हाय कोलेस्टेरॉल हा एक सायलेंट किलर आजार आहे. याची कोणतीही लक्षणं दिसून येत नाहीत. सुरूवातीला हा आजार कोणत्याही अंगावर परिणाम करत नाही पण हळूहळू संपूर्ण शरीराचं नुकसान होतं. (High Cholesterol Symptoms) कोलेस्टेॉल कमी करण्यासाठी खाण्यापिण्यावर नियंत्रण आणि नियमित तपासण्या करणं गरजेचं असते. हा मेणयुक्त पदार्थ लिव्हर तयार करते. शरीरात गुड कोलेस्टेरॉल आणि बॅड कोलेस्टेरॉल असे दोन प्रकारचे कोलेस्टेरॉल असते. (Cholesterol Control Tips) अन्हेल्दी, फॅट्सयुक्त पदार्थांमुळे बॅड कोलेस्टेरॉल वाढते. यामुळे ब्लॉकेजचा धोका वाढतो. ब्लड फ्लो कमी होतो आणि हार्ट अटॅक, स्ट्रोक, हृदयाचे आजारांचा धोका वाढतो. (Sign and symptoms of high cholesterol 5 symptoms of bad cholesterol in your leg)
पाय जड होणं
NJ कार्डीओवॅस्कुलर इंस्टिट्यूटच्या रिपोर्टनुसार जर तुम्हाला नेहमीपेक्षा पायांमध्ये जडपणा जाणवत असेल तर त्वरीच कोलेस्टेरॉलची तपासणी करायला हवी. पोटऱ्या किंवा मांड्यांमध्ये जडपणा दिसून येतो. चालताना या वेदना वाढतात. शरीराचे खालचे भाग, टाच, पायांची बोट यांमध्ये या कोलेस्टेरॉलचा त्रास जास्त जाणवतो. यामुळे धमन्या डॅमेज होण्याचा धोका असतो.
पाय थंड पडणं
जेव्हा वातावरणात गारवा असतो तेव्हा पाय थंड होतात. पण कारण नसताना तुमचे पाय थंड पडत असतील किंवा गरमीच्या दिवसातही तुम्हाला पाय थंड पडण्याचा त्रास जाणवत असेल तर याचं कारण कोलेस्टेरॉल वाढणं हे असू शकतं. या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच रक्त तपासणी करायला हवी.
त्वचेच्या रंगात बदल
धमन्यांमध्ये रक्तप्रवाह व्यवस्थित न झाल्यानं शरीराच्या काही भागांमध्ये रक्त प्रवाह व्यवस्थित होत नाही. यामुळे त्वचेच्या रंगात बदल दिसतो. परिणामी कोलेस्टेरॉल वाढते. त्वचेच्या रंगात बदल झाल्यास दुर्लक्ष करू नका.
जखम भरायला वेळ लागतो
जर तुम्हाला शरीरावर कुठेही जखम झाल्यानंतर ती भरायला वेळ लागत असेल आणि ब्लड सर्क्युलेशन यवस्थित होत नसेल तर हे कोलेस्टेरॉल वाढल्याचं लक्षण असू सकतं. डायबिटीसशिवाय याची इतर अनेक कारणं असू शकतात. तपासणी केल्यानंतर याबाबत अधिक माहिती मिळते.