Join us   

नसांमध्ये शिरलेलं घातक कोलेस्टेरॉल बाहेर काढण्याचे ४ उपाय, BP अचानक वाढणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 7:34 PM

Cholesterol Lower Tips : वेळीच या आजारांकडे लक्ष दिलं नाही तर हार्ट अटॅक, स्ट्रोकस किडनी डॅमेज, हृदयाच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.

हाय ब्लड प्रेशर ही सामान्य समस्या आहे ज्यामुले लाखो लोकांच्या आरोग्यावर परीणाम होतो. हाय बीपीची अनेक कारणं असू शकतात. यातील एक म्हणजे कोलेस्टेरॉल वाढलं. कोलेस्टेरॉल वाढल्यानं हाय बीपीचा त्रास होतो. यामुळ हृदयाचे नुकसान होते. (Cholesterol Lower Tips)

वेळीच या आजारांकडे लक्ष दिलं नाही तर हार्ट अटॅक, स्ट्रोकस किडनी डॅमेज, हृदयाच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. (How to control Cholesterol) कोलेस्टेरॉलच्या उच्च पातळीमुळे उच्च रक्तदाब कसा होऊ शकतो आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात कसे ठेवायचे याबाबत डॉ. सुनील द्विवेदी यांनी एका हिंदी वेबसाईटशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. (Health Tips)

कोलेस्टेरॉलचा त्रास होत असेल, तर तुम्ही ते कमी करण्यासाठी औषधे घेत आहात किंवा जीवनशैलीत बदल करत आहात. यादरम्यान, उच्च रक्तदाबावर लक्ष ठेवणे देखील आवश्यक आहे. जेव्हा तुमच्या रक्तवाहिन्यांच्या भिंतीविरुद्ध तुमच्या रक्ताचा जोर सतत खूप जास्त असतो तेव्हा हाय बीपी होतो. कोलेस्टेरॉल अवरोधित करते आणि रक्तवाहिन्या अरुंद करते, ज्यामुळे तुमचे हृदयाला पंप होण्यासाठी अधिक कष्ट घ्यावे लागतात.

व्यायाम किंवा योगासनं करुन ब्रेस्ट साइज खरंच वाढवता येते का? वाढते का?

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी काय खायचं?

1) संतुलित आहाराने कोलेस्ट्रॉल कमी आणि नियंत्रणात ठेवता येते. तुम्ही तुमच्या आहारात पॉलीअनसॅच्युरेटेड आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्सचा समावेश करावा कारण हे निरोगी कोलेस्टेरॉलची पातळी राखण्यास मदत करू शकते.

२) तुम्हाला तोंडावाटे औषध घ्यायचे नसेल, तर इंजेक्शनचे पर्याय आहेत जे प्रभावीपणे कोलेस्टेरॉलची पातळी कमी करू शकतात आणि तुमचे हृदय नुकसान होण्यापासून वाचवू शकतात. तथापि, निरोगी आहार घेणे आणि नियमित व्यायाम करणे हे निरोगी कोलेस्टेरॉलची पातळी राखण्यासाठी सर्वोत्तम मार्ग आहेत.

३) डॉक्टरांनी सांगितले की काही वेळा निरोगी आहार देखील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी काम करत नाही. अशा परिस्थितीत, कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यासाठी स्टॅटिन, फायब्रेट्स, इझेटिमिब आणि बेम्पेडोइक ऍसिड यांसारखी तोंडी औषधे लिहून दिली जाऊ शकतात.

४) स्वत: डॉक्टरही निरोगी शरीरासाठी ग्रीन टीचे सेवन करण्याचा सल्ला देतात. ग्रीन टी केवळ शरीर तंदुरुस्त ठेवत नाही तर वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करू शकते. ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट असतात. जे खरोखर फायदेशीर पेय असू शकते.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स