हाय कोलेस्टेरॉल आणि हाय ब्लड शुगर लेव्हलमुळे गंभीर समस्या उद्भवतात. कोलेस्टेरॉलमुळे हृदयाचे आजार, कोरोनरी हार्ट डिसीज, स्ट्रोक आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो. यामुळे हार्ट अटॅक, किडनी डॅमेज, नर्व्ह डॅमेज, डोळे खराब होणं अशा आजारांचा धोका वाढतो. (Health Care Tips) काही घरगुती उपयांनी कोलेस्टेरॉल आणि साखर नियंत्रणात ठेवली जाऊ शकते. (Cholesterol & Diabetes control Tips) जर तुम्हाला आयुष्यभर गोळ्या घ्यायच्या नसतील तर होमिओपेथी डॉक्टर वंदना यांनी सांगितलेल्या काही टिप्स तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. (Homeopathy dr told home remedy to reduce high cholesterol and diabetes)
हा उपाय करण्यासाठी तुम्हाला १ ग्लास पाणी, १ चमचा मेथीचे दाणे, १ चमचा धण्याची आवश्यकता असेल. एक ग्लास पाणी घेऊन त्यात प्रत्येकी एक चमचा मेथी दाणे आणि धणे टाका. त्यांना एका भांड्यात चांगले गरम करा. पाणी अर्ध झाल्यानंतर गॅस बंद करा. चांगल्या परीणामांसाठी रोज नाश्ता करण्याच्या अर्धा किंवा पाऊण तास आधी हे पाणी प्या.
महिनाभर हा उपाय केल्यास तुम्हाला चांगला परीणाम दिसून येईल. हा घरगुती उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. डॉक्टरांच्या मते डायबिटीज किंवा कोलेस्टरॉलची समस्या असल्यास आपल्या जीवनशैलीत कोणताही बदल करण्यापूर्वी किंवा आहारात बदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा.
मेथीच्या बियांमध्ये फायबर्स, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉलिक एसिड, कॉपर, मिनरल्स आणि ए,बी, सी तसंच महत्वाचे व्हिटामीन्स असतात. याव्यतिरिक्त मेथीचे दाणे अतिरिक्त कोलेस्टेरॉल वाढण्यापासूनही रोखतात. मेथीच्या बिया कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. यामुळे खराब कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते.
पोट साफ नसतं; गॅसनं अस्वस्थ वाटतं; रात्री १ चमचा तुपाचा हा उपाय करा; सकाळी पोट होईल साफ
मेथीच्या बिया लिव्हरमधील एलडीएल रिसेप्टर्सना चालना देतात. यामुळे खराब कोलेस्टेरॉल कमी होऊन रक्त बाहेर पडण्यास मदत होते. मेथीच्या बियांचे नियमित सेवन केल्यास लिपिड प्रोफाईलमध्ये सुधारणा होते. यामुळे कोलेस्ट्रेरॉल कमी करण्यास मदत होते.
मेथीच्या दाण्यांचे आरोग्यदायी फायदे मिळविण्यासाठी, सकाळी रिकाम्या पोटी त्याचे सेवन करणे सर्वात फायदेशीर मानले जाते. रात्री एक चमचा मेथीदाणे पाण्यात भिजत ठेवावे, सकाळी हे पाणी प्यावे आणि मेथीदाणे चावून खावेत. याशिवाय तुम्ही मेथीचे दाणे सकाळी पाण्यात उकळून सेवन करू शकता, पाणी आणि बिया दोन्हीचे सेवन करू शकता.