Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Cleaning hacks for home : २ मिनिटात स्वच्छ होतील जळलेली, काळपट भांडी; 3 उपाय करा, तासनतास भांडी घासत बसणं विसरा

Cleaning hacks for home : २ मिनिटात स्वच्छ होतील जळलेली, काळपट भांडी; 3 उपाय करा, तासनतास भांडी घासत बसणं विसरा

Cleaning hacks for home : बर्‍याच वेळा भांडी नीट साफ केली जात नाहीत किंवा त्यावरील हट्टी, काळे दूर होत नाहीत. म्हणून आम्ही तुम्हाला  जळलेली भांडी कशी सोप्या पद्धतीनं स्वच्छ करू शकता. (Easy Cleaning Tips and Tricks) हे सांगणार आहोत.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 07:41 PM2022-02-22T19:41:41+5:302022-02-23T00:53:50+5:30

Cleaning hacks for home : बर्‍याच वेळा भांडी नीट साफ केली जात नाहीत किंवा त्यावरील हट्टी, काळे दूर होत नाहीत. म्हणून आम्ही तुम्हाला  जळलेली भांडी कशी सोप्या पद्धतीनं स्वच्छ करू शकता. (Easy Cleaning Tips and Tricks) हे सांगणार आहोत.

Cleaning hacks for home : Easy to clean burnt and black utensils know how | Cleaning hacks for home : २ मिनिटात स्वच्छ होतील जळलेली, काळपट भांडी; 3 उपाय करा, तासनतास भांडी घासत बसणं विसरा

Cleaning hacks for home : २ मिनिटात स्वच्छ होतील जळलेली, काळपट भांडी; 3 उपाय करा, तासनतास भांडी घासत बसणं विसरा

कधीकधी आपल्या निष्काळजीपणामुळे स्वयंपाकघरात अन्न शिजवताना आपली भांडी जळतात. यामुळे तुमच्या जेवणाची चव तर खराब होतेच, शिवाय ही जळलेली भांडी साफ करणेही कठीण होते. ही जळालेली भांडी साफ करण्यासाठी घरातील महिलांना कसरत करावी लागते. (How to wash dishes easily) यानंतरही बर्‍याच वेळा भांडी नीट साफ केली जात नाहीत किंवा त्यावरील हट्टी, काळे दूर होत नाहीत. म्हणून आम्ही तुम्हाला  जळलेली भांडी कशी सोप्या पद्धतीनं स्वच्छ करू शकता. (Easy Cleaning Tips and Tricks) हे सांगणार आहोत.

व्हिनेगर

जळलेली भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही व्हिनेगरची मदत घेऊ शकता. त्यामुळे भांडी चमकतात. म्हणजेच तुमच्याकडून अन्न शिजवताना भांडी जळली असतील तर तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही. कारण पाण्यात पांढरा व्हिनेगर मिसळून स्वच्छ केल्यास तुमची जळलेली भांडी लवकर साफ होतील.

अ‍ॅल्यूमिनियमची भांडी कशी धुवायची

अ‍ॅल्युमिनिअमची कढई असो की कुकर वारंवार वापरल्यानंतर खरे तर अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्यांची चमक फार लवकर निघून जाते हे तुमच्या लक्षात आलेच असेल. अशा स्थितीत, ते स्वच्छ करण्यासाठी, तुम्ही भांडे गॅसवर ठेवा आणि त्यात पाणी घाला (जेणेकरुन पाणी उकळल्यानंतर वर येईल), आता त्यात दोन चमचे मीठ आणि 1 टेबलस्पून डिटर्जंट पावडर घाला. जर भांडे खूप गडद झाले असेल तर तुम्ही त्यात अर्ध्या लिंबाचा रस देखील घालू शकता. यामुळे काळी भांडी साफ होतील.  हे पाणी थंड झाल्यानंतर  भांड्यावरील काळपटपणा सहज निघून जातो. 

काचेची भांडी अशी करा स्वच्छ

काचेची भांडी स्वच्छ करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. काचेच्या वस्तूंवरील डाग काढायचे असतील तर त्यात व्हिनेगर, पाणी आणि डिश वॉश साबण यांचे मिश्रण थोडावेळ ठेवा. भांडी धुण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी कोमट असावे हे लक्षात ठेवा.

Web Title: Cleaning hacks for home : Easy to clean burnt and black utensils know how

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.