास जास्त होतो.
होमवेदाच्या चॅनलवर सांगितल्यानुसार, जंत झाल्यास लहान मुलांना सतत भूक लागते. काही प्रसंगी भूक लागणंच बंद होतं. जनेंद्रियांमध्ये आग होते. खाज सुटते. मुलांची चिडचिड वाढते. ते सतत अस्वस्थ होतात. वजनही कमी होते. झोपल्यानंतर मुलं दात चावतात. हे काही घरगुती उपाय करून बघा.
१. मुलांना गुळाचा खडा खायला देत जा. गूळ औषधी असतो. तसेच मुलं खायलाही नखरे करत नाहीत.
२. ओवा हा पोटाच्या सर्वच विकारांसाठी चांगला आहे. चमचाभर ओवा गरम पाण्याबरोबर खायचा. पोटातील जंत कमी होतात.
३. पोट साफ करण्यासाठी एकदम गुणकारी उपाय म्हणजे एरंडेल तेल. पोटातील घाण बाहेर टाकण्याचे काम हे तेल करते. गरम पाण्यामध्ये साखर घाला. त्या पाण्याबरोबर एरंडेल तेल मुलांना द्या. त्या तेलाची चव वाईट असते, म्हणून साखर वापरायची. या उपायांनी नक्कीच मुलांच्या पोटातील जंत कमी होतील.