खाण्यापिण्यातील अनियमितता आणि जीवनशैलीतील चुकांमुळे आजकाल पोटाचे त्रास उद्भवणं खूपच कॉमन झालंय. तेलकट, शिळ्या अन्नपदार्थांच्या सेवनानं हा त्रास जास्तच वाढत आहे. बद्धकोष्टता म्हणजेच कॉन्सिपेशनचा त्रास झाल्यास तासनतास टॉयेलटमध्ये बसून राहावं लागतं आणि खायचं काय टाळायचं हेच कळत नाही. एक दिवस पोट साफ झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पोट साफ होईल की नाही याची चिंता सतावते. (Cobra stretch bhujangasana for constipation yoga benefits in stomach problem treatment home remedies)
असा त्रास तुम्हाला असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. बद्धकोष्ठतेचा त्रास काही योगासनं नियमितरित्या करून दूर केला जाऊ शकतो. जेव्हा जेव्हा तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या असेल तेव्हा अस्वस्थ होण्याऐवजी योगासनांची मदत घ्या. तुम्ही भुजंगासन करून पाहू शकता ज्याला सामान्यतः कोब्रा पोज किंवा कोब्रा स्ट्रेच असेही म्हणतात.
१) भुंजगासन हा बद्धकोष्ठता दूर करण्याचा एक सोपा उपाय आहे, यामुळे पोटाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते. जर तुम्हाला बद्धकोष्ठता किंवा गॅसची समस्या असेल तर कोब्रा स्ट्रेच तुम्हाला लवकर आराम देण्याचे काम करेल.
२) भुंजगासन करण्याची पहिली पायरी म्हणजे तुम्ही जमिनीवर पोटावर झोपा आणि पायाची बोटे सरळ ठेवा.
३) आपले तळवे जमिनीवर ठेवा आणि शरीराच्या दोन्ही बाजू खांद्याजवळ ठेवा. नंतर आपले डोके वरच्या दिशेने हलवा आणि हातांच्या मदतीने शरीराचा वरचा भाग वाकवून मागे घ्या.
४) या स्थितीत काही वेळ तसेच राहा आणि यादरम्यान खोलवर श्वास घ्या. आता शरीर सैल सोडून आधीच्या आसनावर या. असे केल्याने बद्धकोष्ठता दूर करणे सोपे होईल.
५) गॅस बद्धकोष्टतेचा त्रास असल्यास अन्हेल्दी पदार्थांचे सेवन करू नका. ऑयली पदार्थ, रेड मीट, प्रोसेस्ड फूड, ग्लुटेनयुक्त पदार्थ, दारूपासून लांब राहा.