Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सर्दी-खोकल्यामुळे मुले त्रस्त? घरीच करा 'होममेड कफ कॅण्डी', उन्हाचा त्रास आणि आजार होतील कमी

सर्दी-खोकल्यामुळे मुले त्रस्त? घरीच करा 'होममेड कफ कॅण्डी', उन्हाचा त्रास आणि आजार होतील कमी

Homemade cough candy for kids: Natural cold remedy for children: Kids cough drops homemade: ऊन लागल्यामुळे त्यांना ताप, सर्दी आणि खोकल्यासारख्या संसर्गजन्य आजाराला सामोरे जावे लागते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2025 11:37 IST2025-04-21T11:36:11+5:302025-04-21T11:37:06+5:30

Homemade cough candy for kids: Natural cold remedy for children: Kids cough drops homemade: ऊन लागल्यामुळे त्यांना ताप, सर्दी आणि खोकल्यासारख्या संसर्गजन्य आजाराला सामोरे जावे लागते.

Children suffering from cold and cough Make homemade cough candy at home summer troubles and illnesses will be reduced | सर्दी-खोकल्यामुळे मुले त्रस्त? घरीच करा 'होममेड कफ कॅण्डी', उन्हाचा त्रास आणि आजार होतील कमी

सर्दी-खोकल्यामुळे मुले त्रस्त? घरीच करा 'होममेड कफ कॅण्डी', उन्हाचा त्रास आणि आजार होतील कमी

वाढते ऊन, उष्णता आणि सतत होणारे गरम यामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो.(How to make homemade cough candy for kids) उन्हाळ्यात उकाड्यामुळे आपला जीव नकोसा होतो.(Natural way to treat cold and cough in children) या काळात मोठ्यासह लहानांदेखील आरोग्याची काळजी घ्यावी लागते. हायड्रेशनच्या समस्येमुळे शरीरातील पाणी कमी होते.(summer care tips) ज्यामुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवते. 
शरीराला थंडावा मिळावा यासाठी मुले सतत काहीबाही खातात.(Home remedy for summer cough in kids) थंडगार फ्रीजमधील किंवा माठाचे पाणी, आइस्क्रीम, गोळा किंवा सतत उन्हामध्ये खेळणे.(Natural cough relief for children) यामुळे त्याचे आरोग्य बिघडते. ऊन लागल्यामुळे त्यांना ताप, सर्दी आणि खोकल्यासारख्या संसर्गजन्य आजाराला सामोरे जावे लागते.(Home remedies for kids’ cough) अशावेळी डॉक्टरांशिवाय काही घरगुती उपाय केले तर मुले लवकर बरे होतील. होममेड कफ कॅण्डी कशी बनवायची पाहूया. 

केमिकल फ्री साबण घरीच करा, या उपायानं गायब होतील चेहऱ्यावरच्या मुरुम-पुटकुळ्या

साहित्य 
गूळ - १ कप 
आले - १ मोठा तुकडा 
हिरवी वेलची - १ 
काळी मिरी - ५ ते ६ 
लवंग - २ ते ३
तूप - २ चमचे 
पाणी - १ चमचा 

">

कृती 

1. सगळ्यात आधी आल्याचे बारीक तुकडे करुन घ्या. त्यानंतर कढईमध्ये तूप घालून गूळ वितळवून घ्या. 

2. आता मिक्सरच्या भांड्यात आले, हिरवी वेलची, काळी मिरी, लवंग आणि पाणी घालून वाटून घ्या. 

3. यानंतर चाळीने चाळून याचा रस काढा. आता गुळाचे तयार झालेल्या पाकात हा रस मिक्स करा. 

4. चमच्याने मिश्रण ढवळून चांगले एकजीव करा. मिश्रण घट्ट झाले की, नाही ते तपासा. 

5. आता मोल्डमध्ये तयार मिश्रण घेऊन त्यात आइस्क्रीम स्टीक घाला. होममेड कफ कॅण्डी होईल तयार. 

6. याच्या गोड चवीमुळे मुले देखील आवडीने खातील आणि लवकर बरे होतील. 

 

Web Title: Children suffering from cold and cough Make homemade cough candy at home summer troubles and illnesses will be reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.