Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Omicron : दालचिनी ते आवळा: स्वयंपाकघरातल्या 5 गोष्टी, ओमायक्रॉनच्या लाटेत घरगुती खबरदारी

Omicron : दालचिनी ते आवळा: स्वयंपाकघरातल्या 5 गोष्टी, ओमायक्रॉनच्या लाटेत घरगुती खबरदारी

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी करा घरगुती उपाय; कोरोनापासून वाचण्यासाठी उपयुक्त उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2022 12:09 PM2022-01-09T12:09:09+5:302022-01-09T12:57:40+5:30

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी करा घरगुती उपाय; कोरोनापासून वाचण्यासाठी उपयुक्त उपाय

Cinnamon to Amla: 5 Things in the Kitchen, Home Precautions in Omaicron Wave | Omicron : दालचिनी ते आवळा: स्वयंपाकघरातल्या 5 गोष्टी, ओमायक्रॉनच्या लाटेत घरगुती खबरदारी

Omicron : दालचिनी ते आवळा: स्वयंपाकघरातल्या 5 गोष्टी, ओमायक्रॉनच्या लाटेत घरगुती खबरदारी

Highlightsमहागडी औषधे घेण्यापेक्षा आधीपासूनच घरगुती उपाय केलेले केव्हाही चांगलेस्वयंपाकघरात सजह उपलब्ध असणाऱ्या गोष्टी ठरु शकतात उत्तम उपाय

कोरोना (Corona) काही थांबायचे नाव घेत नाही. ओमायक्रॉन (Omicron) या विषाणूने पुन्हा जगभरात आणि देशात धुमाकूळ घालायला सुरूवात केली असून दररोज हजारो रुग्णांना या विषाणूच्या संसर्गाने कोरोना होत असल्याचे समोर येत आहे. अनेकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, मास्क वापरुन सोशल डीस्टंसिंगचीही काळजी घेतली जात आहे. सरकारनेही नुकतीच नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यामुळे वेगाने पसरणारा हा विषाणू आपल्यापासून लांब राहावा असे प्रत्येकालाच वाटत आहे. असे असले तरी देशाची लोकसंख्या आणि विषाणूचे सततचे बदलते स्वरुप यातून स्वत:ला वाचवायचे असेल तर काही गोष्टींची आवर्जून काळजी घ्यायला हवी. या सगळ्यात काळजी घेण्याबरोबरच आपली प्रतिकारशक्ती वाढवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आता प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे जसे गरजेचे आहे तसेच आहारात काही गोष्टींचा समावेश करणेही तितकेच आवश्यक आहे. भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध होतील असे हे आरोग्यासाठी उपयुक्त असणारे घटक कोणते, पाहूया...

(Image : Google)
(Image : Google)

१. दालचिनी - भारतीय मसाल्याच्या पदार्थांपैकी एक असलेला दालचिनी हा पदार्थ आपल्या आहारात आवर्जून असायला हवा. जेवणाचा स्वाद वाढविण्याबरोबरच दालचिनीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. चहा किंवा गोड पदार्थांमध्ये प्रमुख्याने वापरली जाणारी दालचिनी आपल्या आहारात असायला हवी. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास निश्चितच मदत होईल.

२. आवळा - आवळ्यात व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असते हे आपल्याला माहित आहे. त्याबरोबरच आवळ्यामध्ये टॅनिनही मोठ्या प्रमाणात असते. यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते आणि हानिकारक असलेल्या टॉक्सिन्सशी लढायला मदत होते. 

३. हळद - हळदीमध्ये अँटीबायोटीक गुणधर्म असतात हे आपल्याला माहित आहे. त्यामुळे घशासाठी गरम दूध आणि हळद घेण्याचा उपाय आपण करतो. आपण रोजच्या जेवणातील बऱ्याच पदार्थांमध्ये कमी अधिक फरकाने हळदीचा उपयोग करतो. पण हळद प्रतिकारशक्ती तर वाढवतेच पण कॅन्सर, ट्यूमर यांसारख्या गंभीर रोगांपासून आपला बचाव करण्यासही अतिशय उपयुक्त ठरते. संसर्गजन्य आजारांपासून आपला बचाव व्हावा यासाठी हळद अतिशय उत्तम काम करते. 

४. आलं - सर्दी झाली की आपण शरीरातील उष्णता वाढावी यासाठी आल्याचा उपयोग करतो. आल्याची गोळी किंवा आलं घातलेला चहा आपण घेतो. त्याचप्रमाणे आल्यामध्ये प्रतिकारशक्ती वाढवणारे बरेच घटक असतात. त्यामुळे सध्याच्या काळात आहारात आल्याचा आवर्जून समावेश करायला हवा. मात्र आल्याचे जास्त सेवनही घातक ठरत असल्याने योग्य प्रमाणात आलं खाणे ठिक आहे. 

५. पिपळी - पिपळी हा एक औषधी गुणधर्म असलेली पदार्थ असून मधासोबत पिपळी खाल्ल्यास प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. याबरोबरच सैंधव नमक आणि पिपळी खाल्ल्यास पचनशक्ती सुधारण्यासही मदत होते.  
 

Web Title: Cinnamon to Amla: 5 Things in the Kitchen, Home Precautions in Omaicron Wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.