कोलेस्टेरॉल वाढणं ही एक मोठी समस्या बनली आहे बरेच लोक या समस्येनं पीडित आहेत. हा घातक पदार्थ फॅट्सयुक्त पदार्थ खाल्ल्यानं, व्यायाम न केल्यानं, जास्त वजन असल्यानं, स्मोकिंग आणि दारू पिण्यानं शरीरात जमा होतो. कोलेस्टेरॉल नसांना ब्लॉक करते. ज्यामुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि इतर हार्ट डिसीज होण्याचा धोका असतो. (What reduces cholesterol quickly)
कोलेस्टेरॉल वाढणं डायबिटीसचंही कारण असू शकते. कोलेस्टेरॉलची पातळी वाढू नये यासाठी हेल्दी पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. जेणेकरून तुम्हाला आयुष्यभर औषधांवर अवलंबून राहावं लागणार नाही. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करून तुम्ही तब्येत चांगली ठेवू शकता. आहारतज्ज्ञ शिखा अग्रवाल यांच्यामते सातू चे पीठ कोलेस्टेरॉल नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. यामुळे गरमीच्या दिवसातही शरीर थंडगार राहते.
सातू पीठात भरपूर फायबर्स असतात. ज्यामुळे कोलेस्टेरॉल लेव्हल कमी करण्यास मदत होते याचे सेवन केल्यास रक्त वाहिन्या स्वच्छ आणि मजबूत राहण्यास मदत होते. सातूच्या पीठाची भाकरी किंवा लाडू बनवून तुम्ही आहारात समावेश करू शकता. याशिवाय सातूचे ड्रिंकही बनवू शकता. खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रोज सकाळी सातू पावडर चिया सिड्ससह एकत्र करून प्या. यामुळे रक्ताच्या नसा स्वच्छ होतील सातूमधील फायबर्स रस्त वाहिन्या साफ करून ब्लड फ्लो सुधारण्यास मदत करतात.
७ साेप्या डिटॉक्स टिप्स; मनावरची मरगळ झटकून शारीरिक थकवा करतील कमी, मिळेल नवीन ऊर्जा
सातूमध्ये मॅग्नेशियम, आयर्न, मँग्ननीज, कॅल्शियम भरपूर असते. याचा ग्लायसेमिक इंडेक्सही कमी असतो. डायबिटीसच्या रुग्णांसाठी हा एक उत्तम उपाय आहे. यामुळे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते आणि ब्लड प्रेशरही नियंत्रणात राहते. जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी सातू हा एक उत्तम पर्याय आहे.
हे फायबर युक्त अन्न जलद वजन कमी करण्यास उपयुक्त आहे. हे जळजळ कमी करण्यासाठी, चयापचय वाढविण्यासाठी आणि निरोगी मार्गाने वजन कमी करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी ओळखले जाते. रोज सकाळी रिकाम्या पोटी सातूचे सेवन केल्याने तुमची पचन आणि आतड्याची हालचाल सुधारते. पोट साफ करण्यासाठी आणि ऍसिडिटीवर उपचार करण्यासाठी हा एक उत्तम उपाय मानला जातो.