Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सतत डोकं दुखतं म्हणून वाट्टेल त्या पेनकिलर गोळ्या घेताय? ‘या’ तेलाचे ४ थेंब- करा मसाज-पाहा जादू...

सतत डोकं दुखतं म्हणून वाट्टेल त्या पेनकिलर गोळ्या घेताय? ‘या’ तेलाचे ४ थेंब- करा मसाज-पाहा जादू...

Clove oil to reduce headache : डोकेदुखी कमी करण्यासाठी लवंग तेल अतिशय फायदेशीर ठरते....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2024 05:53 PM2024-08-16T17:53:35+5:302024-08-16T18:00:15+5:30

Clove oil to reduce headache : डोकेदुखी कमी करण्यासाठी लवंग तेल अतिशय फायदेशीर ठरते....

Clove oil home remedies to reduce headache The best essential oils to use for headaches | सतत डोकं दुखतं म्हणून वाट्टेल त्या पेनकिलर गोळ्या घेताय? ‘या’ तेलाचे ४ थेंब- करा मसाज-पाहा जादू...

सतत डोकं दुखतं म्हणून वाट्टेल त्या पेनकिलर गोळ्या घेताय? ‘या’ तेलाचे ४ थेंब- करा मसाज-पाहा जादू...

आजकाल डोकेदुखी ही एक कॉमन समस्या झाली आहे. तणाव, थकवा, सतत मोबाईल किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनवर पाहून काम केल्याने डोकेदुखीची समस्या त्रास देते. डोकेदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी अनेकदा पेनकिलर औषधांची मदत घेतली जाते. मात्र ही औषधं वारंवार घेतली तर त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. डोकेदुखी ही जरी एक साधारण छोटीशी समस्या असली तरीही डोकेदुखीचा त्रास वाढला की आपल्याला अस्वस्थ वाटत काहीच सुचत नाही. काहीजण डोकेदुखीसाठी पेनकिलर घेतात तर काहीजण बाम लावून डोकेदुखी शांत करण्याचा प्रयत्न करतात. परंतु प्रत्येक वेळी असे केल्याने आराम मिळेलच असे नाही. अशा परिस्थितीत काही घरगुती उपाय तुमची ही डोकेदुखीची समस्या क्षणार्धात नाहीशी करु शकते. डोकेदुखीसाठीअनेक प्रकारची औषधे घेण्यापेक्षा एका खास तेलाने डोक्याची मालिश केली तर डोकेदुखी लगेच कमी होऊ शकते. काही खास तेल आपला डोकेदुखीचा त्रास अगदी क्षणार्धात दूर करु शकतात(Clove oil to reduce headache).

लवंग हा एक मसाल्याचा पदार्थ आहे. भारतीय स्वयंपाक घरात सगळ्यांकडे लवंग असतेच. लवंगांचा वापर जेवण बनवताना केला जातो. यामुळे पदार्थाची चव आणि सुगंध वाढतो. लवंगासोबतच लवंगाचे तेल सुद्धा आरोग्यासाठी तितकेच फायदेशीर ठरते. डोकेदुखी कमी करण्यासाठी लवंग तेल अतिशय फायदेशीर ठरते(Clove oil home remedies to reduce headache).

डोकेदुखी दूर करण्यासाठी वापरा लवंग तेल... 

सतत होणारी तीव्र डोकेदुखीची समस्या दूर करण्यासाठी आपण लवंग तेलाचा वापर करु शकतो. डोकेदुखी कमी करण्यासाठी लवंग तेलाचे ३ ते ४ थेंब हातावर घेऊन ते तेल हलकेच कपाळावर चोळून घ्यावे. लवंग तेलाने डोक्यात आणि कपाळावर मसाज केल्याने डोकेदुखी कमी होण्यास मदत मिळते. डोकेदुखीसाठी लवंग तेलाचा वापर केल्यास डोकेदुखी पासून लगेच आराम मिळू शकतो.

लवंग तेलामध्ये फ्लेव्होनॉइड्स असतात ज्यात दाहक-विरोधी गुणधर्म असतात. हे डोक्याच्या नसांना सूज कमी करण्यास मदत करतात. हे तुम्हाला कूलिंग इफेक्ट देखील देते.

अती काम अथवा कामाची दगदग, ताणतणाव अथवा आरोग्य समस्येमुळे तुमचे डोके दुखू लागते. शरीरावरचा ताण आणि त्यातून निर्माण होणारी डोकेदुखी कमी करण्यासाठी तुम्ही लवंग तेलाचा वापर करू शकता.

लवंग तेलाला एक प्रकारचा सुंदर सुगंध येतो. ज्यामुळे तुमचा थकवा कमी होतो आणि फ्रेश वाटण्यास मदत होते. यासाठी नारळाच्या किंवा ऑलिव्ह ऑईलमध्ये लवंग तेलाचे काही थेंब टाका. या मिश्रणाने तुमच्या डोके आणि कपाळावर हळू हळू मसाज करा. ज्यामुळे काही वेळाने तुम्हाला ताण कमी झाल्याचे वाटू लागेल आणि शांत झोप लागेल.

Web Title: Clove oil home remedies to reduce headache The best essential oils to use for headaches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.