कान हा मानवी शरीरातील नाजूक अवयव आहे. कानाला हलकीशी जरी दुखापत झाली तर आपला जीव नकोसा होतो.(Cotton Buds Ear Health Risks)आपल्यापैकी अनेकजण इअरफोन किंवा हेडफोनचा वापर करतात. ज्यामुळे कानातील घाण बाहेर पडत नाही. बाहेरचे प्रदूषण आणि घाणींचा आपल्या अवयवांवर परिणाम होतो. कानात इतका मळ साचतो की, आपल्याला नीटसे ऐकू येत नाही त्यामुळे बरेचदा कान दुखू लागतो.(Ear Cleaning Mistakes) कानातील मळ साफ करण्यासाठी आपण पिन किंवा कॉटन बड चा वापर करतो. जे आपल्या कानासाठी हानिकारक आहे. (Dangerous Ear Cleaning Practices) कानातील घाण बाहेर काढताना काही इजा तर होणार नाही ना असे देखील आपल्याला वाटते. परंतु, कॉटन बडने कान साफ करणे खरेच योग्य आहे का? जाणून घ्या डॉक्टरांकडून.(How to Clean Your Ears Safely)
औषध घेऊनही डोकं सतत ठणकत राहाते? ५ घरगुती उपाय करा, काही मिनिटांत डोकेदुखी गायब
कॉटन बड हे कानातील गाण साफ करण्यासाठी काडीपेटीच्या काडी सारखेच काम करते. याचा वापर केल्याने कानातील घाण तर साफ होते. पण त्याने कानातील मळ पूर्णपणे साफ होत नाही. डॉक्टर सांगतात की, कॉटन बडचा वापर आपण चुकीच्या पद्धतीने करतो. कॉटन बड हा कानातील घाण साफ करण्यासाठी नाही तर कानाच्या आजूबाजूला साचलेला मळ साफ करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. कॉटन बडच्या पॅकेटवर आधीच लिहिलेल असतं की, हे कानात टाकण्यासाठी नाहीच याचा वापर कानाच्या बाहेरची जी बाळी आहे ते साफ करण्यासाठी केले जाते.
उन्हाळी लागणे, थकवा- अशक्तपणापासून होईल सुटका, रोज प्या चांदीच्या ग्लासातून पाणी, पाहा का महत्वाचे..
आपल्या कानाच्या आत जी कॅनल असते. ज्यात केसांची अशी एक लेयर करुन ठेवली आहे. ज्याची दिशा बाहेरच्या साइडला आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा मळ किंवा धूळ असेल जी बाहेरच्या बाहेर अडकते. आपण जो मळ समजतो तो खरंतर नैसर्गिक मेण आहे जे बाहेरच्या घाणीला चिकटून आपोआप मळ बाहेर निघतो. आपल्याला काहीही करण्याची गरज नाही. कानाचे इतर संसर्गजन्य आजार झाले असतील किंवा कानाच्या काही समस्या असतील तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.