Join us   

कोलेस्टेरॉल वाढत चाललंय? आळशीपणा न करता ‘आळशी’चा करा एक सोपा वापर, हार्ट राहील ठणठणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2022 3:36 PM

Flaxseed खराब जीवनशैलीमुळे अनेकांना उच्च कोलेस्टेरॉल संबंधित आजार उद्भवतात, त्यामुळे आळशी अर्थात फ्लॅक्स सिड्सचा वापर गुणकारी ठरु शकतो.

सध्या धावपळीच्या जीवनात अनेकांना स्वतःच्या शरीरावर लक्ष देता येत नाही. त्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबीचा समावेश होतो. वजन तर वाढतंच इतर समस्या देखील उद्भवतात. अनहेल्दी जीवनशैलीमुळे आपण भयंकर आजारांना आमंत्रण देतो. काही साधेसोपे बदल आरोग्यासाठी उपकारक ठरु शकतात.

प्रेम रघु आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, यूपीचे असिस्टंट प्रोफेसर डॉ. अभिनव राज यांच्या म्हणण्यानुसार, ''मोठ्या संख्येने लोक उच्च कोलेस्टेरॉलच्या समस्येशी झुंज देत आहेत. त्यासाठी लोकं वेगवेगळी औषधे घेत आहेत. काही आयुर्वेदिक उपायांचा अवलंब करून आपण घरच्या घरी कोलेस्टेरॉलवर सहज नियंत्रण मिळवू शकता. त्यासाठी आळशीपणा न करता ‘आळशी’चा उत्तम वापर करता यायला हवा. आळशी म्हणजेच फ्लॅक्ससिड्स. आळशी मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.  तयार पावडर एका बॉक्समध्ये ठेवा. ही पावडर आपण रोज रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत प्यावी. याचे सेवन केल्याने  शरीरातील चांगल्या कोलेस्टेरॉलचे (HDL) प्रमाण वाढेल आणि खराब कोलेस्ट्रॉल (LDL) ची पातळी कमी होईल.''

फ्लॅक्ससीड पौष्टिक तत्वांनी भरपूर

आळशीच्या बिया पौष्टिक तत्वांचा खजिना आहे. त्यांच्या बियांमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड, फायबर, अँटीऑक्सिडंट्स, मॅग्नेशियम आणि इतर अनेक पोषक घटक आहेत. शाकाहारी व्यक्तींना फ्लॅक्ससीडमधील ओमेगा ३ खूप फायदेशीर आहे. त्याच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते. शरीराला आवश्यक पोषक द्रव्ये मिळतात आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित राहते. हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फ्लॅक्ससीड उपयुक्त ठरते. यापासून बनलेली पावडर आपण सॅलडमध्ये मिक्स करून खाऊ शकता.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स