Join us   

Cholesterol and Diabetes : डायबिटीस, कोलेस्टेरॉल कायम कंट्रोलमध्ये राहील; फक्त सकाळी उपाशी पोटी 'हा' पदार्थ खा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 11:48 AM

Cholesterol and Diabetes : लसणात सल्फर कंपाऊंड्सचे प्रमाण जास्त असल्याने ते शरीराचे अवयव आतून स्वच्छ करतात. लसूण रक्तातील विषारी घटकांची पातळी कमी करू शकते. त्यामुळे शरीर डिटॉक्स व्हायला मदत होते. 

लसूण (Cholesterol and Diabetes)  हा प्रत्येक स्वयंपाकघरात आढळणारा एक सामान्य मसाल्याचा पदार्थ आहे. प्राचीन काळापासून, हा मसाला त्याच्या आरोग्य गुणधर्मांमुळे अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी औषध म्हणून वापरला जातो. लसणातील सर्वात शक्तिशाली घटक म्हणजे त्यात आढळणारे एलिसिन. यात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. (Nutritionist explain 6 health benefits of eating raw garlic with water to reduce cholesterol and diabetes risk)

लसणातील पोषक घटक कोणते आहेत?

लसणाचा वापर स्वयंपाकात केला जातो, पण तो फक्त चव वाढवण्यासाठीच नाही तर अनेक आजारांवर औषध आहे. जर आपण लसणाच्या पोषक तत्वांबद्दल बोललो, तर प्रत्येक 100 ग्रॅम लसणातून आपल्याला सुमारे 150 कॅलरीज, 33 ग्रॅम कार्ब, 6.36 ग्रॅम प्रथिने मिळतात. लसूण व्हिटॅमिन बी 1, बी 2, बी 3, बी 6, फोलेट, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, मॅंगनीज, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम आणि झिंकचा देखील उत्तम स्रोत आहे.

जीवघेण्या कॅन्सरचा धोका वाढवतात रोजच्या खाण्यातले ५ पदार्थ; तज्ज्ञांचा दावा

लसूण कोणत्याही स्वरूपात खा, तुम्हाला फायदा होईल, पण असे मानले जाते की सकाळी कच्चा लसूण खाऊन त्यासोबत गरम पाणी प्यायल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. प्रियांशी भटनागर, डिटॉक्सप्रीच्या संस्थापक आणि सर्वांगीण आहारतज्ज्ञ यांनी सकाळी कच्चा लसूण खाल्ल्याने तुम्हाला कोणते फायदे मिळू शकतात  याबद्दल सांगितले आहे. 

ब्लड सर्क्युलेशन सुधारतं

रिकाम्या पोटी लसणाचे सेवन केल्याने उच्च रक्तदाबाची लक्षणेही कमी होतात. हे तुमचे रक्त परिसंचरण वाढवू शकते आणि तुमच्या यकृत आणि मूत्राशयाचे कार्य सुधारू शकते.

अतिसाराचा त्रास दूर होतो

जर तुम्हाला अतिसाराचा त्रास होत असेल तर लसणामुळे ते बरे होऊ शकते. हे तुमच्या मज्जासंस्थेसाठी देखील चांगले आहे. याव्यतिरिक्त, लसूण तुमची भूक उत्तेजित करू शकते आणि पचन सुधारू शकते.

ताण तणाव कमी होतो

लसूण तुमच्या तणावाची पातळी कमी करण्यास मदत करू शकते. लसणात जास्त प्रमाणात सल्फर संयुगे असतात जे ग्लूटाथिओनची पातळी वाढवण्यास मदत करतात. हे अँटीऑक्सिडंट ताणाविरूद्ध लढते. 

शरीरातल्या घातक युरीक अ‍ॅसिडला बाहेर फेकेल 'हा' पदार्थ;  हाडांची दुखणी राहतील लांब

कोलेस्टेरॉल कमी होते

 

लसूण एकूणच एलडीएल (खराब) कोलेस्ट्रॉल कमी करू शकते. उच्च कोलेस्ट्रॉल असणा-या लोकांनी याचे सेवन करणे आवश्यक आहे. उच्च कोलेस्टेरॉल ही एक गंभीर समस्या आहे ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.

लिव्हरसाठी उपयुक्त

यकृत मजबूत करण्यासाठी कच्च्या लसणाचे सेवन करावे. लसूण यकृत निरोगी ठेवून तुम्हाला अधिक काळ जगण्यास मदत करू शकतो. लसूण संसर्गजन्य रोगांशी लढू शकतो.

कंबर - गुडघे खूपच दुखतात? ५ उपाय, सांधेदुखीपासून मिळेल आराम, डॉक्टारांचा सल्ला वाचा..

शरीर डिटॉक्स होतं

लसणात सल्फर कंपाऊंड्सचे प्रमाण जास्त असल्याने ते शरीराचे अवयव आतून स्वच्छ करतात. लसूण रक्तातील विषारी घटकांची पातळी कमी करू शकते. त्यामुळे शरीर डिटॉक्स व्हायला मदत होते. 

लसणाचा वापर

तज्ज्ञांनी सांगितले की लसणाचा अधिक फायदा मिळवण्यासाठी भाजीपाल्याव्यतिरिक्त तो कच्चा खावा. यासाठी तुम्ही शिळ्या लसणाच्या दोन पाकळ्या रोज सकाळी पाण्यासोबत चावू शकता.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य