Join us   

कंबर खूप दुखते- कॅल्शियम कमी झालंय? रोज ‘हा’ १ लाडू खा, कंबरदूखीवर उत्तम उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 11:57 AM

Coconut Laddus Will Relieve Bone And Back Pain : जर तम्हाला गोड खाण्याचे क्रेव्हींग्स होत असतील तर तुम्ही स्वादीाष्ट नारळाचा लाडू ट्राय करू शकता.

आजकाल प्रत्येकालाच कंबरदुखी, गुडघेदुखीच्या वेदना जाणवतात.  नेहमी नेहमी औषधं गोळ्या घेऊनच तब्येतीला बरं वाटेल असं नाही काही सोपे घरगुती उपाय करून तुम्ही तब्येतीची काळजी घेऊ शकता. खाण्यापिण्यात पौष्टीक पदार्थांचा समावेश केल्यास असा त्रास उद्भवणार नाही. भारतात नारळाचा वापर पूर्वापार केला जात आहे. फक्त चवीलाच नाही तर तब्येतीच्या दृष्टीनेही नारळ गुणकारी आहे. (Coconut Laddus Will Relieve Bone And Back Pain)

नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थच्या रिपोर्टनुसार नारळाचे तेल हाडांची रचना सुधारण्यास मदत  करते. ज्यामुळे ऑस्टिओपेरोसिस सारख्या हाडांच्या गंभीर विकारांचा धोका टाळता येतो. यात एंटीऑक्सिडेंट्स असतात. वर्जिन कोकोनट ऑईलमुळे हाडं फॅक्चर होण्याचा धोका टाळता येतो. (Coconut Ladoo Recipe For strong Bones)

जर तम्हाला गोड खाण्याचे क्रेव्हींग्स होत असतील तर तुम्ही स्वादीाष्ट नारळाचा लाडू ट्राय करू शकता. नारळाचे लाडू खाल्ल्याने तुमचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. नारळाचा लाडू आयर्न, फायबर, प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे. हाडांच्या चांगल्या आरोग्यासाठी या लाडूचे सेवन गुणकारी  ठरते. जर तुमही नारळाचा लाडू गुळाऐवजी साखर वापरून केला तर  अधिकच पौष्टीक होईल. गुड आणि नारळाचा लाडू कसा करायचा याची सोपी रेसिपी पाहूया. 

नारळाचे लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य

१) नारळ - अर्धा किलो 

२) डिंक- ३०० ग्राम  

३) काजू, बदाम - १०० ग्राम

४) आक्रोड- १०० ग्राम

५) मनुके - १०० ग्राम

६) तूप - अर्धा किलो

नारळाचे लाडू करण्याची सोपी पद्धत

१) नारळाचे लाडू बनवण्यासाठी आधी अर्धा किलो नारळ घ्या, वरचा तपकिरी भाग सोलून बारीक करा. आता गॅस सुरू करून त्यावर तवा ठेवा आणि त्यात अर्धी वाटी तूप घाला. 

२) आता या तुपात काजू, बदाम, अक्रोड आणि मनुके सोनेरी होईपर्यंत तळा. तुम्ही ग्राइंडर वापरून बारीक केलेले कच्चे खोबरे हलके सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. आता कढईतून खोबरे बाहेर काढा.

कोण म्हणतं भात कमी खायचा? तांदूळ शिजवण्याआधी १ युक्ती वापरा, ना पोट सुटणार ना शुगर वाढणार

३) आता त्याच पॅनमध्ये 300 ग्रॅम बाभूळ डिंक आणि अर्धा किलो गूळ घालून ते वितळू द्या.  दोन्ही वितळेपर्यंत शिजवा. गूळ आणि डिंक वितळत असताना, भाजलेले ड्रायफ्रूट्स ग्राइंडरमध्ये बारीक करा. 

४) गूळ आणि डिंक चांगला वितळला की त्यात भाजलेले खोबरे पावडर आणि कोरडे मेवे घाला. सर्व साहित्य चांगले एकजीव झाल्यावर गॅस बंद करा.

ओटीपोट लटकतंय, मागचा शेप बिघडला? सकाळी १ ग्लास पाण्यात हा पदार्थ घालून प्या, स्लिम व्हा

५) लाडूचे मिश्रण थोडे थंड झाल्यावर हातात घ्या आणि लाडू बांधायला सुरुवात करा. लाडू बनवल्यानंतर ते किसलेल्या नारळावर चांगले घोळवून घ्या. स्वादिष्ट नारळाचे लाडू तयार आहेत.

टॅग्स : हेल्थ टिप्सलाइफस्टाइलफिटनेस टिप्स